15 November 2024 10:03 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, स्टॉक रेटिंग अपडेट, कमाईची मोठी संधी - NSE: HAL Vedanta Share Price | वेदांता कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, मालामाल करणार शेअर - NSE: VEDL Tata Motors Share Price | रॉकेट तेजीने परतावा देणार टाटा मोटर्स शेअर, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATAMOTORS NHPC Share Price | NHPC शेअर चार्टवर महत्वाचे संकेत, मल्टिबॅगर स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: NHPC EPFO Money | खाजगी कर्मचाऱ्यांचा बेसिक पगार वाढणार, प्रतिमहा मिळणारं 21000, जाणून घ्या आणखीन फायदे - Marathi News Post Office Scheme | आता 100 रुपये वाचवून तयार होईल लाखोंचा फंड, पोस्टाची खास योजना तुम्हाला श्रीमंत बनवू शकते - Marathi News Property Buying | प्रॉपर्टी खरेदी करायची असेल तर, सर्वात आधी या 4 गोष्टींवर लक्ष केंद्रित करा, नाहीतर नुकसान होईल - Marathi News
x

KDDL Share Price | मार्ग श्रीमंतीचा! या शेअरने 230% परतावा दिला, आता या बातमीने प्रति शेअरवर झटपट 162 रुपये मिळणार

KDDL Share Price

KDDL Share Price | केडीडीएल लिमिटेड या स्मॉल कॅप कंपनीच्या संचालक मंडळाने स्टॉक्स बायबॅक करण्याची घोषणा केली आहे. कंपनीच्या संचालक मंडळाने नुकताच पार पडलेल्या बैठकीत ‘बाय बॅक’ प्रस्ताव मंजूर केला आहे. म्हणजेच KDDL ltd कंपनी आपल्या विद्यमान शेअर धारकांकडून शेअर्स खरेदी करेल. आणि यासाठी कंपनीने प्रति शेअर 1200 रुपये किंमत निश्चित केली आहे. म्हणजेच शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनच्या बाजार भावानुसार कंपनी गुंतवणूकदारांकडून शेअर खरेदी करेल आणि शेअर धारकांना प्रति शेअर 15.60 टक्के अधिक पैसे दिले जाईल. या स्टॉक बायबॅकचा फायदा घेण्यासाठी अधिक माहिती जाणून घेऊ. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, KDDL Share Price | KDDL Stock Price | BSE 532054 | NSE KDDL)

कंपनीने शेअर स्टॉक मार्केट नियामक सेबीला दिलेल्या माहितीत म्हंटले आहे की, कंपनीने 10 रुपये दर्शनी मूल्य असलेले शेअर्स 1200 रुपये प्रति शेअर किमतीवर विकत घेण्याची घोषणा केली आहे. कंपनी या बायबॅक अंतर्गत 2100 लाख रुपये किमतीचे शेअर्स खरेदी करेल. केडीडीएल लिमिटेड कंपनीचे बाजार भांडवल 1,317.20 कोटी रुपये आहे.

कंपनीची आर्थिक स्थिती :
शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये केडीडीएल लिमिटेड कंपनीचे शेअर NSE निर्देशांकावर 1.46 टक्क्याच्या वाढीसह 1,038 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. सोमवार दिनांक 23 जानेवारी 2023 रोजी केडीडीएल लिमिटेड कंपनीचे शेअर्स 0.89 टक्के वाढीसह 1043.50 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. शुक्रवारच्या बाजार भावानुसार बायबॅक अंतर्गत कंपनी गुंतवणूकदारांना 162 रुपये नफा जास्त देणार आहेत. मागील 5 वर्षांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 230.63 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील 3 वर्षांत या कंपनीने आपल्या शेअर धारकांना 227.62 टक्के नफा कमावून दिला आहे. केडीडीएल लिमिटेड कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 1,191 रुपये होती. तर या शेअरची 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 594.15 रुपये होती. सप्टेंबरमध्ये जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार कंपनीच्या प्रवर्तकांकडे 49.07 टक्के भाग भांडवल आहे. तर FII कडे 20.11 टक्के आणि देशांतर्गत गुंतवणूकदारांकडे 2.39 टक्के भाग भांडवल होल्ड आहे. या कंपनीत , सरकारची गुंतवणूक 0.06 टक्के आहे तर किरकोळ गुंतवणूकदारांचे भाग भांडवल प्रमाण 28.36 टक्के आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | KDDL Share Price 532054 stock market live on 23 January 2023.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x