15 January 2025 10:59 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Flipkart Sale | फ्लिपकार्टची धमाकेदार ऑफर; 9999 रुपयांपासून सुरू स्मार्टफोनच्या किंमती, घाई करा, पैशाची बचत करा NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन शेअरबाबत मोठे संकेत, तज्ज्ञांकडून SELL रेटिंग, नेमकं कारण काय - NSE: NTPCGREEN HDFC Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, पगारदारांनो महिना 2000 रुपयांची गुंतवणूक करा, मिळाले 4 कोटी रुपये परतावा Personal Loan EMI Calculator | पर्सनल लोन घेण्यासाठी तुमचा पगार किती असावा? अर्ज करण्यापूर्वी अटी जाणून घ्या NPS Calculator | तुमच्या पत्नीमुळे महिन्याला 44,793 रुपये पेन्शन मिळेल आणि 1 कोटी 12 लाख रुपये परतावा देईल ही योजना IRFC Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार IRFC शेअर, फायद्याची अपडेट, ब्रोकरेज फर्म बुलिश - NSE: IRFC HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअर मालामाल करणार, मिळेल 45 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: HAL
x

Lotus Chocolate Share Price | रिलायन्स ग्रुपचा शेअर श्रीमंत करतोय, 1 महिन्यात दिला 118% परतावा, फायदा घ्या

Lotus Chocolate Share Price

Lotus Chocolate Share Price | लोटस चॉकलेट कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. शुक्रवारी या कंपनीचे शेअर्स अप्पर सर्किटमध्ये अडकले होते. या कंपनीचे शेअर्स सलग 12 दिवसापासून अप्पर सर्किट हीट करत आहेत. जून 2024 तिमाहीत या कंपनीच्या निव्वळ नफ्यात 4700 टक्के वाढ नोंदवली गेली आहे. ( लोटस चॉकलेट कंपनी अंश )

गुरुवारी या कंपनीचे शेअर्स 1198.15 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले आहेत. मागील एका महिन्यात हा स्टॉक तब्बल 118 टक्के वाढला आहे. शुक्रवार दिनांक 2 ऑगस्ट 2024 रोजी लोटस चॉकलेट स्टॉक 5.00 टक्के वाढीसह 1,258.05 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे.

2 जुलै 2024 रोजी लोटस चॉकलेट कपनीचे शेअर्स 575.70 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर 2 ऑगस्ट 2024 रोजी हा स्टॉक 1258.05 रुपये किमतीवर पोहचला होता. मागील 5 दिवसात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 21 टक्के नफा कमावून दिला आहे. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 1258.05 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 213 रुपये होती.

मागील 5 वर्षांमध्ये लोटस चॉकलेट कंपनीच्या शेअर्सची किंमत 8000 टक्के वाढली आहे. 2 ऑगस्ट 2019 रोजी या कंपनीचे शेअर्स 15.45 रुपये किमतीवर व्यवहार करत होते. आता हा स्टॉक 1258.05 रुपये किमतीवर पोहचला आहे. मागील 3 वर्षात लोटस चॉकलेट कंपनीच्या शेअर्समध्ये 4200 टक्के वाढ नोंदवली गेली आहे. तर मागील 6 महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सची किंमत 267 टक्के वाढली आहे.

जून 2024 तिमाहीत लोटस चॉकलेट कंपनीच्या निव्वळ नफ्यात 4700.87 टक्के वाढ नोंदवली गेली आहे. या तिमाहीत कंपनीने 9.41 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. मागील वर्षी याच तिमाहीत कंपनीने फक्त 20 लाख रुपयांचा नफा कमावला होता. मार्च 2024 च्या तिमाहीत या कंपनीला 1.18 कोटी रुपये नफा मिळाला होता. जून तिमाहीत या कंपनीचा महसूल 4 पट वाढून 141.3 कोटी रुपये नोंदवला गेला आहे. एका वर्षापूर्वी याच तिमाहीत कंपनीचा महसूल 32.3 कोटी रुपये होता.

24 मे 2023 रोजी Reliance Consumer Products Limited ने Lotus Chocolate कंपनीमध्ये कंट्रोलिंग स्टेक खरेदी केला होता. रिलायन्स रिटेल व्हेंचर्स लिमिटेड ही मुकेश अंबानींच्या मालकीच्या रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीची उपकंपनी आहे. लोटस चॉकलेट ही कंपनी मुख्यतः चॉकलेट, कोको उत्पादने बनवण्याचा व्यवसाय करते.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Lotus Chocolate Share Price NSE Live 03 August 2024.

हॅशटॅग्स

Lotus Chocolate Share Price(7)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x