5 February 2025 7:29 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
PPF Scheme | सरकारी PPF योजना ठरेल फायद्याची, अवघी 100 रुपयांची गुंतवणूक 10 लाख रुपयांचा परतावा देईल SBI Car Loan | एसबीआय बँकेकडून 5 वर्षांसाठी 8 लाखांचे कार लोन घेतल्यानंतर किती EMI हप्ता भरावा लागेल, रक्कम जाणून घ्या TATA Punch EV | धमाका ऑफर, 19,500 रुपयांच्या मासिक EMI वर घरी घेऊन या 'टाटा पंच EV, संधी सोडू नका Rent Agreement | सावधान, भाड्याने घर घेताना ॲग्रीमेंटमधील 'ही' कलमे अवश्य वाचा, अन्यथा मोठं नुकसान होईल IRB Infra Share Price | 54 रुपयाचा शेअर मालामाल करणार, ब्रोकरेज फर्म बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IRB Tata Mutual Fund | जबरदस्त फंड, 2000 च्या SIP बचतीवर 2 कोटी रुपये मिळतील, तर एकरकमी 1 लाखावर 3.5 कोटी मिळतील Old Vs New Tax Regime | पगारदारांसाठी कोणती टॅक्स प्रणाली फायदेशीर ठरेल, तुमचा फायदा कुठे सोप्या शब्दांत जाणून घ्या
x

KPI Green Energy Share Price | कुबेर कृपा होईल! अल्पावधीत या शेअरने 4500 टक्के परतावा दिला, वेळीच एंट्री घ्या

KPI Green Energy Share Price

KPI Green Energy Share Price | कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये केपीआय ग्रीन एनर्जी कंपनीचे शेअर्स 4 टक्के वाढीसह 1,264.9 रुपये या आपल्या नवीन 52 आठवड्यांच्या उच्चांक किमतीवर ट्रेड करत होते. आज मात्र केपीआय ग्रीन एनर्जी या कंपनीच्या शेअर्समध्ये किंचित वसुली पाहायला मिळत आहे.

काल कंपनीच्या शेअरमध्ये वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे, KPI ग्रीन एनर्जी कंपनीच्या उपकंपनीला नवीन सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्याची ऑर्डर मिळाली आहे. त्यामुळे मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स तेजीत वाढत होते. आज बुधवार दिनांक 29 नोव्हेंबर 2023 रोजी केपीआय ग्रीन एनर्जी स्टॉक 2.21 टक्के घसरणीसह1,186.15 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

केपीआय ग्रीन एनर्जी कंपनीने स्टॉक एक्सचेंज फाइलिंगमध्ये माहिती दिली की, कंपनीच्या ‘कॅप्टिव्ह पॉवर प्रोड्यूसर’ सेगमेंट अंतर्गत कंपनीच्या उपकंपनी असलेल्या सनड्रॉप्स एनर्जीया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित करण्यासाठी 4.66 कोटी रुपये मूल्याचे कॉन्ट्रॅक्ट देण्यात आले आहे. 2024-25 या आर्थिक वर्षात हे प्रकल्प विविध टप्प्यांत प्रकल्प पूर्ण केले जाणार आहे.

मागील तीन वर्षात केपीआय ग्रीन एनर्जी कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 4500 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील दोन वर्षांत या कंपनीच्या शेअरची किंमत 900 टक्के वाढली आहे. तर मागील एका वर्षात केपीआय ग्रीन एनर्जी कंपनीच्या शेअरची किंमत 170 टक्के वाढली आहे.

तांत्रिकदृष्ट्या केपीआय ग्रीन एनर्जी स्टॉकचा RSI 79 अंकावर आहे. ट्रेंडलाइन डेटानुसार 30 पेक्षा कमी RSI असलेला स्टॉक ओव्हरसोल्ड मानला जातो, तर 70 पेक्षा जास्त RSI असलेला स्टॉक जास्त खरेदी झालेला शेअर मानला जातो.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | KPI Green Energy Share Price NSE 29 November 2023.

हॅशटॅग्स

KPI Green Energy Share Price(19)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x