15 January 2025 2:11 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Apollo Micro Systems Share Price | अपोलो मायक्रो सिस्टीम शेअर फोकसमध्ये, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: APOLLO Quant Mutual Fund | पगारदारांनो, टॅक्स वाचेल आणि पैसा 3 ते 4 पटीने वाढेल, ही म्युच्युअल फंड योजना मालामाल करेल IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, प्राईस बँड सह डिटेल्स नोट करा, कमाईची संधी सोडू नका 8th Pay Commission | 8'व्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट, सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी IRFC Share Price | IRFC शेअर विक्रमी उच्चांकावरून 69 टक्क्यांनी घसरला, आता फायद्याची अपडेट आली - NSE: IRFC Flipkart Sale | फ्लिपकार्टची धमाकेदार ऑफर; 9999 रुपयांपासून सुरू स्मार्टफोनच्या किंमती, घाई करा, पैशाची बचत करा NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन शेअरबाबत मोठे संकेत, तज्ज्ञांकडून SELL रेटिंग, नेमकं कारण काय - NSE: NTPCGREEN
x

Lancer Container Share Price | लॉटरी लागली! लॅन्सर कंटेनर लाइन्स शेअर्सवर पुन्हा फ्री बोनस शेअर्स मिळणार? तपशील जाणून घ्या

Lancer Container Share Price

Lancer Container Share Price | लॅन्सर कंटेनर लाइन्स कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक चालू आठवड्यात आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत लॅन्सर कंटेनर लाइन्स कंपनीचे संचालक आपल्या पात्र शेअरधारकांना मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा करु शकतात. बोनस शेअर्सचा निर्णय घेतल्यास त्याच दिवशी रेकॉर्ड तारीख देखील निश्चित केली जाईल.

मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये लॅन्सर कंटेनर लाइन्स कंपनीचे शेअर 0.49 टक्क्यांच्या वाढीसह 203.40 रुपये किंमत पातळीवर क्लोज झाले होते. आज सोमवार दिनांक 7 ऑगस्ट 2023 रोजी लॅन्सर कंटेनर लाइन्स कंपनीचे शेअर्स 1.97 टक्के वाढीसह 207.40 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

बोनस शेअरचा इतिहास :

लॅन्सर कंटेनर लाइन्स कंपनीने यापूर्वी देखील आपल्या शेअर धारकांना मोफत बोनस शेअर्स वाटप केले आहेत. जानेवारी 2018 आणि ऑक्टोबर 2021 मध्ये कंपनीने आपल्या शेअर धारकांना मोफत बोनस शेअर्स वाटप केले होते. ऑक्टोबर 2021 मध्ये लॅन्सर कंटेनर लाइन्स कंपनीने गुंतवणुकदारांना एका शेअरवर 2 बोनस शेअर्स वाटप केले होते. 2018 मध्ये कंपनीने गुंतवणूकदारांना 5 शेअर्सवर 3 बोनस शेअर्स वाटप केले होते.

गुंतवणुकीवर परतावा :

मागील एका वर्षात लॅन्सर कंटेनर लाइन्स कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 56.61 टक्क्यांहून अधिक नफा कमावून दिला आहे. त्याच वेळी ज्या गुंतवणूकदारांनी सहा महिन्यांपूर्वी लॅन्सर कंटेनर लाइन्स कंपनीच्या शेअर्सवर पैसे लावले होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य 16.48 टक्क्यांनी वाढले आहे. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 41.76 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर मागील पाच दिवसात या कंपनीच्या शेअरची किंमत 7.74 टक्के वाढली आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Lancer Container Share Price today on 07 August 2023.

हॅशटॅग्स

Lancer Container Share Price(3)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x