Crorepati Making Shares | तुम्हाला श्रीमंत व्हायचय? या करोडपती शेअर्सची लिस्ट सेव्ह करा, 1 लाखावर 1 कोटी परतावा देत आहेत
Crorepati Making Shares | 1 लाख रुपये गुंतवून तुम्ही 1 कोटी परतावा मिळवू शकता, हे ऐकून तुम्हाला विश्वास बसणार नाही. इतका मोठा परतावा फक्त शेअर बाजारात गुंतवणूक करूनच मिळू शकतो. नुकताच शेअर बाजारातील तज्ज्ञांच्या रडारवर असे काही स्टॉक आले आहेत, ज्यानी आपल्या गुंतवणूकदारांना 1 लाख रुपये गुंतवणुकीवर 1 कोटींहून अधिक परतावा कमावून दिला आहे. शेअर बाजारात असे काही शेअर्स आहेत, ज्यांची ओळख करून तुम्ही पैसे लावले तर, अल्पावधीत तुमची छोटी गुंतवणूक करोडो रुपयेमध्ये परिवर्तीत होऊ शकते. पण असा परतावा फक्त दीर्घकाळ गुंतवणूक केल्यास आणि संयम राखल्यासच मिळू शकतो. आज या लेखात आम्ही तुम्हाला अशा काही शेअर्सची माहिती देणार आहोत, ज्यांनी आपल्या गुंतवणूकदारांना करोडपती बनवले आहेत.
Tanla Platforms :
Tanla Platforms ही एक मिडकॅप कंपनी असून ती आपल्या ग्राहकांना क्लाउड कम्युनिकेशन सेवा प्रदान करते. या कंपनीच्या स्टॉकने मागील 10 वर्षात आपल्या शेअर धारकांना 1 लाख रुपये गुंतवणूककीवर 1 कोटी पेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. 8 डिसेंबर 2012 रोजी या तानला प्लॅटफॉर्म कंपनीचे शेअर्स 6 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आता हा स्टॉक 776 रुपये किमतीवर पोहचला आहे. म्हणजेच या स्टॉकने जवळपास 12000 टक्के परतावा मिळवून दिला आहे.
Alkyl Amines :
Alkyl Amines ही एक मिडकॅप कंपनी असून रासायन निर्मिती क्षेत्रात उद्योग करते. या कंपनीच्या स्टॉकने आपल्या गुंतवणुकदारांना 10 वर्षात 100 पट अधिक परतावा मिळवून दिला आहे. या कंपनीचे शेअर्स 27 रुपये किमतीवर ट्रेड करत होते, त्यात वाढ होऊन आता शेअर 2784 रुपयांवर पोहचले आहेत. या कंपनीच्या शेअर्स ज्या लोकांनी एक लक्ष रुपये गुंतवणूक केली होती, त्यांचे गुंतवणूक मूल्य वाढून आता 1 कोटी पेक्षा अधिक झाली असती.
ज्योती रेजिन्स :
ज्योती रेजिन्स ही एक स्मॉलकॅप कंपनी असून ही कंपनी सिंथेटिक लाकूड पासून वेग वेगळ्या वस्तूची निर्मिती करते. मागील 10 वर्षांपूर्वी या कंपनीचे शेअर्स 3.50 रुपयांवर ट्रेड करत होते, आता हा स्टॉक वाढून 1325 रुपयांवर पोहचला आहे. म्हणजेच या कंपनीच्या शेअरने गेल्या 10 वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना 378 पट म्हणजेच 39000 टक्के परतावा कमावून दिला आहे. या स्टॉक मध्ये ज्या लोकांनी 1 लाखाची गुंतवणूक केली होती, त्यांना आता 3.78 कोटी रुपये परतावा मिळाला आहे.
साधना नायट्रो :
साधना नायट्रो ही एक स्मॉलकॅप कंपनी असून विशेष रासायन उत्पादन उद्योगात गुंतलेली आहे. 10 वर्षांपूर्वी या कंपनीचे शेअर 1 रुपये किमतीवर ट्रेड करत होते, त्यात वाढ होऊन आता स्टॉक 132 रुपयांवर पोहचला आहे. म्हणजेच या कंपनीच्या शेअरने गेल्या 10 वर्षात आपल्या शेअर धारकांना 132 पट अधिक परतावा कमावून दिला आहे. जर तुम्ही या कंपनीच्या स्टॉकमध्ये 1 लाख रुपये लावले असते, तर तुम्हाला आता 1.32 कोटी रुपये परतावा मिळाला असता. 174 रुपये ही या स्टॉकची उच्चांक पातळी किंमत आहे.
