18 November 2024 6:02 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IREDA Share Price | मल्टिबॅगर IREDA शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY, Sell की Hold करावा - NSE: IREDA Suzlon Share Price | रॉकेट स्पीडने होणार कमाई, स्टॉक चार्टवर मोठे संकेत, शेअर्सची जोरदार खरेदी - NSE: SUZLON IPO GMP | तयार राहा, धमाकेदार IPO येतोय, पहिल्याच दिवशी 100% परतावा मिळेल, संधी सोडू नका - GMP IPO Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल सहित हे 3 शेअर्स मालामाल करणार, 52% पर्यंत परतावा मिळेल - NSE: JIOFIN ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही फंडाची योजना, 1 लाखाचे होतील 1 कोटी, तर 5000 SIP चे होतील 2.50 कोटी रुपये Smart Investment | पोस्टाची TD देते भरगोस व्याज; 1 लाख रुपयांच्या FD वर 1,2,3 आणि 5 वर्षांत किती मिळेल परतावा, रक्कम नोट करा Penny Stocks | फक्त 1 रुपया ते 3 रुपये किंमतीचे हे 4 शेअर्स श्रीमंत करतील, कंपनी फंडामेंटल्स मजबूत - Penny Stocks 2024
x

Landmark Cars Share Price | मार्ग श्रीमंतीचा! लँडमार्क कार्स शेअरने 2 दिवसात 22 % परतावा दिला, अजून एका बातमीने मल्टिबॅगरची चाहूल?

Landmark Cars Share Price

Landmark Cars Share Price | मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये लँडमार्क कार्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स 19 टक्क्यांच्या वाढीसह ट्रेड करत होते. मात्र आज या कंपनीच्या शेअरमध्ये नफा वसुली पाहायला मिळत आहे. लँडमार्क कार्स लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये अचानक वाढ होण्याचे कारण म्हणजे, हा कंपनीने भारतातील दिग्गज वाहन निर्माता कंपनी महिंद्रासोबत एक करार केला आहे.

या कराराची बातमी शेअर बाजारात पसरताच गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात स्टॉक खरेदी करायला सुरुवात केली. आज सोमवार दिनांक 11 सप्टेंबर 2023 रोजी लँडमार्क कार्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स 2.68 टक्के घसरणीसह 787.55 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

लँडमार्क कार्स लिमिटेड कंपनीचा IPO डिसेंबर 2022 रोजी शेअर बाजारात गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला होता. लँडमार्क कार्स लिमिटेड कंपनीने सेबीला दिलेल्या माहितीनुसार, भारतातील दिग्गज वाहन निर्माता कंपनी महिंद्रा आणि लँडमार्क कार्स लिमिटेड यांनी एक सामंजस्य करार संपन्न केला आहे.

या करारानुसार ममता बॅनर्जी शासित पश्चिम बंगाल राज्यातील हावडा शहरात लँडमार्क कार्स लिमिटेड कंपनीने महिंद्रा कंपनीची डीलरशिप सुरू करणार आहे. या डीलरशिपद्वारे, लँडमार्क कार्स लिमिटेड कंपनी हावडा, हुगळी, कोलकाता, उत्तर 24 परगणा आणि दक्षिण 24 परगणा या जिल्ह्यात सेल्स आणि पिकअप संबंधित कामकाज हाताळणार आहे.

मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये लँडमार्क कार्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स 11.83 टक्के वाढीसह 810.95 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. 7 सप्टेंबर 2023 पर्यंत लँडमार्क कार्स लिमिटेड कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 74 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील सहा महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 46 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 11 टक्के नफा कमावून दिला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Landmark Cars Share Price today on 11 September 2023.

हॅशटॅग्स

Landmark Cars Share Price(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x