15 January 2025 2:40 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IREDA Share Price | मल्टिबॅगर इरेडा शेअर मालामाल करणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट आली - NSE: IREDA Apollo Micro Systems Share Price | अपोलो मायक्रो सिस्टीम शेअर फोकसमध्ये, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: APOLLO Quant Mutual Fund | पगारदारांनो, टॅक्स वाचेल आणि पैसा 3 ते 4 पटीने वाढेल, ही म्युच्युअल फंड योजना मालामाल करेल IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, प्राईस बँड सह डिटेल्स नोट करा, कमाईची संधी सोडू नका 8th Pay Commission | 8'व्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट, सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी IRFC Share Price | IRFC शेअर विक्रमी उच्चांकावरून 69 टक्क्यांनी घसरला, आता फायद्याची अपडेट आली - NSE: IRFC Flipkart Sale | फ्लिपकार्टची धमाकेदार ऑफर; 9999 रुपयांपासून सुरू स्मार्टफोनच्या किंमती, घाई करा, पैशाची बचत करा
x

Upcoming IPO | या 4 कंपन्यांचे IPO शेअर बाजारात लाँच होणार आहेत, तपशील जाणून घ्या आणि गुंतवणुकीचा विचार करा

Upcoming IPO

Upcoming IPO| IPO मध्ये गुंतवणूक करण्यास इच्छुक असणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी कामाची बातमी आली आहे. बाजार नियामक SEBI ने Biba Fashion Ltd., Keystone Realtors Ltd., Plaza Wires Ltd. आणि Hemani Industries Ltd. या चार कंपन्यांच्या IPO ला मंजुरी दिली आहे. या सर्व कंपन्यांना SEBI तर्फे 14 ऑक्टोबर 2022 रोजी निरीक्षण पत्र देण्यात आला आहे. शेअर बाजारात IPO आणण्यासाठी सर्व कंपनीना निरीक्षण पत्र मिळवणे आवश्यक असते.

बिबा फॅशन IPO :
वॉरबर्ग पिंक्स आणि फेअरिंग कॅपिटल यांच्या पाठीशी असलेल्या एथनिक वेअर फॅशन ब्रँड बीबा फॅशनने एप्रिल 2022 मध्ये IPO साठी ड्राफ्ट पेपर म्हणजेच DRHP दाखल केला आहे. सेबी ला सादर केलेल्या कागदपत्रांनुसार, या IPO अंतर्गत 90 कोटी रुपयांचे नवीन शेअर्स बाजारात विक्री साठी आणले जातील. त्याच वेळी कंपनीच्या प्रमोटर्स आणि विद्यमान गुंतवणूकदारांकडून 2.77 कोटी इक्विटी शेअर्स ऑफर फॉर सेल/OFS अंतर्गत विक्रीसाठी बाजारात आणले जातील.

कीस्टोन रियल्टर्सचा IPO :
रुस्तमजी ग्रुपची कंपनी कीस्टोन रिअल्टर्सने जून 2022 मध्ये सेबीला IPO द्वारे 850 कोटी रुपये उभारण्यासाठी प्राथमिक कागदपत्रे सादर केली होती. DRHP च्या मते, या IPO मध्ये 700 कोटी रुपयांपर्यंतचे नवीन इक्विटी शेअर्स विक्रीसाठी शेअर बाजारात आणले जाणार आहेत. त्याच वेळी, ऑफर फॉर सेल/OFS अंतर्गत प्रमोटर्सकडून 150 कोटी रुपयांचे शेअर्स विक्रीसाठी आणले जाणार आहे.

हेमानी इंडस्ट्रीजचा IPO :
अॅग्रोकेमिकल निर्माता हेमानी इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीने मार्च 2022 मध्ये सेबी नियामकला प्रारंभिक शेअर विक्रीद्वारे 2,000 कोटी रुपये उभारण्यासाठी कागदपत्र सादर केले होते. या IPO अंतर्गत कंपनी 500 कोटी रुपयांचे नवीन शेअर्स बाजारात विक्रीसाठी खुले करणार आहे. याशिवाय, 1,500 कोटी रुपयांपर्यंतचे इक्विटी शेअर्स ऑफर फॉर सेल अंतर्गत विकण्याचा निर्णय कंपनीच्या प्रोमोटर्सनी घेतला आहे.

प्लाझा वायर्स IPO :
मे 2022 मध्ये प्लाझा वायर्सने शेअर विक्रीसाठी SEBI नियामकसमोर ड्राफ्ट पेपर सादर केला होता. या अंतर्गत, कंपनी IPO मध्ये 1,64,52,000 इक्विटी शेअर्स विक्रीसाठी बाजारात आणणार आहे. ही दिल्लीस्थित कंपनी वायर, अॅल्युमिनियम केबल्स, जलद गतीने चालणाऱ्या इलेक्ट्रिकल वस्तूंचे उत्पादन, विपणन आणि विक्रीचा व्यवसाय करते.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| List of Upcoming IPO including four companies has declared on 19 October 2022.

हॅशटॅग्स

#Upcoming IPO(8)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x