24 January 2025 3:02 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा इशारा, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN Zomato Share Price | झोमॅटो शेअर मालामाल करणार, मोतीलाल ओसवाल ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: ZOMATO HDFC Bank Share Price | एचडीएफसी बँक शेअर 5 रुपयांवरून 1665 रुपयांवर पोहोचला, पुढची टार्गेट नोट करा - NSE: HDFCBANK Wipro Share Price | विप्रो शेअर 7 रुपयांवरून 317 रुपयांवर पोहोचला, आता पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: WIPRO Bonus Share News | संधी सोडू नका, ही कंपनी फ्री बोनस शेअर्स देणार, शेअरने 4038 टक्के परतावा दिला - BOM: 531771 Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: TATAPOWER Personal Loan | पर्सनल लोन घेऊन स्वतःचा व्यवसाय सुरू करताय, लोन घेण्याआधी या गोष्टींवर नजर फिरवा
x

LIC Share Price | एलआयसीच्या गुंतवणूकदाराचे मोठे नुकसान | शेअर्स इश्यू प्राइसवरून 25 टक्क्यांनी खाली

LIC Share Price

LIC Share Price | अलीकडेच लिस्टेड झालेली देशातील सर्वात मोठी विमा कंपनी एलआयसीच्या शेअर्समध्ये घसरण सुरूच आहे. गुरुवारी हा शेअर नव्या नीचांकी पातळीवर आला. गुरुवारी हा शेअर आणखी दोन टक्क्यांनी घसरून ७२३.७ रुपयांवर आला. त्यानंतर त्यात थोडीफार रिकव्हरी पाहायला मिळाली. एलआयसीचे शेअर्स ९४९ रुपयांच्या इश्यू प्राइसवरून जवळपास २५ टक्क्यांनी घसरले आहेत.

प्रत्येक पॉलिसीधारकाचे मोठे नुकसान :
एलआयसीच्या आयपीओची सब्स्क्रिप्शन घेणाऱ्या प्रत्येक गुंतवणूकदाराचे मोठे नुकसान झाले आहे. ज्या पॉलिसीधारकांना प्रति शेअर ६० रुपये सवलत मिळाली आणि ४५ रुपयांची सूट मिळालेल्या किरकोळ गुंतवणूकदारांनाही २० टक्क्यांपर्यंत नुकसान झाले आहे.

मार्केट कॅपमध्ये कपात :
सरकारी विमा कंपनीचे शेअर्स सहा लाख कोटी रुपयांच्या बाजार भांडवलासह सूचीबद्ध करण्यात आले होते. ती आता ४.६ लाख कोटींवर आली आहे. दलाल स्ट्रीटवरील एलआयसीच्या शेअरला दिलेली भेट गुंतवणूकदारांसाठी त्रासदायक ठरली आहे. कारण आतापर्यंत या शेअरमधील गुंतवणूकदारांचे 1.4 लाख कोटी रुपये बुडाले आहेत.

लिस्टिंग कमकुवत झाली:
गेल्या महिन्यात एलआयसीच्या शेअर्समध्ये इश्यू प्राइसमधून 9 टक्के सूट देण्यात आली होती. असे असूनही लिस्टिंगच्या वेळी ही कंपनी मार्केट कॅपच्या बाबतीत पाचव्या क्रमांकाची कंपनी होती. आयसीआयसीआय बँकेनंतर आता ते सातव्या स्थानावर घसरले आहे.

या स्टॉकबाबत तज्ज्ञांचं मत काय आहे :
स्वस्तिक इन्व्हेस्टमार्टच्या तज्ज्ञांनी अलीकडेच एका नोटमध्ये म्हटले होते की, भारताच्या विमा बाजारात खूप क्षमता आहे. त्याचबरोबर वाढीच्या सर्व शक्यतांचा लाभ घेण्याचीही स्थिती आहे. ते म्हणाले होते की, एलआयसीचे आधीच अनेक फायदे आहेत. त्यांच्या मते दीर्घ मुदतीसाठी गुंतवणूक करणारे गुंतवणूकदार या शेअरवर पॆसे गुंतवू शकतात.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: LIC Share Price 25 percent below from issue price check details 09 May 2022.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x