22 November 2024 2:36 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

Magnetic Maharashtra | राज्यात 35 हजार 500 कोटींची गुंतवणूक | 1879 हेक्टरचा पवनऊर्जा प्रकल्प, 5 हजार रोजगार

Magnetic Maharashtra

मुंबई, १५ सप्टेंबर | देशातील ऊर्जा क्षेत्रातील अग्रगण्य उद्योग समूह जेएसडब्ल्यू एनर्जी राज्यात सुमारे ३५,५०० कोटींची गुंतवणूक करणार असून नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी येथे दीड हजार मेगावॅट क्षमतेचा जलविद्युत प्रकल्प तर उस्मानाबाद, सोलापूर, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यात ५ हजार मेगावॅट क्षमतेेचे पवनऊर्जा प्रकल्प उभारण्यात येणार आहेत.

राज्यात 35 हजार 500 कोटींची गुंतवणूक, 1879 हेक्टरचा पवनऊर्जा प्रकल्प, 5 हजार रोजगार – Magnetic Maharashtra 35500 crore investment in the state 1879 hectare wind power project :

मंगळवारी जेएसडब्ल्यू कंपनीने राज्य शासनासोबत सुमारे ३५ हजार ५०० कोटी रुपयांच्या गुंतवणूक करारावर स्वाक्षऱ्या केल्या. करारानुसार जेएसडब्ल्यू कंपनी जलविद्युत व पवनऊर्जा क्षेत्रात काम करणार आहे. उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या मंत्रालयातील दालनात सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. या वेळी उद्योग विभागाचे अपर मुख्य सचिव बलदेव सिंह, विकास आयुक्त हर्षदीप कांबळे, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पी अन्बलगन तसेच जेएसडब्ल्यू कंपनीचे सहसंचालक प्रशांत जैन, बिझनेस हेड अभय याज्ञिक, प्रवीण पुरी आदी उपस्थित होते. मंगळवारी झालेल्या दोन सामंजस्य करारांमुळे हजारोंच्या संख्येने प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती होणार आहे. प्रकल्प सुरू करण्यासाठी राज्य शासन या कंपनीला सर्व सहकार्य करेल, असा विश्वास उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी व्यक्त केला.

१,८७९ हेक्टरचा पवनऊर्जा प्रकल्प, ५ हजार रोजगार:
नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यात सुमारे दीड हजार मेगावॅट क्षमतेचा हायड्रोपॉवर प्रकल्प सुरू केला जाणार आहे. भावली धरणावर हा प्रकल्प असेल. यासाठी सुमारे साडेपाच हजार कोटींची गुंतवणूक केली जाणार आहे. यातून पाच हजार जणांना प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या रोजगार मिळणार आहे. उस्मानाबाद, सोलापूर, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यात ५ हजार मेगावॅट क्षमतेचा पवनऊर्जा प्रकल्प सुरू करणार आहे. १,८७९ हेक्टर जागेवर हा प्रकल्प असेल. यामध्ये सुमारे ३० हजार कोटींची गुंतवणूक होणार आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल.

News Title: Magnetic Maharashtra 35500 crore investment in the state 1879 hectare wind power project.

हॅशटॅग्स

#Maharashtra(207)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x