LIC Share Price | LIC च्या शेअर्सची नवीन टार्गेट प्राईस, तज्ञांनी 'BUY' रेटिंग दिलं, स्टॉकमध्ये सुसाट तेजीचे संकेत, वाचा कारण
LIC Share Price | काल आठवड्याच्या पहिल्या दिवशी LIC च्या गुंतवणूकदारांसाठी एक आनंदाची बातमी आली. LIC कंपनीचे शेअर्स 6 टक्क्यांच्या वाढीसह ट्रेड करत होते. चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर होताच LIC कंपनीच्या शेअर्समध्ये कमालीची वाढ पाहायला मिळाली होती. LIC कंपनीने मागील आठवड्यात दुसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले, या निकालात LIC ने 15,952 कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला असल्याचे जाहीर केले आहे. गेल्या आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत LIC ने 1,434 कोटी रुपयांचा निव्वळ नफा संकलित केला होता.
गुंतवणूकदारांचे अच्छे दिन :
सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सुरुवातीच्या काही तासात बीएसई निर्देशांकावर एलआयसी कंपनीचे शेअर्स 6.66 टक्क्यांच्या वाढीसह 669 रुपये प्रति शेअर किमतीवर ट्रेड करत होते. त्याच वेळी, नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या निफ्टी इंडेक्समध्ये LIC कंपनीच्या शेअर्समध्ये 6.45 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली होती, आणि शेअर 668.20 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. मागील एका महिन्यात NSE निर्देशांकावर LIC कंपनीचे शेअर्स 8.58 टक्क्यांनी वधारले होते. मात्र, या तेजीनंतरही शेअर्सवर विक्रीचा दबाव वाढू लागला आणि स्टॉकची किंमत लिस्टिंग किमतीपेक्षा अधिक पडली. LIC कंपनीची IPO मध्ये इश्यू किंमत 949 रुपये होती, आणि शेअर्स नॅशनल स्टॉक एक्स्चेंज निर्देशांकावर 872 रुपये किमतीवर सूचीबद्ध झाले होते.
शेअर्स 900 रुपयांच्या पुढे जाणार :
प्रसिद्ध भारतीय ब्रोकरेज फर्म ICICI सिक्युरिटीजने आपल्या अहवालात म्हंटले आहे की, पॉलिसीच्या अतिरिक्त विक्रीमुळे LIC च्या व्यवसायात वाढ पाहायला मिळाली आहे. LIC चा वाढता उद्योग आणि भारतीय जीवन विम्याची वाढलेली खप एलआयसीला एक उत्तम गुंतवणूक पर्याय बनवते. यामुळेच ब्रोकरेज हाऊसनी LIC कंपनीच्या शेअरमध्ये तेजी येण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. तज्ञांनी हा स्टॉक बाय रेटिंग देऊन खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. आणि आयसीआयसीआय सिक्युरिटीजने LIC कंपनीच्या शेअर्ससाठी 917 रुपये लक्ष्य किंमत निश्चित केली आहे.
IIFL सिक्युरिटीज फर्मचे तज्ञ आपल्या अहवालात म्हणतात की, “ चार्ट पॅटर्नवर एलआयसीच्या शेअर्समध्ये डाऊन ट्रेंड दिसून आला आहे, अल्पावधीत, स्टॉक 700 ते 720 रुपये किमतीवर स्थिर होऊ शकतो”. LIC कंपनीच्या स्टॉकमध्ये ज्यां लोकांनी गुंतवणूक केली आहे, त्यांनी हा स्टॉक होल्ड करावा असा सल्ला तज्ञांनी दिला आहे. त्याच वेळी, नवीन गुंतवणूकदार सध्याच्या किंमत पातळीवर 630 रुपयांचा स्टॉप लॉस लावून स्टॉक खरेदी करू शकतात.
सकारात्मक तिमाही निकाल :
LIC ने आपल्या तिमाही निकालात म्हंटले आहे की, कंपनीने या तिमाहीत एकूण 1,32,631.72 कोटी रुपये नफा संकलित केला आहे, जो मागील वर्षीच्या तिमाहीमध्ये 1,04,913.92 कोटी रुपये होता. LIC ने मागील वर्षीच्या याच कालावधीत 18,72,043.6 कोटी रुपये एकूण उत्पन्न जमा केले होते, जे या तिमाहीत वाढून 22,29,488.5 कोटी रुपयेपर्यंत गेले आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title| LIC share price Return on investment after announcing Profitable quarterly results on 15 November 2022.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Flipkart Sale | फ्लिपकार्टची धमाकेदार ऑफर; 9999 रुपयांपासून सुरू स्मार्टफोनच्या किंमती, घाई करा, पैशाची बचत करा
- NBCC Share Price | पीएसयू NBCC शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, मिळेल मजबूत परतावा - NSE: NBCC
- Infosys Share Price | इन्फोसिस शेअरमध्ये तेजीचे संकेत, ब्रोकरेज बुलिश, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: INFY
- Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: JIOFIN
- RVNL Share Price | आरव्हीएनएल कंपनीबाबत फायद्याची अपडेट, बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार शेअर - NSE: RVNL
- Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांना दर महिन्याला 20,000 रुपये मिळतील, ही सरकारी योजना ठरेल खूप फायद्याची
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, स्टॉक मालामाल करणार - NSE: RELIANCE
- Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा इशारा, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: SUZLON
- Loan Guarantor | पगारदारांनो, लोन गॅरेंटर बनण्यापूर्वी हजारवेळा विचार करा, नियम लक्षात ठेवा, अन्यथा तुम्हीच रस्त्यावर याल
- Personal Loan | पर्सनल लोन घेण्यासाठी तुमचा पगार योग्य आहे का, इथे जाणून घ्या योग्य माहिती, कर्ज घेण्यास सोपे जाईल