19 September 2024 7:29 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Credit Score | नोकरदारांना अशाप्रकारे क्रेडिट स्कोर सुधारून मिळेल स्वस्त लोन, फक्त या पद्धती फॉलो करा - Marathi News Reliance Infra Share Price | मल्टिबॅगर रिलायन्स इन्फ्रा शेअर तुफान तेजीत, कंपनीबाबत अपडेट, पुढे फायदाच फायदा - Marathi News L&T Share Price | संधी सोडू नका, L&T सहित हे 5 शेअर्स दर महिना मोठा परतावा देतं आहेत, लिस्ट सेव्ह करा - Marathi News BHEL Share Price | BHEL सहित हे 3 शेअर्स मालामाल करणार, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, मोठी कमाई होणार - Marathi News Post Office Scheme | महिना खर्चाचं नो टेन्शन, ही सरकारी योजना दरमहा 9000 रुपये देईल, फायदा घ्या - Marathi News EPF Withdrawal | पगारदारांनो, अशा पद्धतीने EPF चे पैसे काढून क्लेम स्टेटस चेक करण्याची ऑनलाइन पद्धत शिका - Marathi News Apollo Micro Systems Share Price | डिफेन्स कंपनीचा शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट, स्टॉक खरेदीला गर्दी - Marathi News
x

Lotus Chocolate Share Price | रिलायन्स ग्रुप कंपनीचा शेअर श्रीमंत करतोय, 2 महिन्यात 200% कमाई, संधी सोडू नका

Lotus Chocolate Share Price

Lotus Chocolate Share Price | भारतातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मालकीच्या लोटस चॉकलेट कंपनीचे शेअर्स तुफान तेजीत धावत आहेत. मंगळवारी लोटस चॉकलेट स्टॉक 5 टक्क्यांच्या वाढीसह 1086.80 रुपये किमतीवर पोहोचला होता. तर आज देखील हा स्टॉक अप्पर सर्किटमध्ये अडकला आहे. ( लोटस चॉकलेट कंपनी अंश )

मागील 2 महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 200 टक्केपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. या कंपनीचे शेअर्स सध्या 52 आठवड्याच्या उच्चांक किमतीवर ट्रेड करत आहेत. या शेअरची 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 213 रुपये होती.

आज बुधवार दिनांक 31 जुलै 2024 रोजी लोटस चॉकलेट स्टॉक 5.00 टक्के वाढीसह 1,141.10 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. मागील 2 महिन्यात लोटस चॉकलेट कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 203 टक्के नफा कमावून दिला आहे. 31 मे 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 358.55 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 30 जुलै 2024 रोजी लोटस चॉकलेट कंपनीचे शेअर्स 1086.80 रुपये किमतीवर पोहोचले होते.

मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअर्सची किंमत 85 टक्के वाढली आहे. या काळात हा स्टॉक 589.90 रुपयेवरून वाढून 1086.80 रुपये किमतीवर पोहचला आहे. मागील 3 वर्षांत लोटस चॉकलेट कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 3600 टक्के परतावा कमावून दिला आहे. 30 जुलै 2021 रोजी या कंपनीचे शेअर्स 29.25 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आता हा स्टॉक 1100 रुपयेच्या पार गेला आहे.

मागील 5 वर्षात लोटस चॉकलेट कंपनीच्या शेअर्सची किंमत तब्बल 6935 टक्के वाढली आहे. जून 2024 तिमाहीत लोटस चॉकलेट कंपनीच्या नफ्यात 4700 टक्के वाढ झाली आहे. या तिमाहीत कंपनीने 9.41 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. मागील वर्षी या कंपनीला फक्त 20 लाख रुपये नफा झाला होता. चालू आर्थिक वर्षाच्या जून तिमाहीत या कंपनीने 141.31 कोटी रुपये महसुल संकलित केला होता.

मागील वर्षी जून तिमाहीत या कंपनीने 32.21 कोटी रुपये महसूल संकलित होता. Reliance Consumer Products Limited ही कंपनी रिलायन्स रिटेल व्हेंचर्स लिमिटेडची पूर्ण मालकीची उपकंपनी आहे. या कंपनीने 24 मे 2023 रोजी Lotus Chocolate Company मध्ये कंट्रोलिंग स्टेक खरेदी करून कंपनीचे अधिग्रहण केले होते. रिलायन्स रिटेल व्हेंचर्स लिमिटेड ही कंपनी मुकेश अंबानींच्या मालकीच्या रिलायन्स इंडस्ट्रीजची उपकंपनी आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Lotus Chocolate Share Price NSE Live 31 July 2024.

हॅशटॅग्स

Lotus Chocolate Share Price(7)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x