25 April 2025 5:56 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Yes Bank Share Price | येस बँक शेअर्स गुंतवणूकदारांसाठी महत्वाची अपडेट, स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: YESBANK
x

L&T Share Price | जबरदस्त! भरवशाचा L&T शेअर मजबूत परतावा देईल, तज्ज्ञांनी जाहीर केली मजबूत टार्गेट प्राईस

L&T Share Price

L&T Share Price | एल अँड टी म्हणजेच लार्सन अँड टूर्बो या भारतातील दिग्गज कंपनीच्या शेअर्स मधील वाढीबाबत तज्ञ उत्साही पाहायला मिळत आहेत. अनेक तज्ञांनी या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याची शिफारस केली होती. चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीच्या निकालापूर्वी भारतीय शेअर बाजारात बरीच उलाढाल पाहायला मिळत आहे. तिमाही अपडेट्समुळे अनेक कंपन्यांचे शेअर्स तेजीत वाढत आहे.

या वर्षी भारतात लोकसभेच्या निवडणुका आणि अंतरिम बजेट देखील येणार आहे. त्यामुळे भारतातील निवडक काही क्षेत्रांवर तेजीचा कल कायम राहणार आहे. यामधे इन्फ्रा आणि बांधकाम कंपन्यांना मोठा फायदा होऊ शकतो.

ब्रोकरेज फर्म यूबीएसच्या तज्ञांनी एल अँड टी कंपनीच्या शेअर्सबाबत आपले मत व्यक्त केले आहे. तज्ञांच्या मते, एल अँड टी स्टॉक पुन्हा एकदा फोकसमध्ये येऊ शकतो. याशिवाय तज्ञांनी स्टॉकवरील टारगेट प्राइस देखील मोठ्या प्रमाणात वाढवली आहे. तज्ञांच्या मते एल अँड टी कंपनीचे शेअर्स या वर्षात जबरदस्त कमाई करून देऊ शकतात.

तज्ञांनी एल अँड टी कंपनीच्या शेअर्सची टारगेट प्राइस 3600 रुपये किमतीवरून वाढवून 4400 रुपये केली आहे. तज्ञांच्या मते, कंपनीची मूळ कमाई आणि रिटर्न रेशोमध्येही सुधारणा पाहायला मिळत आहे. यासह कंपनीकडे अनेक नवीन ऑर्डरचा ओघ प्रचंड वाढला आहे. आज बुधवार दिनांक 10 जानेवारी 2024 रोजी एल अँड टी स्टॉक 0.94 टक्के घसरणीसह 3,522.50 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

2024 या वर्षात एल अँड टी सारख्या मोठ्या कंपन्यांना मोठ्या ऑर्डरमधून कमाई करण्याची मोठी संधी मिळणार आहे. चांगल्या ऑर्डर सायकलमुळे एल अँड टी कंपनीच्या मार्जिनमध्ये देखील सुधारणा पाहायला मिळेल.

मागील एका महिन्यात एल अँड टी कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 4 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर मागील सहा महिन्यात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 44 टक्के नफा कमावून दिला आहे. मागील एका महिन्यात एल अँड टी कंपनीच्या शेअर्सची किंमत तब्बल 67 टक्के वाढली आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | L&T Share Price NSE Live 10 January 2024.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

L&T Share Price(43)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

close ad x
Marathi Matrimony