19 November 2024 10:43 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी करणार मालामाल, कमाईची मोठी संधी - GMP IPO Suzlon Share Price | सुझलॉन कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर होणार रॉकेट, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON EPF Pension Money | नोकरदारांनो, तुमच्या 60 ते 70 हजाराच्या पगारावर किती EPF पेन्शन मिळणार, संपूर्ण माहितीचा आढावा घ्या Salary Account | पगारदारांनो, केवळ झिरो बॅलन्स नाही तर, सॅलरी अकाउंटवर मिळतात या 5 सुविधा, जाणून आश्चर्यचकित व्हाल SBI Mutual Fund | श्रीमंत करणाऱ्या 5 म्युच्युअल फंड योजना, 10 हजारांचे होतील करोडो रुपये, इथे पैशाने पैसा वाढवा - Marathi News Trident Share Price | 35 रुपयाच्या शेअरची कमाल, दिला 2300 टक्क्यांचा मल्टिबॅगर परतावा, फायदा घ्या - NSE: TECHLABS Yes Bank Share Price | येस बँकबाबत महत्वाची अपडेट, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK
x

KP Energy Share Price | 113% परतावा देणारा हा मल्टिबॅगर शेअर स्प्लिट होणार, स्वस्तात खरेदीची संधी साधणार? स्टॉक डिटेल्स

KP Energy Share Price

KP Energy Share Price | मागील 6 महिन्यांत केपी एनर्जी लिमिटेड कंपनीच्या शेअर्सनी आपल्या शेअर धारकांना मजबूत परतावा कमावून दिला आहे. या कंपनीच्या संचालक मंडळाने नुकताच स्टॉक विभाजन करण्यास मान्यता दिली आहे. पण शेअर बाजाराला स्टॉक स्प्लिटची ही योजना पसंत पडली नाही. गुरुवार दिनांक 5 जानेवारी 2023 रोजी शेअर स्प्लिटची बातमी मिळाल्यानंतर शेअरमध्ये लोअर सर्किट लागला. केपी एनर्जी लिमिटेड कंपनीचे शेअर्स 4.50 टक्क्यांच्या घसरणीसह 385.90 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. शुक्रवार दिनांक 6 जानेवारी 2023 रोजी 0.44 टक्के घसरणीसह 383.75 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, KP Energy Share Price | KP Energy Stock Price | BSE 539686)

कंपनीचे स्पष्टीकरण :
BSE च्या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध माहितीनुसार, “केपी एनर्जी लिमिटेड कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक 5 जानेवारी 2023 रोजी पार पडली होती. या बैठकीत कंपनीच्या संचालक मंडळाने 10 रुपये दर्शनी मूल्य असलेल्या शेअर्सचे दोन तुकड्यामध्ये विभाजन करण्याची घोषणा केली होती. स्टॉक स्प्लिट प्रक्रिया पूर्ण झाल्यास केपी एनर्जी लिमिटेड कंपनीच्या शेअर्सचे दर्शनी मूल्य 5 रुपये होईल. स्टॉक स्प्लिट केल्याने शेअरची तरलता वाढते, आणि शेअर धारकांना स्वस्तात स्टॉक खरेदी करता येतात.

गुंतवणूकीवर परतावा :
ज्या लोकांनी एक वर्षापूर्वी या कंपनीचे शेअर्स खरेदी केले होते, त्यांना आता 50 टक्क्यांहून अधिक परतावा मिळाला आहे. त्याच वेळी मागील 6 महिन्यांत KP Energy कंपनीच्या शेअर्सनी आपल्या शेअर धारकांना 113 टक्क्यांपर्यंत परतावा कमावून दिला आहे. मात्र मागील एका महिन्यात या स्टॉकमध्ये पडझड पाहायला मिळाली आहे. गेल्या एक महिन्याच्या कालावधीत केपी एनर्जी लिमिटेड कंपनीच्या शेअर्सच्या किमतीत 2 टक्क्यांहून अधिक पडझड झाली आहे. बीएसई इंडेक्समध्ये या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 488.55 रुपये होती. तर 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 140.70 रुपये होती.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | KP Energy Share Price 539686 in focus check details on 06 January 2023.

हॅशटॅग्स

#Stock in Focus(73)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x