17 April 2025 10:23 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Mutual Fund | नोकरदारांनो, डोळे झाकुन पैसे गुंतवा या SBI फंडात, एसआयपी वर दिला 1,04,23,471 रुपये परतावा EPFO Pension Amount | तुमचा बेसिक पगार किती आहे? खाजगी कंपनी पगारदारांना महिना 6,429 रुपये पेन्शन मिळणार, अपडेट आली Gratuity on Salary | खाजगी कंपनी पगारदारांच्या खात्यात ग्रेच्युटीचे 4,03,846 रुपये जमा होणार, फायद्याची अपडेट जाणून घ्या Horoscope Today | 17 एप्रिल 2025, तुमच्यासाठी गुरुवारचा दिवस कसा असेल? तुमचे गुरुवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या GTL Share Price | जीटीएल इन्फ्रा पेनी स्टॉकमध्ये तेजी, जोरदार खरेदी, पुढची टार्गेट प्राईस किती? - NSE: GTLINFRA Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार गुरुवार 17 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या IREDA Share Price | सुसाट तेजी, इरेडा शेअरमध्ये 5.65 टक्क्यांची तेजी, PSU स्टॉकची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: IREDA
x

Upcoming IPO | कमाईची सुवर्ण संधी, लवकरच 4 कंपन्यांचे IPO लाँच होतं आहेत, फायदा घेण्यापूर्वी तपशील तपासा

Upcoming IPO

Upcoming IPO | 2022 या वर्षात शेअर बाजारात फारसे चांगले आयपीओ आले नाही. आता मात्र गुंतवणूकदारांसाठी IPO चा दुष्काळ संपणार आहे. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात 4 कंपन्यांचे आयपीओ शेअर बाजारात गुंतवणूकिसाठी खुले केले जाणार आहेत. या सर्व कंपन्या IPO च्या माध्यमातून 4500 कोटी रुपये उभारण्याचा प्रयत्न करणार आहेत. या 4 नवीन कंपन्या आहेत, DCX सिस्टम, ग्लोबल हेल्थ, बिकाजी फूड्स आणि फ्यूजन मायक्रो. चला तर मग जाणून घेऊ या सर्व IPO बद्दल सविस्तर माहिती

ग्लोबल हेल्थ लिमिटेड :
ग्लोबल हेल्थ लिमिटेड कंपनी ही मेदांता ब्रँड अंतर्गत रुग्णालये चालवण्याचे आणि व्यवस्थापन करण्याचे काम करते. कंपनीने 2,206 कोटी रुपयेच्या IPO साठी प्रति शेअर 319-336 रुपये किंमत बँड जाहीर केली आहे. या कंपनीचा IPO 3 ते 7 नोव्हेंबर 2022 दरम्यान सार्वजनिक सबस्क्रिप्शनसाठी खुला केला जाणार आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, अँकर गुंतवणूकदारांसाठी हा IPO 2 नोव्हेंबर 2022 रोजी खुला केला जाईल. या IPO मध्ये कंपनी 500 कोटी रुपयांचे नवीन शेअर्स बाजारात जारी करेल आणि त्यातून 2206 कोटी रुपये जमा करण्याचा प्रयत्न करेल. याशिवाय, त्यात 5.08 कोटी शेअर्स ऑफर फॉर सेल अंतर्गत विक्रीसाठी जारी केले जातील.

फ्यूजन मायक्रोफायनान्स :
जागतिक खाजगी इक्विटी फर्म वॉरबर्ग पिंकस-समर्थित फ्यूजन मायक्रोफायनान्स कंपनीने 1,104 कोटी रुपयांच्या IPO साठी प्रति शेअर 350-368 रुपये किंमत जाहीर केली आहे. या कंपनीने शुक्रवारी स्टॉक एक्सचेजला माहिती दिली आहे की, IPO मध्ये शेअरची विक्री गुंतवणुकीसाठी 2 नोव्हेंबर 2022 रोजी खुली केली जाईल, आणि 4 नोव्हेंबर 2022 रोजी बंद होईल. अँकर गुंतवणूकदार 1 नोव्हेंबर 2022 रोजी पर्यंत शेअर्समध्ये गुंतवणूक करू शकतात. या कंपनीच्या IPO मध्ये 600 कोटी रुपयांचे नवीन शेअर्स बाजारात विक्रीसाठी जारी केले जातील. याव्यतिरिक्त, कंपनीचे प्रमोटर्स आणि विद्यमान शेअर धारक 1,36,95,466 शेअर्स विक्रीसाठी बाजारात आणतील. कंपनी या नवीन IPO इश्यूमधून 1,104 कोटी रुपये उभारण्याचा प्रयत्न करणार आहे.

DCX System :
केबल आणि वायर असेंबलिंग कंपनी DCX Systems चा IPO सोमवार 31 ऑक्टोबर 2022 पासून खुला केला जाणार आहे. या कंपनीचा IPO 2 नोव्हेंबर 2022 पर्यंत गुंतवणुकीसाठी खुला राहील. DCX Systems कंपनीने इक्विटी शेअर्सच्या नवीन फ्रेश इश्यूचा आकार 500 कोटी रुपयांवरून कमी करून 400 कोटी रुपये निश्चित केला आहे. फ्रेश इश्यू व्यतिरिक्त या IPO मध्ये प्रमोटर्स कडून 100 कोटी रुपयांचे इक्विटी शेअर्स ऑफर फॉर सेल अंतर्गत बाजारात जारी केले जातील.

बिकाजी लिमिटेड :
बिकाजी स्नॅक्सचा आयपीओ पुढील आठवड्यात गुंतवणुकीसाठी खुला केला जाईल. तज्ज्ञांच्या मते ही कंपनी या IPO द्वारे 900 कोटी रुपये जमा करण्याचा प्रयत्न करेल. विद्यमान शेअर धारक आणि कंपनीचे प्रमोटर्स 29.37 लाख शेअर्स ऑफर फॉर सेल अंतर्गत बाजारात आणणार आहेत. या कंपनीने अद्याप शेअर्सची किंमत बँड जाहीर केली नाही.

2021 च्या तुलनेत यंदा शेअर बाजार शांत :
2021 या वर्षाच्या तुलनेत 2022 हे वर्ष अतिशय शांत आणि अस्थिर आहे. पहिल्या तीन महिन्यांत तर फक्त तीन कंपन्यांचे आयपीओ आले होते. मात्र मार्चनंतर 19 कंपन्यांचे आयपीओ शेअर बाजारात खुले करण्यात आले होते. या वर्षी आतापर्यंत कंपन्यांनी आयपीओद्वारे कंपन्यांनी 44,085 कोटी रुपये जमा केले आहेत. 2021 या वर्षात तर एकूण 63 कंपन्यांनी IPO द्वारे 1.19 लाख कोटी रुपये जमा केले होते. रशिया-युक्रेन युद्ध आणि वाढती महागाई, आर्थिक मंदी या कारणांनी अनेक कंपन्यांना त्यांच्या IPO योजनांपासून मागे हटण्यास भाग पाडले आहे, म्हणून अनेक कंपन्यांनी अजून आपले IPO आणले नाहीत.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| List of Upcoming IPO of new Companies to collect money from investors on 31 October 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Upcoming IPO(8)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या