19 April 2025 12:57 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Scheme | पती-पत्नीसाठी खास सरकारी योजना, वर्षाला 1,11,000 रुपये तर महिन्याला 9250 रुपये व्याज मिळेल SBI Gold ETF | तुम्ही सोन्यात गुंतवणूक करताय? पण पैसा 'गोल्ड फंडात' झपाट्याने वाढतोय, प्रचंड फायद्याची अपडेट PPF Investment | पगारदारांनो, या सरकारी योजनेत वर्षाला 1.5 लाख रुपयांच्या बचत करा, तब्बल 1.5 कोटी रुपये परतावा मिळेल Horoscope Today | 19 एप्रिल 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Infosys Share Price | मजबूत फंडामेंटल्स असलेल्या IT स्टॉकसाठी BUY रेटिंग, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: INFY IRFC Share Price | 129 रुपयाच्या शेअरसाठी 165 रुपये टार्गेट प्राईस, महत्वाची अपडेट जाणून घ्या - NSE: IRFC Reliance Share Price | कोटक सिक्युरिटीज बुलिश, जाहीर केली टार्गेट प्राईस, गुंतवणूकदारांसाठी अपडेट - NSE: RELIANCE
x

Macrotech Developers Share Price Today | या शेअरच्या गुंतवणुकदारांना फ्री बोनस शेअर्स प्लस डिव्हीडंड असा दुहेरी फायदा, डिटेल्स जाणून घ्या

Macrotech Developers Share Price

Macrotech Developers Share Price Today | ‘मॅक्रोटेक डेव्हलपर्स’ या रिअल इस्टेट क्षेत्रात व्यापार करणाऱ्या दिग्गज कंपनीने आपल्या शेअर धारकांना दुहेरी लाभ देण्याची घोषणा केली आहे. ‘मॅक्रोटेक डेव्हलपर्स’ या कंपनीने आपल्या विद्यमान गुंतवणूकदारांना 1 : 1 या प्रमाणात मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली आहे. म्हणजेच ‘मॅक्रोटेक डेव्हलपर्स’ कंपनी प्रत्येक शेअरवर 1 बोनस शेअर मोफत वाटप करणार आहे. (Macrotech Developers Limited)

या सोबतच ‘मॅक्रो डेव्हलपर्स’ कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना दर्शनी मूल्यावर 20 टक्के म्हणजेच प्रति शेअर 2 रुपये रुपये लाभांश वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे. आज सोमवार दिनांक 24 एप्रिल 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.46 टक्के वाढीसह 912.00 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

कंपनीची आर्थिक कामगिरी :
‘मॅक्रोटेक डेव्हलपर्स’ कंपनीने मार्च 2023 च्या तिमाहीत 744 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. मार्च 2023 च्या तिमाहीत मॅक्रोटेक डेव्हलपर्स कंपनीच्या नफ्यात 39 टक्क्यांची वाढ नोंदवली गेली आहे. मार्च 2023 च्या तिमाहीत ‘मॅक्रोटेक डेव्हलपर्स’ कंपनीने 744.36 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला असल्याची माहिती दिली आहे. मागील आर्थिक वर्षाच्या याच कालावधीत कंपनीने 535.46 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. ‘मॅक्रोटेक डेव्हलपर्स’ ही कंपनी लोढा ग्रुप अंतर्गत मालमत्ता विकण्याचे काम करते. ही कंपनी भारतातील आघाडीच्या काही रिअल इस्टेट कंपन्यांपैकी एक मानली जाते.

कंपनीची व्यापारी कामगिरी :
जानेवारी-मार्च 2023 या तिमाही कालावधीत ‘मॅक्रोटेक डेव्हलपर्स’ कंपनीने 3271.71 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. मागील वर्षीच्या याच तिमाही कालावधीच्या तुलनेत कंपनीच्या निव्वळ एकत्रित उत्पन्नात 6.04 टक्केची घट नोंदवली गेली आहे. मागील वर्षाच्या मार्च 2022 तिमाहीत कंपनीने 3481.92 कोटी रुपये महसूल संकलित केला होता.

‘मॅक्रोटेक डेव्हलपर्स’ कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ अभिषेक लोढा यांनी माहिती दिली आहे की, कंपनीने आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये 12064 कोटी रुपये मूल्याची प्रि सेल्स नोंदवली होती. कंपनीने वार्षिक 34 टक्के वाढीसह उत्तम कामगिरी केली आहे. आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये कंपनीने एकत्रित 9,611.16 कोटी रुपये महसूल संकलित केला होता, त्यात कंपनीचा PAT 489.42 कोटी रुपये होता.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Macrotech Developers Share Price Today on 24 April 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

Macrotech Developers Share Price(3)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या