27 January 2025 10:42 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Bonus Share News | फायदा घ्या, ही कंपनी फ्री बोनस शेअर्स वाटप करणार, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: SBC Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरमध्ये 55% तेजीचे संकेत, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RELIANCE IRFC Share Price | आयआरएफसी शेअर 6 महिन्यात 30% घसरला, तज्ज्ञांकडून महत्वाचे संकेत, पुढे काय होणार - NSE: IRFC RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांचा महत्वाचा इशारा, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: RVNL CIBIL Score | सिबिल स्कोर खराब झालाय, कोणत्याही प्रकारचे कर्ज मिळणार नाही, 'हे' 4 परिणाम होतील EPFO Passbook | लवकरच पगारदारांना ATM च्या माध्यमातून काढता येणार EPF मधील पैसे, अपडेट जाणून घ्या Penny Stocks | कर्ज मुक्त कंपनीचा 2 रुपयाचा पेनी स्टॉक मालामाल करतोय, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: ESSENTIA
x

Multibagger Stock | सरकारी बँकेत नव्हे तर या सरकारी कंपन्यांच्या शेअर्समध्ये पैसे गुंतवा, 2 वर्षात 200 टक्के परतावा, करा कमाई

Multibagger Stocks

Multibagger Stock | 2022 या वर्षात आतापर्यंत अनेक सरकारी कंपन्यांच्या शेअर्सनी आपल्या शेअर धारकांना अप्रतिम परतावा कमावून दिला आहे. या कंपन्यांच्या लिस्टमध्ये Mazagon Dock Shipbuilders Limited , Bharat Dynamics , Bank of Baroda या कंपन्यांचे शेअर्स समाविष्ट आहेत. या सरकारी कंपन्यांच्या शेअर्सनी 2022 या एका वर्षात आपल्या शेअर धारकांना 200 टक्के पेक्षा अधिक परतावा कमावून दिला आहे.

Mazagon Dock Shipbuilders :
या कंपनीने आपल्या गुंतवणुकदारांना 206 टक्के पेक्षा अधिक परतावा कमावून दिला आहे. 2022 या वर्षाच्या सुरुवातीला म्हणजेच 3 जानेवारी 2022 रोजी माझगाव डॉक शिपबिल्डर्स कंपनीचे शेअर्स BSE निर्देशांकावर 283.60 रुपये किंमत पातळीवर ट्रेड करत होते. 16 नोव्हेंबर 2022 रोजी या सरकारी कंपनीचे शेअर्स BSE निर्देशांकावर 868.55 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. Mazagon Dock Shipbuilders या कंपनीच्या शेअर्सनी आपल्या गुंतवणूकदारांना मागील एका वर्षात 202 टक्के पेक्षा अधिक परतावा मिळवून दिला आहे.

भारत डायनॅमिक्स :
भारत डायनॅमिक्स लिमिटेड या कंपनीच्या शेअरने चालू वर्षात लोकांना 145 टक्के परतावा कमावून दिला आहे. 2022 या वर्षाच्या सुरुवातीला म्हणजेच 3 जानेवारी 2022 रोजी या सरकारी कंपनीचे शेअर्स BSE निर्देशांकावर 389.75 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. दारूगोळा, हत्यार, आणि क्षेपणास्त्र प्रणाली बनवणाऱ्या या भारत सरकारची मालकी असणाऱ्या कंपनीचे शेअर्स 16 नोव्हेंबर 2022 रोजी BSE निर्देशांकावर 957.55 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या कंपनीच्या शेअर्सनी आपल्या गुंतवणूकदारांना फक्त एका वर्षात 125 टक्के परतावा मिळवून दिला आहे. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 1026 रुपये आहे.

बँक ऑफ बडोदा :
बँक ऑफ बडोदा या कंपनीच्या स्टॉकने आपल्या गुंतवणुकदारांना 95 टक्के पेक्षा अधिक परतावा मिळवून दिला आहे. या सार्वजनिक क्षेत्रातील बँकेचे शेअर्स 2022 या वर्षाच्या सुरुवातीला म्हणजेच 3 जानेवारी 2022 रोजी BSE निर्देशांकावर 83.75 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. या भारत सरकारची मालकी असलेल्या बँकेचे शेअर्स 16 नोव्हेंबर 2022 रोजी बीएसई इंडेक्सवर 163.35 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. बँक ऑफ बडोदाच्या शेअर्सने मागील फक्त एका वर्षात आपल्या शेअर धारकांना 67 टक्के परतावा मिळवून दिला आहे. या बँकेच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 168.65 रुपये आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| List of PSU Multibagger Stocks has given huge returns in one year to its shareholders and investors on 17 November 2022.

हॅशटॅग्स

#Multibagger Stocks(460)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x