15 January 2025 5:15 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 1 रुपया 31 पैशाचा शेअर मालामाल करतोय, अप्पर सर्किट हिट, यापूर्वी 589% परतावा दिला - Penny Stocks 2025 Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांना दर महिन्याला 20,000 रुपये मिळतील, ही सरकारी योजना ठरेल खूप फायद्याची NBCC Share Price | पीएसयू NBCC शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, मिळेल मजबूत परतावा - NSE: NBCC IREDA Share Price | मल्टिबॅगर इरेडा शेअर मालामाल करणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट आली - NSE: IREDA Apollo Micro Systems Share Price | अपोलो मायक्रो सिस्टीम शेअर फोकसमध्ये, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: APOLLO Quant Mutual Fund | पगारदारांनो, टॅक्स वाचेल आणि पैसा 3 ते 4 पटीने वाढेल, ही म्युच्युअल फंड योजना मालामाल करेल IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, प्राईस बँड सह डिटेल्स नोट करा, कमाईची संधी सोडू नका
x

Multibagger Dividend | झाली ना भरघोस कमाई! 3 शेअर्स 550 ते 600 टक्के लाभांश देतं आहेत, पैसे लावा आणि सुखी राहा

Multibagger Dividend

Multibagger Dividend | मागील आठवड्यात भारतीय शेअर बाजारात मोठी चलबिचल पाहायला मिळाली. अनेक कंपन्याचे IPO शेअर बाजारात पदार्पण करण्यास सज्ज आहेत. तर दुसरीकडे अशा 3 कंपन्यां आहेत, ज्यांनी लाभांशाची रेकॉर्ड तारीख जाहीर केली आहे. या कंपन्या आपल्या विद्यमान शेअर धारकांना या आठवड्यात 550-600 टक्के लाभांश वितिरित करणार आहेत. चला तर मग जाणून घेऊ या तीन कंपनीची सविस्तर माहिती.

टायव्ह वॉटर ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड :
या कंपनीने स्टॉक एक्सचेंज नियामकला माहिती दिली आहे की, “कंपनीच्या संचालक मंडळाने 2022-23 या आर्थिक वर्षासाठी 600 टक्के अंतरिम लाभांश देण्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे. या लाभांश वाटपाची रेकॉर्ड तारीख 22 नोव्हेंबर 2022 निश्चित करण्यात आली आहे. कंपनीच्या वतीने आपल्या विद्यमान गुंतवणूकदारांना हा लाभांश 13 डिसेंबर 2022 पूर्वी वाटप केला जाईल. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर 1,002 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या कंपनीच्या शेअरच्या किमत मागील काही काळात 32.47 टक्क्यांनी कमजोर झाली आहे.

EID Parry India :
या कंपनीने स्टॉक मार्केट नियामक ला माहिती दिली आहे की, 2022-23 या आर्थिक वर्षात कंपनीच्या विद्यमान गुंतवणूकदारांना प्रति शेअर 5.50 रुपये लाभांश वाटप केला जाईल. म्हणजेच विद्यमान गुंतवणूकदारांना 550 टक्के या दराने लाभांश दिला जाणार आहे. EID Parry India कंपनीने या लाभांश वाटपसाठी 23 नोव्हेंबर 2022 ही रेकॉर्ड तारीख म्हणून जाहीर केली आहे. कंपनी आपल्या शेअर धारकांना 6 डिसेंबर 2022 रोजी किंवा नंतर लाभांश वाटप करेल. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर 0.64 टक्क्यांच्या घसरणीसह 625.85 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या वर्षी कंपनीच्या शेअर्सची किंमत 37.31 टक्के वधारली आहे.

पॉलीप्लेक्स कॉर्पोरेशन :
पॉलिप्लेक्स कॉर्पोरेशन कंपनीने 2022-23 या आर्थिक वर्षासाठी आपल्या विद्यमान गुंतवणुकदारांना 550 टक्के लाभांश वाटप करण्याचे जाहीर केले आहे. या लाभांश वितरणाची रेकॉर्ड तारीख 25 नोव्हेंबर 2022 असेल. म्हणजेच एक्स लाभांश तारीख 24 नोव्हेंबर 2022 ही असेल. पॉलीप्लेक्स कॉर्पोरेशन कंपनीने स्टॉक एक्सचेंज नियामकला माहिती दिली आहे की, ” कंपनीच्या संचालक मंडळाने आपल्या विद्यमान शेअर धारकांना 10 रुपये दर्शनी मूल्यासह प्रति शेअर 55 रुपये लाभांश वाटप करण्याचे मंजूर केले आहे. पॉलीप्लेक्स कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीचे शेअर्स शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 1.47 टक्क्यांनी वाढले होते. दिवसा अखेर कंपनीच्या शेअर 1845 रुपये किंमत पातळीवर बंद झाले होते. 2022 मध्ये आतापर्यंत या कंपनीच्या शेअरची किंमत 2.11 टक्क्यांनी कमजोर झाली आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| List of Companies has announced Multibagger Dividend to existing shareholders on Record date on 21 November 2022.

हॅशटॅग्स

Multibagger Dividend(9)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x