21 February 2025 11:38 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Home Loan Charges | 90 टक्के पगारदारांना माहित नाही, बँकेतून गृह कर्ज घेताना कोणकोणते चार्जेस वसूल केले जातात 5G Mobile Under 10000 | स्मार्टफोन सॅमसंग Galaxy F06 5G ची भारतात सेल सुरू, किंमत फक्त 10,000 रुपये, इथे पहा ऑफर्स VIDEO | पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या त्या कृत्याने टाळ्यांचा कडकडाट, शरद पवारांसोबत कार्यक्रमात हजेरी Bonus Share News | 1 वर 1 फ्री बोनस शेअर देणार ही कंपनी, स्टॉक खरेदीला गर्दी, रेकॉर्ड डेट पूर्वी गुंतवणूकदारांची धावपळ UPI ID | आता UPI द्वारे पेमेंट करताना मोजावे लागतील एक्सट्रा चार्जेस, या गुगल-पे ने केली सुरुवात, अपडेट जाणून घ्या Railway Ticket Booking | ऑनलाइन की काऊंटर रेल्वे टिकीट, दोघांमधील स्वस्त तिकीट कोणते, हे माहित असु द्या Home Loan with SIP | पगारदारांनो, होम लोन EMI सह 15% एसआयपी करा, लोन फिटताच संपूर्ण व्याज वसूल होईल
x

Land Rates | गाव खेडयात जमिनीचे नेमके सरकारी भाव कसे समजतील? या पध्दतीने घरबसल्या तुमच्या गावातील जमिनीचे भाव जाणून घ्या

Land Rates

Land Rates | अनेक व्यक्ती सध्या शहर सोडून गावाकडे शेती व्यवसाय करण्याचा निर्णय घेतात. शहरात नोकऱ्यांचे प्रमाण खूप कमी आहे तसेच बेरोजगारीला सामोरे जावे लागते. अशात गावी एखादी जमीन घेऊन त्यात शेती करताना आधी आपल्याला त्या जमिनीचा दर माहीत असणे गरजेचे आहे.

आता तुम्ही जर गावाकडे जमीन अथवा घरासाठी जागा पाहत असाल तर ही बातमी तुमच्या खूप फायद्याची आहे. जेव्हा आपण नवीन जमीन खरेदी करण्याचा विचार करतो तेव्हा सर्वात आधी आपल्याला त्या जमिनीचा सरकारने ठरवलेला दर किती आहे हे माहीत असेल पाहिजे. यासाठी तुम्हाला कोणत्याही ऑफिसच्या फेऱ्या न करता घरबसल्या ही माहिती मिळवता येऊ शकते.

ऑनलाईन पद्धतीने ही माहिती तुम्ही कधीही आणि कुठेही मिळवू शकता :
* यासाठी प्रथम तुमच्या गुगलमध्ये igrmaharashtra.gov.in हे सर्व करा.
* यानंतर तुमच्या समोर महाराष्ट्र शासनाची मुद्रांक विभाग आणि नोंदणीची वेबसाईट समोर येईल.
* यानंतर डाव्या दिशेला असलेल्या टॅबवर क्लिक करा.
* तिथे मिळकत मुल्यांक हा पर्याय तुम्हाला दिसेल. त्यावर क्लिक करा.
* त्यानंर पुढे बाजारमूल्य दर पत्रक तुम्हाला दिसेल.
* त्यावर महाराष्ट्र शासनाचा नकाशा देखील असेल.
* त्यानंतर आधी जिल्ह्याची एक यादी तुम्हाला दिसेल.
* त्यापैकी जिथे तुम्ही जागा पाहत आहात.
* ती ज्या जिल्ह्यात येते तो जिल्हा निवडा.

प्रत्येक वर्षाने जमिनीचे दर बदलत असतात. त्यामुळे तुम्हाला ज्या वर्षाची माहिती हवी आहे ते वर्ष निवडा. नंतर तालुका आणि गाव या पर्यायात तुमचे गाव आणि तालुका नीट निवडा. असे केल्यावर तुम्हाला त्या जमिनीचे सरकारी दर किती आहेत हे समजेल. यावर दिसणार दर हा प्रती हेक्टर नुसार आहे. हे लक्षात ठेवा. यामध्ये तुम्ही बागत जमीन, जिरायत जमीन, हायवे लगत आलेली जमीन, एमयडीसी अंतर्गत येणारी जमीन या सर्व प्रकारच्या जमिनींचे भाव तुम्हाला समजतील.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title : Land Rates Find out at home with this method how much is the government price of your land 19 October 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

Land Rates(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x