18 November 2024 9:05 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
EPF Pension Money | नोकरदारांनो, तुमच्या 60 ते 70 हजाराच्या पगारावर किती EPF पेन्शन मिळणार, संपूर्ण माहितीचा आढावा घ्या Salary Account | पगारदारांनो, केवळ झिरो बॅलन्स नाही तर, सॅलरी अकाउंटवर मिळतात या 5 सुविधा, जाणून आश्चर्यचकित व्हाल SBI Mutual Fund | श्रीमंत करणाऱ्या 5 म्युच्युअल फंड योजना, 10 हजारांचे होतील करोडो रुपये, इथे पैशाने पैसा वाढवा - Marathi News Trident Share Price | 35 रुपयाच्या शेअरची कमाल, दिला 2300 टक्क्यांचा मल्टिबॅगर परतावा, फायदा घ्या - NSE: TECHLABS Yes Bank Share Price | येस बँकबाबत महत्वाची अपडेट, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK RVNL Share Price | RVNL कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर सकारात्मक परिणाम होणार - NSE: RVNL IRFC Share Price | IRFC शेअर फोकसमध्ये, मल्टिबॅगर शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा का - NSE: IRFC
x

KPIT Technologies Share Price | पैसा सत्कारणी लागला! KPIT टेक्नॉलॉज शेअरने 4 वर्षात 1 लाख रुपयांवर दिला 9.69 लाख रुपये परतावा

Highlights:

  • KPIT Technologies Share Price
  • मागील 1 वर्षात केपीआयटी टेक्नॉलॉजी शेअरने पैसे दुप्पट केले
  • 4 वर्षात 1 लाख रुपयांवर दिला 9.69 लाख रुपये परतावा
  • केपीआयटी टेक्नॉलॉजी कंपनीबद्दल.
  • परताव्याचे गुणोत्तर – लाभांश वाटप
KPIT Technologies Share Price

KPIT Technologies Share Price | मागील एका वर्षापासून आयटी सेक्टर मंदीच्या गर्तेत अडकला होता. मात्र आता कुठे आयटी व्यवसायात सुधारणा पाहायला मिळत आहे. भारतातील अनेक दिग्गज आयटी कंपन्यांनी मागील एका वर्षात निराशाजनक कामगिरी केली. अनेकांनी तर गुनंतवणुकदारांना नकारात्मक परतावा दिला.

मागील 1 वर्षात केपीआयटी टेक्नॉलॉजी शेअरने पैसे दुप्पट केले

मागील एका वर्षात केपीआयटी टेक्नॉलॉजी कंपनीच्या शेअरने गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले आहे. आज गुरूवार दिनांक 1 जून 2023 रोजी केपीआयटी टेक्नॉलॉजी कंपनीचे शेअर्स 3.85 टक्के वाढीसह 1,104.00 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

4 वर्षात 1 लाख रुपयांवर दिला 9.69 लाख रुपये परतावा

केपीआयटी टेक्नॉलॉजी ही एक जागतिक सॉफ्टवेअर सोल्युशन्स कंपनी आहे. ही कंपनी मुख्यतः ऑटोमोबाईल उद्योगाला स्वायत्त, स्वच्छ, स्मार्ट आणि कनेक्टेड भविष्याकडे वाटचाल करण्यास उपयुक्त सेवा प्रदान करते. YTD आधारे या कंपनीच्या शेअरने लोकांना 58.61 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या शेअर धारकांना 103.26 टक्के परतावा कमावून दिला आहे.  एक वर्षभरापूर्वी केपीआयटी टेक्नॉलॉजी कंपनीचे शेअर्स 530.30 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.

4 वर्षांपूर्वी KPIT कंपनीचे शेअर्स 108.65 रुपये किमतीवर ट्रेड मदत होते. आज हा स्टॉक 1,104.00 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. ज्या लोकांनी चार वर्षांपूर्वी केपीआयटी टेक्नॉलॉजी कंपनीच्या शेअरमध्ये एक लाख रुपये लावले होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य 9.69 लाख रुपये झाले आहे.

केपीआयटी टेक्नॉलॉजी कंपनीबद्दल

केपीआयटी टेक्नॉलॉजी ही कंपनी कनेक्टेड, ऑटोनॉमस, शेअर्ड आणि इलेक्ट्रिफाइड डोमेन सेवा प्रदान करणारी एकमेव एम्बेडेड सॉफ्टवेअर कंपनी आहे. केपीआयटी टेक्नॉलॉजी कंपनीच्या ग्राहकांच्या यादीत BMW, GM, Renault, Honda, Hyundai, यासारख्या ऑटोमोटिव्ह आणि मोबिलिटी उद्योगातील दिग्गज कंपन्या सामील आहेत.

केपीआयटी टेक्नॉलॉजी कंपनी जर्मनी, यूएसए, चीन, कोरिया, जपान, मध्ये व्यवसाय करते. केपीआयटी टेक्नॉलॉजी कंपनीकडे सध्या 51 पेटंट आहेत, त्यापैकी सहा आर्थिक वर्ष 2023 मध्ये मंजूर करण्यात आले आहेत. केपीआयटी टेक्नॉलॉजी कंपनीच्या महसुलात मागील पाच वर्षांमध्ये 28.9 टक्के चक्रवाढ वार्षिक दराने वाढ पाहायला मिळाली आहे.

परताव्याचे गुणोत्तर – लाभांश वाटप

केपीआयटी टेक्नॉलॉजी कंपनीचा इक्विटीवर परतावा म्हणजेच ROI आणि रोजगारावरील भांडवलावर परतावा म्हणेजच ROCE अनुक्रमे 21.4 टक्के आणि 28.2 टक्के नोंदवला गेला आहे. केपीआयटी टेक्नॉलॉजी कंपनीने आपल्या शेअर धारकांना बऱ्याचवेळा लाभांश वाटप केले आहेत.

केपीआयटी टेक्नॉलॉजी कंपनीचे स्टॉक 2019 मध्ये सूचीबद्ध झाले होते. तेव्हापासून कंपनीने 30 टक्के लाभांश पेआउट दर स्थिर ठेवला आहे. केपीआयटी टेक्नॉलॉजी कंपनीच्या व्यवसाय विस्तार योजना आणि ईव्ही आणि स्वायत्त वाहनांची वाढती मागणी यामुळे कंपनीच्या महसूल आणि नफ्यात वाढ होण्याची शक्यता आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | KPIT Technologies Share Price today on 1 June 2023.

हॅशटॅग्स

KPIT Technologies Share Price(3)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x