Karnavati Finance Share Price | मस्तच संधी! 1560% परतावा देणारा शेअर स्प्लिट होऊन स्वस्त होणार? स्टॉक खरेदीसाठी ऑनलाईन गर्दी
Karnavati Finance Share Price | ‘कर्णावती फायनान्स लिमिटेड’ ही एक वित्तीय सेवा प्रदान करणारी स्मॉल कॅप कंपनी आहे. 1984 मध्ये कर्णावती फायनान्स लिमिटेड कंपनीची स्थापना एक नॉन बँकिंग फायनान्स कंपनी म्हणून झाली होती. ही कंपनी आपल्या ग्राहकांना वैयक्तिक कर्ज, व्यवसाय कर्ज, मालमत्ता कर्ज, सोने कर्ज, भांडवली बाजार आधारित कर्ज, प्रकल्प कर्ज, डिजिटल कर्ज अशा सर्व प्रकारच्या वित्तीय सेवा प्रदान करण्याचे काम करते. आता या कंपनीने आपले शेअर विभाजित करण्याचा निर्णय घेतला आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Karnavati Finance Share Price | Karnavati Finance Stock Price | BSE 538928)
कंपनीची घोषणा :
‘कर्णावती फायनान्स लिमिटेड’ कंपनीने स्टॉक एक्स्चेंज नियामक फाइलिंगमध्ये माहिती दिली आहे की, “कर्णावती फायनान्स लिमिटेड कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक सोमवार दिनांक 30 जानेवारी 2023 रोजी दुपारी 01.00 वाजता कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालय 705 , द पाम या ठिकाणी आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत कंपनी आपल्या कंपनीचे शेअर्स 1:10 या प्रमाणत विभाजित करण्याचा विचार करणार आहे.
शेअरची कामगिरी :
कर्णावती फायनान्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स BSE इंडेक्सवर आज 4.99 टक्के घसरणीसह 162.65 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. मागील बंदच्या तुलनेत शेअर मध्ये 5 टक्के घट झाली आहे. या कंपनीच्या शेअर्सने मागील पाच वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना 528.57 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर मागील एका वर्षात या स्टॉकने लोकांना 689.24 टक्के परतावा कमावून दिला आहे. या स्टॉक ने आपल्या पूर्ण आयुष्यात आतापर्यंत एकूण 1,560.38 टक्के परतावा मिळवून दिला आहे. यादरम्यान शेअरची किंमत 10 रुपयांवरून 176 रुपयांवर पोहोचली आहे.
ज्या लोकांनी या स्टॉकमधे एक लाख रुपये लावले होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य वाढून आता 17 लाख रुपये झाले आहे. मागील सहा महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सनी लोकांना 529.70 टक्के मल्टीबॅगर परतावा कमावून दिला आहे. मागील एका महिन्यात या स्टॉकने लोकांना 18.40 टक्के परतावा मिळवून दिला आहे. या कंपनीच्या स्टॉकने 05/01/2023 रोजी 178.00 रुपये ही आपली 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी स्पर्श केली होती. तर 05/04 /2022 रोजी या स्टॉकने 14.15 रुपये ही आपली 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी गाठली होती.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Karnavati Finance Share Price 538928 check details on 10 January 2023.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- National Education Day | संपूर्ण भारतात 11 नोव्हेंबर रोजीच का साजरा करतात शिक्षण दिन, वाचा सविस्तर इतिहास
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर रॉकेट स्पीडने परतावा देणार, पुन्हा मोठी कमाई होणार - NSE: TATAMOTORS
- EPFO Pension Money | पगारातून EPF कापला जातोय, तुम्हाला EPF ची किती पेन्शन मिळेल जाणून घ्या, हक्काचा पैसा सोडू नका
- Drashti Dhami | मधुबाला फेम अभिनेत्री दृष्टीने लग्नाच्या 9 वर्षानंतर दिला गोंडस मुलीला जन्म, फोटो शेअर करून दिल्या शुभेच्छा
- My EPF Money | पगारदारांनो, हायर पेन्शनकरिता तुम्ही अर्ज केला आहे का, नसेल तर चेक करा स्टेटस, अन्यथा संधी जाईल