19 November 2024 9:09 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
EPF Pension Money | नोकरदारांनो, तुमच्या 60 ते 70 हजाराच्या पगारावर किती EPF पेन्शन मिळणार, संपूर्ण माहितीचा आढावा घ्या Salary Account | पगारदारांनो, केवळ झिरो बॅलन्स नाही तर, सॅलरी अकाउंटवर मिळतात या 5 सुविधा, जाणून आश्चर्यचकित व्हाल SBI Mutual Fund | श्रीमंत करणाऱ्या 5 म्युच्युअल फंड योजना, 10 हजारांचे होतील करोडो रुपये, इथे पैशाने पैसा वाढवा - Marathi News Trident Share Price | 35 रुपयाच्या शेअरची कमाल, दिला 2300 टक्क्यांचा मल्टिबॅगर परतावा, फायदा घ्या - NSE: TECHLABS Yes Bank Share Price | येस बँकबाबत महत्वाची अपडेट, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK RVNL Share Price | RVNL कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर सकारात्मक परिणाम होणार - NSE: RVNL IRFC Share Price | IRFC शेअर फोकसमध्ये, मल्टिबॅगर शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा का - NSE: IRFC
x

Likhitha Infrastructure Share Price | 6 महिन्यांत 62% परतावा देणारा शेअर आता रोज 5 टक्के वाढतोय, स्टॉकमधील वाढीचे कारण?

Likhitha Infra Share Price

Likhitha Infrastructure Share Price | ‘लिखिथा इन्फ्रास्ट्रक्चर’ कंपनीचे शेअर्स शुक्रवार दिनांक 3 फेब्रुवारी 2023 रोजी 5 टक्के अप्पर सर्किटमध्ये 231 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. ट्रेडिंग सेशन दरम्यान या कंपनीच्या शेअरने 234 रुपये या आपल्या इंट्राडे उच्चांक किंमत पातळीला स्पर्श केला होता. स्टॉक मध्ये अचानक वाढ होण्याचे कारण म्हणजे, कंपनीला तेल आणि वायू क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या ‘गेल इंडिया’ कंपनीकडून 129.63 कोटी रुपयांची ऑर्डर प्राप्त झाली आहे. कंपनीला ही ऑर्डर मिळण्याची बातमी येताच शेअर्समध्ये तेजी पाहायला मिळाली. ‘लिखिथा इन्फ्रास्ट्रक्चर’ कंपनीला GAIL इंडिया कंपनीकडून नागपूर शहरात क्रॉस कंट्री पाइपलाइन टाकण्याची ऑर्डर मिळाली आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Likhitha Infrastructure Share Price | Likhitha Infrastructure Stock Price | BSE 543240 | NSE LIKHITHA)

ऑर्डर तपशील :
‘लिखिथा इन्फ्रास्ट्रक्चर’ कंपनीला GAIL इंडिया कंपनीकडून एमएनजेपीएल प्रकल्पांतर्गत ‘नागपूर ते झारसुगुडा’ पर्यंत गॅस पाइपलाइन टाकण्याचे काम मिळाले आहे. लेटर ऑफ इंटेंटच्या तारखेपासून 14 महिन्यांच्या कंपनीला प्रकल्प पूर्ण करावा लागेल. कंपनीच्या संचालक मंडळाने 2 डिसेंबर 2022 रोजी रेकॉर्ड तारखेसह 1 : 2 या प्रमाणात स्टॉक स्प्लिट करण्याची घोषणा केली होती. डिसेंबर 2022 मध्ये अनुभवी गुंतवणूकदार ‘आशिष कचोलिया’ यांनी ‘लिखिथा इन्फ्रास्ट्रक्चर’ कंपनीचे 3.97 लाख शेअर्स खरेदी करून मोठी गुंतवणुक केली होती. आशिष कचोलिया यांच्याकडे कंपनीचे एकूण 2 टक्के भाग भांडवल आहेत. जे त्यांनी 386 रुपये प्रति युनिट दराने खरेदी केले आहेत.

6 महिन्यांत 62 टक्के परतावा :
‘लिखिथा इन्फ्रास्ट्रक्चर’ कंपनीच्या मल्टीबॅगर स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना बंपर कमाई करून दिली आहे. मागील 6 महिन्यांत या कंपनीच्या स्टॉकने आपल्या शेअर धारकांना 62 टक्के परतावा कमावून दिला आहे. लिखिथा इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी पाइपलाइन टाकण्याच्या व्यवसायात गुंतलेली आहे. ही कंपनी तेल आणि गॅस पाइपलाइनसाठी आवश्यक पायाभूत सुविधा आणि बांधकाम, चाचणी आणि प्रकल्प कार्यान्वित करण्याच्या व्यवसायात काम करते. याव्यतिरिक्त ही कंपनी शहर गॅस वितरण प्रकल्प आणि ऑपरेशन व देखभाल संबंधित सेवा देखील प्रदान करते.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Likhitha Infrastructure Share Price 543240 stock market live on 04 February 2023.

हॅशटॅग्स

Likhitha Infra Share Price(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x