17 April 2025 2:17 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Mutual Fund | नोकरदारांनो, डोळे झाकुन पैसे गुंतवा या SBI फंडात, एसआयपी वर दिला 1,04,23,471 रुपये परतावा EPFO Pension Amount | तुमचा बेसिक पगार किती आहे? खाजगी कंपनी पगारदारांना महिना 6,429 रुपये पेन्शन मिळणार, अपडेट आली Gratuity on Salary | खाजगी कंपनी पगारदारांच्या खात्यात ग्रेच्युटीचे 4,03,846 रुपये जमा होणार, फायद्याची अपडेट जाणून घ्या Horoscope Today | 17 एप्रिल 2025, तुमच्यासाठी गुरुवारचा दिवस कसा असेल? तुमचे गुरुवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या GTL Share Price | जीटीएल इन्फ्रा पेनी स्टॉकमध्ये तेजी, जोरदार खरेदी, पुढची टार्गेट प्राईस किती? - NSE: GTLINFRA Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार गुरुवार 17 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या IREDA Share Price | सुसाट तेजी, इरेडा शेअरमध्ये 5.65 टक्क्यांची तेजी, PSU स्टॉकची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: IREDA
x

Kore Digital Share Price | कोरे डिजिटल शेअर सतत अप्पर सर्किट तोडतोय, स्टॉकमधील तेजीचे कारण काय? मल्टिबॅगर परतावा मिळेल

Kore Digital Share Price

Kore Digital Share Price | मागील काही दिवसांपासून कोरे डिजिटल कंपनीच्या शेअरमध्ये सातत्याने अप्पर सर्किट लागत आहे. सोमवारी देखील कोरे डिजिटल या मायक्रो कॅप कंपनीच्या शेअरमध्ये 5 टक्के अप्पर सर्किटसह 311 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज देखील या स्टॉकमध्ये अप्पर सर्किट लागला आहे. मागील एका आठवड्यात कोरे डिजिटल कंपनीच्या शेअर्स आपल्या गुंतवणूकदारांना 15 टक्के परतावा मिळवून दिला आहे.

मागील एका महिन्यात कोरे डिजिटल कंपनीच्या शेअरची किंमत 226 रुपयेवरून वाढून 326 रुपयेवर पोहचली आहे. याकाळात कोरे डिजिटल कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 43.33 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील 3 महिन्यांत कोरे डिजिटल कंपनीच्या शेअरने आपल्या शेअर धारकांना 81 टक्के नफा मिळवून दिला आहे.

मागील 6 महिन्यांत कोरे डिजिटल कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे 63 टक्के वाढवले आहेत. आज बुधवार दिनांक 20 सप्टेंबर 2023 रोजी कोरे डिजिटल कंपनीचे शेअर 5 टक्के वाढीसह 326.80 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

कोरे डिजिटल कंपनीच्या शेअर्सची दर्शनी किंमत 10 रुपये आहे. मागील काही दिवसापासून या कंपनीच्या शेअरमध्ये तेजी पाहायला मिळत आहे कारण, या कंपनीला 100 कोटी रुपये मूल्याची ऑर्डर मिळाली आहे. नुकताच कोरे डिजिटल कंपनीने Cogent Communication Limited कंपनीसोबत एक व्यापारी करार केला आहे.

Cogent Communication Limited ही एक अमेरिकन बहुराष्ट्रीय इंटरनेट सेवा प्रदान करणारी कंपनी असून ती जगभरात आपले कार्य विस्तार करत आहे. आणि आता ही कंपनी भारतात कोरे डिजिटल कंपनीची सेवा घेणार आहे. म्हणून सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये कोरे डिजिटल कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत तेजी पाहायला मिळाली होती. मागील 6 महिन्यांत कोरे डिजिटल कंपनीच्या शेअरची किंमत 63 टक्के वाढली आहे.

Cogent Communication Limited कंपनी सोबतच्या करारानंतर, कोरे डिजिटल कंपनीच्या वार्षिक महसू लात अधिक भर पडणार आहे. कोरे डिजिटल कंपनी पुढील काही वर्षांत आक्रमकपणे आपला व्यवसाय विस्तार करण्याची योजना आखत आहे.

मागील आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या सहामाहीत कोरे डिजिटल कंपनीने 15 कोटी रुपये महसूल संकलित केला होता, जो त्या पूर्वीच्या आर्थिक वर्षातील दुसऱ्या सहामाहीच्या तुलनेत 38 टक्क्यांनी अधिक होता. मागील आर्थिक वर्षात दुसऱ्या सहामाहीत कोरे डिजिटल कंपनीचा कार्यरत नफा 3.35 कोटी रुपये नोंदवला गेला होता, आणि PAT वाढून 2.29 कोटी रुपये नोंदवला गेला होता.

कोरे डिजिटल ही कंपनी मुख्यतः कम्युनिकेशन सोल्युशन्स सेवा प्रदान करणारी कंपनी आहे. ही कंपनी दूरसंचार नेटवर्क ऑपरेटर म्हणून काम करते. कोरे डिजिटल कंपनी टेलिकॉम इन्फ्रास्ट्रक्चर क्षेत्रात व्यवसाय विस्तार करण्याचा प्रयत्न करत आहे. कोरे डिजिटल कंपनीच्या महाराष्ट्रातील ऑपरेशन्समध्ये इन्स्टॉलेशन आणि कमिशनिंग, टॉवर्सची स्थापना आणि ऑप्टिकल फायबर केबल सिस्टीम कामाचा समावेश होतो. मागील काही वर्षात कोरे डिजिटल कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना भरघोस कमाई करून दिली आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Kore Digital Share Price today on 20 September 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

Kore Digital Share Price(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या