17 April 2025 7:41 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 18 एप्रिल 2025, तुमच्यासाठी शुक्रवारचा दिवस कसा असेल? तुमचे शुक्रवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शुक्रवार 18 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Yes Bank Share Price | येस बँकेचा पेनी स्टॉक मालामाल करणार, तज्ज्ञांनी सांगितली टार्गेट प्राईस - NSE: YESBANK Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर्स फोकसमध्ये, तज्ज्ञांनी दिली महत्वाची अपडेट, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: TATAMOTORS BEL Share Price | डिफेन्स कंपनीचा मल्टिबॅगर शेअर फोकसमध्ये, तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: BEL Tata Steel Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा स्टील शेअर मालामाल करणार, टार्गेटप्राईस अपडेट - NSE: TATASTEEL Reliance Power Share Price | रिलायन्स पॉवर शेअर्स तेजीत, 1 महिन्यात 21% परतावा दिला, टार्गेट जाणून घ्या - NSE: RPOWER
x

Landmark Cars Share Price | लिस्टिंगच्या 1 महिन्यात मोठी कमाई, आता परकीय गुंतवणूकदारही जोरदार खरेदी करत आहेत, कारण काय?

Landmark Cars Share Price

Landmark Cars Share Price | लँडमार्क कार्स कंपनीच्या शेअर्स मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये आपली 52 आठवड्यांची नवीन उच्चांक पातळी स्पर्श केली होती. प्रचंड विक्रीचा दबाव असूनही कंपनीच्या शेअर्सनी उसळी घेतली होती. लँडमार्क कार्स कंपनीच्या 2.5 लाखांहून अधिक इक्विटी शेअर्सची ट्रेडिंग झाली होती. कंपनीचे शेअर्स मोठ्या प्रमाणात बुल्क डीलद्वारे विकले गेले होते. या कंपनीचा IPO मागील महिन्यात डिसेंबर 2022 मध्ये शेअर बाजारात सूचीबद्ध झाला होता. कंपनीच्या शेअर्सने आपल्या IPO किंमतीच्या तुलनेत 15 टक्के अधिक परतावा कमावून दिला आहे.  (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Landmark Cars Share Price | Landmark Cars Stock Price | BSE 543714 | NSE LANDMARK)

डील बद्दल सविस्तर :
BofA Securities Europe SA या गुंतवणूक फर्मने लँडमार्क कार्स कंपनीमधील आपले 2,50,218 इक्विटी शेअर्स खुल्या बाजारात विकले होते. NSE वेबसाईट वर उपलब्ध डेटानुसार BofA Securities Europe SA या गुंतवणूक फर्मने 576.04 प्रति शेअर या किमतीवर 14.41 कोटीं रुपयेचे शेअर्स विकले. आणखी एक गुंतवणूक कंपनी गिरिक वेल्थ अॅडव्हायझर्स प्रायव्हेट लिमिटेड पीएमएस या कंपनीने लँडमार्क कार्स कंपनीतील 4,36,875 इक्विटी शेअर्स 24.63 कोटी रुपये मूल्याचे शेअर्स 563.74 किमतीवर खरेदी केले.

शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये NSE इंडेक्सवर लँडमार्क कार्स कंपनीचे शेअर्स 25.55 म्हणजेच 4.83 टक्क्यांच्या वाढीसह 554 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. त्या आधीच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीच्या स्टॉकने 581.70 रुपये ही आपली 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत गाठली होती. 23 डिसेंबर 2022 रोजी लँडमार्क कार्स कंपनीचे शेअर्स NSE इंडेक्सवर 471 रूपये या किमतीवर लिस्ट झाले होते, जे IPO किमतीच्या 7 टक्के कमी होते. 26 डिसेंबर 2022 रोजी या कंपनीचा स्टॉक 431.15 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या नीचांक किंमत पातळीवर ट्रेड करत होता. तर सोमवार दिनांक 9 जानेवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.23 टक्के घसरणीसह 552.70 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

आयपीओ बद्दल थोडक्यात :
लँडमार्क कार्स कंपनीचा IPO 13 डिसेंबर 2022 ते 15 डिसेंबर 2022 या कालावधीत गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला होता. शेवटच्या दिवशी IPO 3.06 पट अधिक सबस्क्राईब झाला होता. Landmark Cars कंपनीच्या IPO ला पात्र संस्थात्मक गुंतवणुकदार आणि गैर-संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून अप्रतिम प्रतिसाद मिळाला होता. संस्थात्मक गुंतवणुकदार आणि गैर-संस्थात्मक गुंतवणूकदार या दोन श्रेणीतील राखीव शेअर्स कोटा अनुक्रमे 8.71 पट आणि 1.32 पट अधिक सबस्क्राइब झाला होता. या कंपनीच्या IPO ची किंमत बँड 481 रुपये ते 506 रुपये प्रति शेअर जाहीर करण्यात आली होती.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Landmark Cars Share Price 543714 in focus check details on 09 January 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Multibagger IPO(35)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या