24 January 2025 12:00 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा इशारा, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN Zomato Share Price | झोमॅटो शेअर मालामाल करणार, मोतीलाल ओसवाल ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: ZOMATO HDFC Bank Share Price | एचडीएफसी बँक शेअर 5 रुपयांवरून 1665 रुपयांवर पोहोचला, पुढची टार्गेट नोट करा - NSE: HDFCBANK Wipro Share Price | विप्रो शेअर 7 रुपयांवरून 317 रुपयांवर पोहोचला, आता पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: WIPRO Bonus Share News | संधी सोडू नका, ही कंपनी फ्री बोनस शेअर्स देणार, शेअरने 4038 टक्के परतावा दिला - BOM: 531771 Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: TATAPOWER Personal Loan | पर्सनल लोन घेऊन स्वतःचा व्यवसाय सुरू करताय, लोन घेण्याआधी या गोष्टींवर नजर फिरवा
x

LIC Share Price | एलआयसी शेअर्समध्ये जोरदार तेजी, लेटेस्ट अपडेटचा फायदा LIC पॉलिसीधारकांना सुद्धा होणार

LIC Share Price

LIC Share Price | एलआयसी म्हणजेच लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया या सरकारी विमा कंपनीचा स्टॉक आपल्या गुंतवणूकदारांना मालामाल करत आहे. मागील सात वर्षांत एलआयसी कंपनीच्या पॉलिसीधारकांना अंतरिम बोनसशी संबंधित 25,464 कोटी रुपये आयकर रिफंड मिळाला आहे.

एलआयसी कंपनीने गुरुवारी सेबीला माहिती दिली को, आयकर अपीलीय न्यायाधिकरणाच्या आदेशानुसार इन्कम टॅक्स विभागाने 25,464.46 कोटी रुपये रिफंडची नोटीस जारी केली आहे. आज सोमवार दिनांक 15 जानेवारी 2024 रोजी एलआयसी स्टॉक 2.55 टक्के वाढीसह 850.45 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

चालु आर्थिक वर्षात सप्टेंबर 2023 तिमाहीमध्ये एलआयसी कंपनीने 17,469 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. मागील वर्षी याच तिमाही कालावधीत एलआयसी कंपनीचा निव्वळ नफा 16,635 कोटी रुपये नोंदवला गेला होता. सेबी फाइलिंगनुसार, चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत, एलआयसी कंपनीच्या वैयक्तिक उत्पन्न विभागात नवीन व्यवसाय प्रीमियम 2.65 टक्क्यांच्या वाढीसह 25,184 कोटी रुपये नोंदवला गेला होता. मागील वर्षीच्या याच सहामाही कालावधीत एलआयसी कंपनीचा वैयक्तिक उत्पन्न विभागातील नवीन व्यवसाय प्रीमियम 24,535 कोटी रुपये नोंदवला गेला होता.

एलआयसी कंपनीचा नवीन व्यवसाय प्रीमियम हा जीवन विमा कराराच्या पहिल्या पॉलिसी वर्षात देय असलेला प्रीमियम आहे. विमा क्षेत्राची नियामक म्हणून काम करणारी संस्था IRDAI नुसार, पहिल्या वर्षाच्या प्रीमियम उत्पन्नाद्वारे मोजल्या जाणार्‍या मार्केट शेअरच्या संदर्भात, एलआयसी कंपनीने जीवन विमा व्यवसायाचा जवळपास 58.50 टक्के वाटा काबीज केला आहे. 30 सप्टेंबर 2023 रोजी संपलेल्या सहामाहीत एलआयसी कंपनीचा वैयक्तिक व्यवसायातील वाटा 40.35 टक्के होता. आणि आणि विमा क्षेत्रातील समूह व्यवसायात एलआयसी कंपनीचा एकूण वाटा 70.26 टक्के होता.

मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये एलआयसी कंपनीचे शेअर्स 0.72 टक्क्यांच्या घसरणीसह 828 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. 12 जानेवारी 2023 च्या ट्रेडिंग सेशनमध्ये सुरुवातीच्या काही तासात एलआयसी स्टॉक 1 टक्क्यांनी घसरला होता. कारण एलआयसी कंपनीला मुंबईतील आयकर कार्यालयाने 3,528.75 कोटी रुपये रिफंड बाबत दोन मागणी पात्र पाठवले होते. आज मात्र एलआयसी स्टॉकमध्ये जोरदार तेजी पाहायला मिळत आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | LIC Share Price NSE Live 15 January 2024.

हॅशटॅग्स

#LIC Share Price(104)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x