24 November 2024 5:46 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Smart Investment | बचतीवर 5 कोटी रुपये परतावा हवा असल्यास 40x20x50 फॉर्म्युला शक्य करेल, टिप्स फॉलो करा - Marathi News Property Knowledge | वडिलांच्या मालमत्तेवर मुलींचा किती हक्क, 'या' परिस्थितीत मुली वडिलांकडे मालमत्ता मागू शकत नाहीत SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर रॉकेट स्पीडने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Multibagger Stocks | पैशाचा पाऊस पाडतोय हा मल्टिबॅगर शेअर, तब्बल 4300% परतावा दिला, फायद्याची अपडेट - BOM: 543620 IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका - GMP IPO Sarkari Schemes | गुंतवणुकीसाठी 3 फायद्याच्या सरकारी योजना, सरकार देईल 8.2% पर्यंत परतावा, माहिती जाणून घ्या - Marathi News SBI Online | सरकारी SBI बँकेची जबरदस्त योजना, 50,000 रुपयांची गुंतवणूक देईल 13 लाखांपर्यंत परतावा - Marathi News
x

LIC Share Price | एलआयसी शेअर्स गुंतणूकदारांसाठी आनंदाची बातमी, स्टॉक तेजीत येण्याचे तज्ञांनी दिले संकेत, किती टक्के उसळी घेणार पहा

LIC share price

LIC Share Price | भारतातील प्रसिद्ध विमा कंपनी LIC ने देशातील आतापर्यंतचा सर्वात मोठा IPO आणला होता. गुंतवणूकदार बऱ्याच काळापासून एलआयसीच्या आयपीओसाठी उत्सुक होते. देशातील सर्वात मोठ्या सरकारी कंपनीचा पब्लिक इश्यू अशा वेळी आला होता, जेव्हा भारतीय शेअर बाजाराची स्थिती अस्थिर,आणि अत्यंत वाईट होती. त्यावेळी शेअर बाजारावर विक्रीचा दबाव प्रचंड प्रमाणत वाढला होता. शेअर बाजारातील जवळजवळ सर्वच शेअर्स पडले होते. त्यामुळे LIC चा IPO बाजारात फ्लॉप ठरला. शेअर बाजारात सूचीबद्ध झाल्यानंतर LIC च्या गुंतवणूकदारांना नफ्याऐवजी प्रचंड मोठ्या प्रमाणात तोटा सहन करावा लागला आहे.

LIC ची आजची परिस्थिती :
19 सप्टेंबर रोजी बीएसई निर्देशांकावर LIC कंपनीचा स्टॉक 654.80 रुपये किंमत पातळीवर ट्रेड करत आहे. जर तुम्ही सध्याच्या ट्रेडिंग किमतीची IPO च्या इश्यू किंमतीशी तुलना केली तर , आपल्याला कळेल की सध्याची शेअरची किंमत ही IPO च्या किमतीपेक्षा 31 टक्केने खाली पडली आहे. म्हणजेच IPO मध्ये जर एखाद्या गुंतवणूकदारानी एक लाख रुपये गुंतवले असते, तर आता त्याच्या गुंतवणुकीचे मूल्य 70 हजारांपेक्षा कमी झाले असते.

LIC च्या शेअर्स ची धडपड :
एलआयसी कंपनीचे शेअर्स IPO मध्ये 949 रुपये प्रति शेअर या किमतीने ऑफर केले गेले होते. LIC चा शेअर 17 मे 2022 रोजी शेअर बाजारात सूचीबद्ध करण्यात आला होता. आणि पहिल्याच दिवशी त्यात 8 टक्क्यांची जबरदस्त घसरण पाहायला मिळाली. त्यानंतर हा स्टॉक परत सावरला नाही. सध्या तर LIC चा शेअर 700 रुपयांच्या ही खाली ट्रेड करत आहे. सध्या भारतीय शेअर बाजारात विक्रीचा दबाव कमी असल्यामुळे थोडीफार तेजी दिसून येत आहे, तरीही LIC चे शेअर्स अजूनही पडलेल्या अवस्थेतच ट्रेड करत आहेत. LIC मध्ये गुंतवणूक करून नुकसान सहन करणाऱ्या गुंतवणूकदारांचे दुःख आम्ही समजू शकतो. पण सध्यातरी हा स्टॉक वाढेल असे कोणतेच संकेत दिसत नाही आहेत. LIC च्या शेअर्स नी गुंतवणूकदारांची घोर निराशा केली आहे.

अच्छे दिन आयेंगे?
एलआयसीच्या स्टॉकबद्दल काही चांगली बातमी येत आहे. भारतातील प्रसिद्ध ब्रोकरेज फर्म अॅक्सिस सिक्युरिटीने म्हटले आहे की आता LIC चे वाईट दिवस संपण्याच्या जवळ आहे. भविष्यात यात शेअर मध्ये जबरदस्त वाढ होण्याची शक्यता आहे. ब्रोकरेज फर्मने अंदाज व्यक्त केला आहे की, पुढील एका वर्षात हा स्टॉक 35 टक्क्यांहून जास्त परतावा मिळवून देऊ शकतो. LIC च्या गुंतवणूकदारही ह्या स्टॉकमधून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत आहेत.

तज्ज्ञांनी दिला खरेदीचा सल्ला :
ॲक्सिस ब्रोकरेज फर्मने एलआयसीच्या शेअर्सवर खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. आणि त्याची पुढील लक्ष्य किंमत 900 रुपये ठरवण्यात आली आहे,जी सध्याच्या ट्रेडिंग किमतीपेक्षा 37 टक्के अधिक आहे. LIC ही कंपनी भारतातील विमा क्षेत्रातील सर्वात मोठी विमा कंपनी आहे. आणि LIC कंपनीने शेअर बाजारातही मोठ्या प्रमाणत गुंतवणूक केली आहे. LIC च्या उत्पन्नातील एक मोठा आता हा गुंतवणूक आणि शेअर बाजारातून येतो.

स्टॉकच्या चार्टमध्ये सकारात्मक संकेत :
शेअर बाजारातील गुंतवणूक तज्ञांच्या मते, LIC च्या स्टॉकमध्ये शॉर्ट टर्मसाठी गुंतवणूक करणे फायदेशीर ठरू शकते. शॉर्ट टर्म गुंतवणुकीसाठी LIC चा चार्ट पॅटर्न सकारात्मक दिसत आहे. LIC च्या स्टॉकवर 640 रुपयांच्या किंमत पातळीवर मजबूत सपोर्ट दिसत आहे. सध्या स्टॉकमध्ये जोखीम कमी दिसत असून पुढील येणाऱ्या काळात स्टॉक तेजीत येऊ शकतो, असे मत तज्ञांनी व्यक्त केले आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | LIC share price seems to be rising in short term expert has given positive rating to buy stock on 20 September 2022.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x