GRM ओव्हरसीज :
GRM Overseas ही एक स्मॉलकॅप कंपनी आहे. ही कंपनी मुख्यतः भारतात आणि परदेशात ब्रँडेड आणि नॉन-ब्रँडेड बासमती तांदळाच्या दळण, प्रक्रिया आणि विपणन उद्योगात गुंतलेली आहे. मागील 10 वर्षांपूर्वी या कंपनीचे शेअर्स 2 रुपयांवर ट्रेड करत होते, त्यात आता वाढ होऊन स्टॉक 375 रुपयांवर गेला आहे. म्हणजेच या कंपनीच्या स्टॉकने मागील 10 वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना 184 पट अधिक परतावा कमवून दिला आहे. जर तुम्ही या कंपनीच्या स्टॉकमध्ये 1 लाख रुपये लावले असते, तर तुम्हाला आता 1.84 कोटी रुपये परतावा मिळाला असता.
शिवालिक बिमेटल :
शिवालिक बिमेटल कंट्रोल्स ही एक स्मॉलकॅप कंपनी असून मुख्यतः थर्मोस्टॅटिक बिमेटल/ट्राय मेटल स्ट्रिप्स, घटक, स्प्रिंग रोल्ड स्टेनलेस स्टील, इलेक्ट्रॉन बीम वेल्डेड उत्पादनांची निर्मिती करण्यात आणि विक्री व्यवसायात गुंतलेली आहे. मागील 10 वर्षांपूर्वी या कंपनीचे शेअर्स 3 रुपयांवर ट्रेड करत होते, त्यात वाढ होऊन आता स्टॉक 436.50 रुपयांवर पोहचला आहे. म्हणजेच, या कंपनीच्या शेअर्सनी मागील 10 वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना 140 पट अधिक परतावा मिळवून दिला आहे. जर तुम्ही या कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये लावले असते, तर आज तुम्हाला 1.40 कोटी रुपये परतावा मिळाला असता.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title| List of Shares making investors Crorepati in ten years will small amount of investment on 09 December 2022.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- EPFO Passbook | पगारदारांनो, EPF खात्यातून पैसे काढायचे आहेत, पण क्लेम रिजेक्ट होतोय, अर्जापूर्वी ही काळजी घ्या
- EPFO Pension | नोकरदार आणि पेन्शन्ससाठी अपडेट, आता तुम्हाला कोणत्याही बँकेतून EPFO पेन्शनची रक्कम काढता येणार
- FASTag Alert | तुमच्याकडे 4 चाकी वाहन आहे का, अत्यंत महत्त्वाची अपडेट, या तारखेपासून नवा नियम, मोठा दंड भरावा लागेल
- Smart Investment | सरकारकडून गॅरंटीसह मिळणार फिक्स्ड रिटर्न, अशा पद्धतीने स्मार्ट इन्व्हेस्टमेंट करून पैसा वाढवा
- Income Tax Return | पगारदारांनो, नवीन वर्षात तुमची टॅक्स लायबिलिटी कमी करा, 'हे' 6 पर्याय पैसा वाचवतील
- Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरला आउटपरफॉर्म रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: RELIANCE
- Loan EMI Alert | कर्जबाजारी होण्यापासून वाचायचं असेल तर वर्षाच्या सुरुवातीपासूनच घ्या योग्य काळजी, या टिप्स फॉलो करा
- Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी शेअरबाबत महत्वाचे संकेत, स्टॉक प्राईस अजून घसरणार की तेजी येणार - NSE: SUZLON
- TECNO POP 9 5G | टेक्नो POP 9 5G स्मार्टफोनची बाजारात दमदार एन्ट्री, किंमत केवळ 10,999 रुपये आणि जबरदस्त फीचर्स
- SBI Salary Account | पगारदारांनो, SBI बँकेत सॅलरी अकाउंट ओपन करा, फ्री इन्शुरन्ससहित मिळतील अनेक फायदे