22 December 2024 3:03 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज सहित या 7 शेअर्सवर ब्रोकरेज बुलिश, मिळेल मजबूत परतावा - NSE: TATATECH Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन सहित हे 5 शेअर्स फोकसमध्ये, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत - NSE: SUZLON NHPC Share Price | NHPC सहित या 4 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC SIP Calculator | 12 बाय 12 चा फॉर्म्युला! 1000 रुपयांच्या बचतीतून मिळेल 1 कोटी रुपयांचा परतावा, लक्षात ठेवा SBI Mutual Fund | बिनधास्त गुंतवणूक करा, SBI फंडाची ही योजना श्रीमंत करतेय, संधी सोडू नका Motilal Oswal Mutual Fund | जबरदस्त फंड, 4 ते 5 पटीने परतावा मिळेल, दरवर्षी 44% दराने पैसा वाढले IRFC Share Price | IRFC सहित हे 4 शेअर्स मालामाल करणार, प्रभुदास लिलाधर ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: IRFC
x

Money Making Stocks | दिवाळी मुहूर्तावर पैसा वाढवा, या 7 स्टॉकमध्ये गुंतवणूक करा आणि पैसे वाढवा, लिस्ट सेव्ह करा

Stocks to buy

Stocks To Buy | 24 ऑक्टोबर 2022 रोजी, संवत 2079 ची सुरुवात दिवाळीच्या मुहूर्त ट्रेडिंगने होणार आहे. तुम्हाला तुमच्या पोर्टफोलिओमध्ये काही जबरदस्त शेअर्स जोडण्याची संधी मिळणार आहे. संवत 2079 मधील मुहूर्त ट्रेडिंगसाठी तज्ञ आणि गुंतवणूकदार सकारात्मक दिसत आहेत. तज्ज्ञ आणि गुंतवणूकदारांचे म्हणणे आहे की, देशांतर्गत मॅक्रो परिस्थिती सुधारत चालली आहे. जागतिक भावना सुधारल्यास किंवा युद्ध परिस्थिती निवळल्यास सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये विक्रमी वाढ पाहायला मिळू शकते. ब्रोकरेज हाऊस येस सिक्युरिटीजने पोर्टफोलिओमध्ये सुधारणा करण्यासाठी मजबूत मूलभूत तत्त्वे असलेले 7 स्टॉक निवडले आहेत, जे तुम्ही मुहूर्त ट्रेडिंगवर खरेदी करू शकता.

संवत 2078 मध्ये शेअर बाजार :
संवत 2078 हे वर्ष म्हणजेच मागील वर्षीचा दिवाळीचा काळ शेअर बाजाराच्या दृष्टीने अतिशय अस्थिर आणि चढ उताराचा होता. या काळात जागतिक स्तरावर महागाईचा दर उच्चांक पातळी होता. संवतच्या पहिल्या टप्प्यात क्रूड आणि कमोडिटी या दोन्हींच्या किमती गगनाला भिडल्या होत्या. सध्या रशिया आणि युक्रेन युद्धामुळे भू-राजकीय तणाव अतिशय वाढला असून युद्ध आण्विक युद्धात परिवर्तित होऊ शकतो अशी शक्यता निर्माण झाली आहे. चलनवाढ नियंत्रित करण्यासाठी केंद्रीय बँका सातत्याने व्याज दरात वाढ करत आहे. आंतरराष्ट्रीय पुरवठा साखळीही विस्कळीत झाली आहे. जगातील प्रमुख अर्थव्यवस्थांवर कमालीचा दबाव दिसत असून आर्थिक मंदी येण्याचे संकेत मिळत आहे. त्याच वेळी, कोविडचा प्रभावही महिन्यांत वाढताना दिसून आला आहे.

परिणाम करणारे घटक :
संवत 2079 अशा वेळी सुरू होत आहे, जेव्हा जागतिक तणाव आणि महागाई उच्चांकावर पोहोचली आहे. महागाई भयंकर वाढली असून आर्थिक मंदीची परिस्तिथी निर्माण झाली आहे. कोविडचा प्रकोप गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी झाला आहे, आणि मागणी व पुरवठा साखळी सुधारली आहे. चीनची अर्थव्यवस्था आता खुली होत आहे. क्रूडच्या किमती सर्वकालीन उच्चांकावरून कमी होताना दिसत आहे. पुढील येणाऱ्या तिमाहीत सेंट्रल बँकेच्या धोरणात थोडी नरमाई अपेक्षित असून देशांमध्ये महागाई नियंत्रणात येईल असे संकेत मिळत आहेत. बेरोजगारीच्या आकडेवारीत सुधारणा होईल. याचा परिणाम शेअर बाजारावर पडणार आणि गुंतवणुकदारांना कमाई करण्याची संधी मिळणार. चला तर मग जाणून घेऊ दिवाळी मुहूर्तसाठी निवडलेले खास स्टॉक

दिवाळी मुहूर्तसाठी निवडलेले टॉप 7 स्टॉक :
* श्री सिमेंट सिमेंट : सध्याची ट्रेडिंग किंमत : 21,189 रुपये/ टारगेट प्राईज : 25,450 रुपये / परतावा : 20 टक्के
* ग्रीनप्लाय इंडस्ट्रीज : सध्याची किंमत : 177 रुपये/टारगेट किंमत : 220 रुपये/ परतावा : 24 टक्के
* ICICI प्रुडेन्शियल लाइफ इन्शुरन्स : सध्याची किंमत : 513 रुपये/ टारगेट किंमत : 650 रुपये/ परतावा : 26 टक्के
* प्रेस्टीज इस्टेट प्रकल्प : सध्याची किंमत : 438 रुपये/टारगेट किंमत : 550 रुपये/ परतावा : 25 टक्के
* व्ही-गार्ड इंडस्ट्रीज लि : सध्याची किंमत : 244 रुपये/टारगेट किंमत : 301 रुपये/ परतावा : 23 टक्के
* SBI bank : सध्याची किंमत : 527 रुपये/ टारगेट: 655 रुपये/ परतावा : 24 टक्के
* एचसीएल टेक्नॉलॉजीज : सध्याची किंमत : 1003 रुपये/ टारगेट किंमत : 1210 रुपये/ परतावा : 20 टक्के

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Stocks to buy in Diwali Muhurat for making profitable portfolio on 21 October 2022.

हॅशटॅग्स

#Stocks To BUY(286)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x