6 January 2025 6:17 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाच्या पेनी स्टॉकवर गुंतवणूकदार तुटून पडले, आयुष्य बदलू शकतो हा पेनी शेअर - Penny Stocks 2025 Adani Enterprises Share Price | अदानी एंटरप्रायजेस शेअरमध्ये तेजीचे संकेत, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: ADANIENT Penny Stocks | 1 रुपयाचा पेनी शेअर श्रीमंत करणार, 5 दिवसात 24% परतावा, यापूर्वी 3675% परतावा दिला - Penny Stocks 2025 GTL Share Price | GTL कंपनीचा पेनी शेअर फोकसमध्ये, मालामाल करणार शेअर, फायद्याची अपडेट आली - BSE: 513337 SBI Mutual Fund | या फंडाची एसआयपी बनवतेय करोडपती, या फंडांची यादी सेव्ह करा, श्रीमंत बनवले IREDA Share Price | इरेडा कंपनीबाबत महत्वाची अपडेट, मल्टिबॅगर शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: IREDA Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, फायद्याची अपडेट नोट करा - NSE: INFY
x

Ladki Bahin Yojana | बहिणींनो पुढचा हप्ता येणार की नाही कसा चेक कराल; इथे जाणून घ्या ही सोपी पद्धत, मिळेल योग्य माहिती

Ladki Bahin Yojana

Ladki Bahin Yojana | महाराष्ट्र सरकारची लाडकी बहीण योजना अत्यंत सुपर डुपर हिट ठरलेली आहे. आतापर्यंत बऱ्याच महिलांना त्यांचा हप्ता मिळालेला आहे. महिलांना त्यांच्या गरजेसाठी मुख्यमंत्र्यांकडून प्रत्येक महिन्याला लाडकी बहीण योजनेअंतर्गत 1500 रुपये दिले जात आहेत. परंतु महायुतीचं सरकार निवडून आल्यानंतर योजनेअंतर्गत महिलांना 2100 रुपये लवकरच दिले जाणार आहेत. अशी घोषणा काही दिवसांपूर्वी करण्यात आली होती.

सरकारकडून लाडक्या बहिणींना 2100 रुपये 2025 च्या एप्रिल महिन्यापासून देणार असल्याची शक्यता वाटत आहे. त्याचबरोबर लाडक्या बहिणींना त्यांचा पुढील हप्ता लवकरात लवकर दिला जाणार आहे. येणार होता सहावा असून डिसेंबर महिन्यात दिला जाणार असल्याची माहिती मिळाली आहे.

परंतु बऱ्याच महिलांनी शेवटच्या तारखेपर्यंत लाडक्या बहिणींचे फॉर्म भरून दिले असल्या कारणाने त्यांना हप्ता येणार की नाही अशी शंका वाटत आहे. तुम्हाला सुद्धा अशीच शंका वाटत असेल आणि तुमचं नाव लाडकी बहीण योजनेच्या यादीत आहे की नाही हे चेक करण्यासाठी आम्ही सांगितलेल्या या सोप्या पद्धतींचा वापर करा.

सोप्या पद्धतीने चेक करा स्टेटस :

1. तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने लाडकी बहीण योजनेचे स्टेटस चेक करता येणार आहे. यासाठी तुम्हाला सर्वप्रथम लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर भेट द्यायची आहे. https://testmmmlby.mahaitgov.in/ या अधिकृत वेबसाईटवर भेट द्यायची आहे.

2. लिंकवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर होमोपेज लॉग नावाचं ऑप्शन येईल. या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. जेणेकरून तुम्हाला लाभार्थ्यांचा संपूर्ण स्टेटस पाहता येईल.

3. या स्टेटसमध्ये तुम्हाला लाडकी बहीण योजनेअंतर्गत कोणकोणत्या महिला सामील आहेत त्या सर्वांची लिस्ट तुम्हाला पाहता येणार आहे. त्या लिस्टमध्ये तुम्हाला तुमचं नाव शोधून काढायचं आहे.

4. समजा तुम्हाला लाडकी बहीण योजनेची यादी डाऊनलोड करायची असेल तर google वर तुमच्या शहराजवळील महानगरपालिकेचं नाव टाकायचं आहे. आता तुम्हाला लाभार्थ्यांची पूर्णपणे यादी पाहायला मिळेल. ज्यामध्ये तुम्ही तुमचं नाव चेक करू शकता.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Ladki Bahin Yojana 01 December 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

#Ladki Bahin Yojana(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x