18 November 2024 6:02 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर चार्टवर मोठे संकेत, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक ब्रेकआऊट देणार का - NSE: RVNL NTPC Share Price | एनटीपीसी शेअरला 'आउटपरफॉर्म' रेटिंग, स्टॉक मालामाल करणार, यापूर्वी 218% परतावा दिला - NSE: NTPC EPFO Passbook | पगारदारांनो, टेन्शन फ्री रहा, EPF खात्यातून सहज ऑनलाईन पैसे काढता येतील, बॅलन्स चेक करून काढा पैसे HDFC Mutual Fund | SIP केवळ 3 हजारांची, मिळेल 5 करोडोंचा घसघशीत परतावा, पहा या म्युच्युअल फंडाची कमाल - Marathi News Credit Card Application | खराब सिबिल स्कोरमुळे बँक लोन आणि क्रेडिट कार्ड देण्यास नकार देतेय, काळजी नको, हे सोपं काम करा Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची धमाकेदार योजना, घसघशीत परताव्यासह मिळतील अनेक सुविधा, फायदा घ्या - Marathi News Pension Scheme | टेन्शन नको, ही सरकारी योजना महिना 1 लाख रुपये पेन्शन देईल, फायद्याची योजना लक्षत ठेवा - Marathi News
x

KPI Green Energy Share Price | पैसा अल्पावधीत दुप्पट होतोय! केपीआय ग्रीन एनर्जी शेअर गुंतवणूकदारांचा फेव्हरेट, फायदा घेणार?

KPI Green Energy Share Price

KPI Green Energy Share Price | केपीआय ग्रीन एनर्जी कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर परतावा कमावून दिला आहे. केपीआय ग्रीन एनर्जी कंपनीचे शेअर्स शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 7 टक्क्यांच्या वाढीसह ट्रेड करत होते. तर आज देखील या कंपनीच्या शेअरमध्ये तेजी पाहायला मिळत आहे. केपीआय ग्रीन एनर्जी कंपनीच्या शेअरमध्ये वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे, कंपनीला एक नवीन ऑर्डर मिळाली आहे.

केपीआय ग्रीन एनर्जी कंपनीला या नवीन कॉन्ट्रॅक्ट अंतर्गत सोलर पॉवर प्लांटची उभारणी करण्याचे काम देण्यात आले आहे. आज सोमवार दिनांक 6 नोव्हेंबर 2023 रोजी केपीआय ग्रीन एनर्जी स्टॉक 1.03 टक्के वाढीसह 876.00 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

KPI ग्रीन एनर्जी कंपनीला 5.70 मेगा वॅट क्षमतेचे सोलर पॉवर प्लांट उभारणी करण्याचे काम मिळाले आहे. ही नवीन वर्क ऑर्डर मिळाल्यानंतर केपीआय ग्रीन एनर्जी कंपनीकडे आता 112+ मेगा वॅटपेक्षा अधिक सौर ऊर्जा प्रकल्पाचे काम प्रलंबित आहे. मागील 1 वर्षात केपीआय ग्रीन एनर्जी कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले आहे.

मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये KPI ग्रीन एनर्जी कंपनीचे शेअर्स 867.20 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मागील एका वर्षात केपीआय ग्रीन एनर्जी कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 147 टक्क्यांपेक्षा जास्त नफा कमावून दिला आहे.

मागील 6 महिन्यांत KPI ग्रीन एनर्जी कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 75 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. KPI ग्रीन एनर्जी कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 953.80 रुपये होती. तर नीचांक पातळी किंमत 346.50 रुपये होती. केपीआय ग्रीन एनर्जी कंपनीचे एकूण बाजार भांडवल 3133.54 कोटी रुपये आहे.

मागील आर्थिक वर्षाच्या शेवटच्या तिमाहीत KPI ग्रीन एनर्जी कंपनीने 643.79 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. आता कंपनीच्या महसुलात तब्बल 180 टक्क्यांची वाढ झाली आहे. जानेवारी ते मार्च 2023 दरम्यान केपीआय ग्रीन एनर्जी कंपनीने 109.63 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | KPI Green Energy Share Price NSE 06 November 2023.

हॅशटॅग्स

KPI Green Energy Share Price(19)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x