L&T Share Price | हमखास भरवशाचा शेअर! एल अँड टी शेअर झटपट 9 टक्के पेक्षा जास्त परतावा देईल, फायदा घेणार?
L&T Share Price | एल अँड टी लिमिटेड कंपनीचे शेअर्स सोमवारी मजबूत तेजीत वाढत होते, मते आज या स्टॉकमध्ये किंचित विक्रीचा दबाव पाहायला मिळत आहे. नुकताच या कंपनीने शेअर बायबॅक करण्याची घोषणा केली होती, ज्यामुळे शेअर बाजारात स्टॉक वाढीसाठी सकारात्मक वातावरण निर्माण झाले होते. सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये एल अँड टी लिमिटेड कंपनीचे शेअर्स 3 टक्क्यांच्या वाढीसह ट्रेड करत होते.
सोमवारपासून एल अँड टी लिमिटेड कंपनीने बायबॅक योजनेला सुरुवात केली आहे, जी 25 सप्टेंबर 2023 पर्यंत चालू राहणार आहे. सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 3.07 टक्क्यांच्या वाढीसह 2929.75 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.
मात्र आज प्रॉफिट बुकींगमुळे या स्टॉकमध्ये लक्षणीय घट पाहायला मिळत आहे. आज बुधवार दिनांक 20 सप्टेंबर 2023 रोजी एल अँड टी लिमिटेड कंपनीचे शेअर्स 0.98 टक्के घसरणीसह 2,891.25 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
सोमवारी दिवसा अखेर एल अँड टी लिमिटेड कंपनीचे शेअर्स 2919.60 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. सोमवारी या कंपनीने आपली बायबॅक ऑफर सुरू केली होती. या बाय बॅकची अंतिम मुदत 25 सप्टेंबर 2023 रोजी संपणार आहे. बाय बॅकसाठी कंपनीने प्रति शेअर किंमत 3200 रुपये निश्चित केली होती. ही किंमत मागील सोमवारच्या 2919.60 रुपये या क्लोजिंग किमतीच्या तुलनेत 9.60 टक्के अधिक आहे.
मागील आठवड्याच्या शुक्रवारच्या 2910.80 रुपये या क्लोजींग किमतीच्या तुलनेत 9.93 टक्के अधिक आहे. एल अँड टी लिमिटेड कंपनीने या बायबॅकसाठी शेअरची किंमत मर्यादा 3000 रुपये जाहीर केली होती. मात्र नंतर त्यात वाढ करून शेअरची किंमत मर्यादा 3200 रुपये करण्यात आली. या बाय बॅक ऑफर अंतर्गत एल अँड टी लिमिटेड कंपनी आपले 2 रुपये दर्शनी मूल्य असलेले 3,12,50,000 शेअर्स खुल्या बाजारातून पुन्हा खरेदी करत आहे.
ब्रोकरेज फर्म प्रभुदास लिल्लाधर यांच्या मते, शेअर धारकांना त्यांच्या गुंतवणुकीवर चांगली नफा वसुली करण्याची ही एक उत्तम संधी आहे. CLSA ने 13 सप्टेंबर 2023 रोजी जाहीर केलेल्या अहवालात म्हंटले आहे की, एल अँड टी लिमिटेड कंपनीच्या या बायबॅकमुळे आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये कंपनीचा RoE 12 टक्क्यांवरून वाढून 18 टक्क्यांवर जाऊ शकतो. एल अँड टी लिमिटेड कंपनीने आर्थिक वर्ष 2026 पर्यंत आपले ROE लक्ष 18 टक्के साध्य करण्याचे निश्चित केले आहे.
शेअर बाजारातील तज्ञांच्या मते किरकोळ गुंतवणूकदारांनी एल अँड टी लिमिटेड कंपनीच्या बायबॅकमध्ये त्यांचे शेअर्स टेंडर करावेत. ब्रोकरेज फर्म शेअरखानच्या तज्ञांच्या मते गुंतवणूकदारांनी या बाय बॅकमध्ये शेअर विकून फायदा घ्यावा, कारण बाय बॅकची किंमत शेअरच्या सध्याच्या किमतीच्या तुलनेत 9-10 टक्के अधिक आहे.
एल अँड टी लिमिटेड कंपनी आपल्या बाय बॅक योजनेत एकूण इक्विटीच्या फक्त 2.2 टक्के शेअर्स परत खरेदी करणार आहे. या बाय बॅकच्या माध्यमातून एल अँड टी लिमिटेड कंपनी पहिल्यांदाच आपले शेअर्स परत खरेदी करत आहे.
एल अँड टी लिमिटेड कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, बाय बॅक टेंडर BSE आणि NSE या दोन्ही एक्सचेंजेसवर ओपन केले जाणार आहे. आता ज्या शेअर धारकांना त्यांचे शेअर्स बाय बॅक योजनेत टेंडर करायचे आहेत, ते आपल्या स्टॉक ब्रोकरच्या माध्यमातून अधिग्रहण विंडो अंतर्गत सेलिंग ऑर्डर टाकू शकतात. हे बाय बॅक ऑर्डर गुंतवणुकदार केवळ संपादन विंडोद्वारे साक्षांकित करु शकतात. या विंडोमध्ये तुम्हाला किती शेअर्स टेंडर करायचे आहे, याबाबत तपशील द्यावा लागेल.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title| L&T Share Price today on 20 September 2023
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, रॉकेट तेजीचे संकेत - NSE: HAL
- Health Insurance Premium | हेल्थ इंश्योरेंसचा प्रीमियम कमी करायचा असेल तर करा केवळ 'हे' एक काम; मोठी बचत होईल
- Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या
- Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर्समध्ये तेजीचे संकेत, स्टॉक मालामाल करणार, मोठा परतावा मिळणार - NSE: TATAPOWER
- Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज
- 5 Star Rating Cars | 10 लाखांपेक्षा कमी किंमतीच्या 5 स्टार रेटिंग कार खरेदी करण्याचं स्वप्न पाहत आहात, मग इथे लक्ष द्या
- Monthly Pension Scheme | भारी सरकारी योजना; केवळ एकदाच पैसे गुंतवा, प्रत्येक महिन्याला मिळेल 12,388 रुपये पेन्शन
- EPF Pension Money | पगारदारांनो, तुम्हाला EPFO ची जास्तीत जास्त किती पेन्शन मिळेल; अर्ली पेन्शन नियम काय सांगतो
- Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांसाठी खास सरकारी स्कीम, महिना कमवाल 20,000 रुपये, जबरदस्त फायद्याची योजना
- Shukra Rashi Parivartan | डिसेंबरच्या 'या' तारखेपासून शुक्र गोचरमुळे काही राशींना भोगावे लागू शकतात गंभीर परिणाम