29 June 2024 8:59 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 30 जून 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Numerology Horoscope | 30 जून 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा रविवारचा दिवस कसा असेल Standard Capital Share Price | शेअर प्राईस 1 रुपये 58 पैसे! चिल्लर गुंतवणूक करा, 6 महिन्यात दिला 490% परतावा BEL Share Price | संधी सोडू नका! PSU स्टॉक फायद्याचा ठरणार, शॉर्ट टर्ममध्ये होईल मोठी कमाई Yes Bank Share Price | येस बँक सहित हे 3 शेअर्स मालामाल करणार, सपोर्ट लेव्हलसह टार्गेट प्राईस जाहीर Penny Stocks | शेअर प्राईस 1 रुपया 11 पैसे! हे 10 पेनी शेअर्स मालामाल करणार, रोज अप्पर सर्किट हिट Vodafone Idea Share Price | कंपनीबाबत मोठी अपडेट, शेअरवर होणार परिणाम, स्टॉक BUY करावा?
x

L&T Share Price | कंपनीच्या ऑर्डर बुक 4.75 लाख कोटीवर पोहोचली, शेअर परताव्याचा पाऊस पाडणार

L&T Share Price

L&T Share Price | लार्सन अँड टुब्रो या अभियांत्रिकी आणि पायाभूत सुविधा क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या कंपनीच्या ऑर्डर बुकने 4.75 लाख कोटी रुपये मूल्याचा टप्पा ओलांडला आहे. एलआयसी या भारतातील सर्वात मोठ्या विमा कंपनीने देखील लार्सन अँड टुब्रो स्टॉकमध्ये गुंतवणूक केली आहे. या कंपनीचे शेअर्स सोमवारी 3541 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. ( लार्सन अँड टुब्रो कंपनी अंश )

लार्सन अँड टुब्रो कंपनीचे एकूण बाजार भांडवल 4.87 लाख कोटी रुपये आहे. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 3919 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 2367 रुपये होती. आज बुधवार दिनांक 26 जून 2024 रोजी लार्सन अँड टुब्रो स्टॉक 0.45 टक्के वाढीसह 3,604 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

लार्सन अँड टुब्रो कंपनीला नुकताच पॉवर ट्रान्समिशन आणि डिस्ट्रिब्युशन व्यवसायाशी संबंधित 2500 कोटी रुपये मूल्याची ऑर्डर मिळाली आहे. या ऑर्डर अंतर्गत लार्सन अँड टुब्रो कंपनी बॅटरी एनर्जी स्टोरेज सिस्टीमसह 285 मेगावॅट क्षमतेचा सोलर पीव्ही प्लांट उभारणार आहे. हा ग्रीड कनेक्टेड पॉवर प्लांट बिहारमधील लखीसराय जिल्ह्यात कजरा येथे उभारला जाणार आहे.

बिहार सरकार अक्षय ऊर्जेचा पुरेपूर वापर करून या भागात वीज पुरवठा सुनिश्चित करू इच्छिते, ज्यासाठी लार्सन अँड टुब्रो कंपनीला 257 मेगावॅट क्षमतेचे सोलर पीव्ही पॅनल्सची ऑर्डर देण्यात आली आहे. यासोबतच लार्सन अँड टुब्रो कंपनी बॅटरी एनर्जी स्टोरेज सिस्टीमही उभारणार आहे, जेणेकरून वीज निर्मितीमध्ये चढ-उतार टाळता येईल. यामुळे ग्राहकांना व्होल्टेज सपोर्ट प्रदान करण्यात येणार आहे.

मागील सहा महिन्यांत लार्सन अँड टुब्रो कंपनीच्या शेअर्सची किंमत फक्त एक टक्का वाढली आहे. मागील एका वर्षात लार्सन अँड टुब्रो कंपनीच्या शेअर्सची किंमत 2377 रुपये किमतीवरून 50 टक्के अधिक वाढली आहे. लार्सन अँड टुब्रो कंपनीचे शेअर्स 28 जून 2019 रोजी 1553 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या किमतीवरून हा स्टॉक 128 टक्के वाढला आहे. 1 जानेवारी 1999 रोजी लार्सन अँड टुब्रो कंपनीचे शेअर्स 18.22 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या किमतीच्या तुलनेत हा स्टॉक 19335 टक्के वाढला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | L&T Share Price NSE Live 26 June 2024.

हॅशटॅग्स

L&T Share Price(27)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x