23 December 2024 2:45 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन सहित हे 4 शेअर्स मालामाल करणार, 55 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल, टार्गेट नोट करा - NSE: SUZLON SBI Mutual Fund | डोळे झाकून SIP करा या SBI फंडाच्या योजनेत, 1 लाख रुपयांचे होतील 5 लाख रुपये, मार्ग श्रीमंतीचा Penny Stocks | 3 रुपयाचा पेनी शेअर श्रीमंत करतोय, स्टॉक खरेदीला गर्दी, यापूर्वी 1282 टक्के परतावा दिला - Penny Stocks 2024 HAL Share Price | मल्टिबॅगर HAL सहित या 5 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, मिळेल 57 टक्केपर्यंत परतावा - NSE: HAL Mazagon Dock Share Price | डिफेन्स कंपनी शेअर मालामाल करणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट आली - NSE: MAZDOCK IPO GMP | आला रे आला IPO आला, पहिल्याच दिवशी मल्टिबॅगर परतावा, मजबूत कमाईची संधी - IPO Watch Hakka Sod Pramanpatra | हक्क सोड पत्र कसे करावे, त्यासाठी रजिस्टर कार्यालयात हजर राहावे लागते का, वाचा सविस्तर
x

Lohia Corp IPO | लोहिया कॉर्प कंपनी IPO लाँच करणार, गुंतवणूकदारांना कमाईची मोठी संधी, कंपनीचा तपशील जाणून घ्या

Lohia corp IPO

Lohia Corp IPO | लोहिया कॉर्पोरेशन ही टेक्निकल टेक्सटाइल उत्पादनात वापरल्या जाणार्‍या मशीन्सची निर्मिती करणारी कंपनी आपला IPO लवकरच शेअर बाजारात गुंतवणुकीसाठी खुला करणार आहे. कानपूरस्थित लोहिया कॉर्पोरेशन ह्या कंपनीने बाजार नियामक सेबीकडे IPO साठी कागदपत्र दाखल केले आहेत. मागील आठवड्यात दाखल केलेल्या रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस/DRHP मसुद्यानुसार हा IPO पूर्णपणे ऑफर फॉर सेल वर आधारित असेल. म्हणजेच ह्या IPO मध्ये कोणताही नवीन शेअर इश्यू केला जाणार नाही. OFS अंतर्गत प्रोमोटर्स आणि इतर भागधारक आपल्या गुंतवणुकीतून 31,695,000 इक्विटी शेअर्स विक्रीसाठी बाजारात आणतील.

IPO संबंधित सविस्तर तपशील :
लोहिया कॉर्प कंपनीला अपेक्षा आहे की, कंपनी जर शेअर बाजरी सूचीबद्ध झाली तर कंपनीची एक ब्रँड ओळख निर्माण होईल. ICICI सिक्युरिटीज, IIFL सिक्युरिटीज, HSBC सिक्युरिटीज अँड कॅपिटल मार्केट्स आणि मोतीलाल ओसवाल इन्व्हेस्टमेंट अॅडव्हायझरी यांना या IPO इश्यूचे बुक-रनिंग लीड मॅनेजर म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. या कंपनीचे इक्विटी शेअर्स BSE आणि NSE निर्देशांकावर सूचीबद्ध केले जातील. हा IPO पूर्णपणे ऑफर फॉर सेल म्हणजेच पूर्णतः विक्रीसाठी खुला करण्यात येईल. कंपनीचे प्रमोटर्स आणि इतर गुंतवणुकदार आपल्या गुंतवणुकीतून 31,695,000 इक्विटी शेअर्स विकण्यासाठी शेअर बाजारात आणतील.

कंपनी बद्दल थोडक्यात :
लोहिया कॉर्प कंपनी कानपूरमध्ये असून ती टेक्निकल टेक्सटाइल कापडाच्या उत्पादनात वापरल्या जाणार्‍या यंत्रसामग्री आणि उपकरणाची निर्मिती करते. लोहिया कॉर्पने निर्माण केलेल्या मशिन्स आणि उपकरणांच्या माध्यमातून खास प्रकारचे पॉलीप्रॉपिलीन आणि हाय डेन्सिटी पॉलीथिलीन विणलेले कापड तसेच पोत्याचे उत्पादन केले जाते. 31 मार्च 2022 पर्यंत या कंपनीच्या ग्राहकांच्या यादीत जागतिक स्तरावर 90 पेक्षा जास्त देशांमधील 2,000 पेक्षा अधिक ग्राहकांचा समावेश होतो. आर्थिक वर्ष 2021 मध्ये कंपनीचा एकूण महसूल 1,333.79 कोटी रुपये होता, त्यात वाढ होऊन आर्थिक वर्ष 2022 मध्ये कंपनीने एकूण 2,237.48 कोटी रुपये महसूल कमावला आहे. तर कर कपातीनंतरचा एकूण नफा 160.85 कोटी रुपये वरून 119.30 कोटी रुपये झाला आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Lohia corp IPO will be Offer for sell and ready to launch in share Market soon 1 October 2022.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x