Mahindra Group Shares | महिंद्रा उद्योग समूहाचे शेअर्स वर्षभरात 100% वाढले, या 5 शेअरची नवीन टार्गेट प्राईस पहा

Mahindra Group Shares | भारतातील सर्वात मोठ्या उद्योग समूहांपैकी एक असलेल्या ‘महिंद्रा उद्योग समूह’ चा भाग असलेल्या शेअर्सने आपल्या शेअर धारकांना जबरदस्त कमाई करून दिली आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या गुंतवणूकदारांनी मजबूत कमाई केली आहे. यात मल्टिनॅशनल बिझनेस हाऊस महिंद्रा, ऑटोमोबाईल्स, ऑटो उपकरणे, वित्तीय सेवा, माहिती तंत्रज्ञान आणि रिअल इस्टेट यांसारख्या व्यवसायांशी संबंधित कंपन्या सामील आहेत. Ace इक्विटी डेटानुसार महिंद्रा उद्योग समूहाचा भाग असलेल्या पाच कंपन्याच्या शेअरने मागील एका वर्षात लोकांना 100 टक्क्यांहून अधिक परतावा मिळवून दिला आहे. महिंद्रा उद्योग समूहाच्या आठ सूचीबद्ध कंपन्यांपैकी पाच कंपन्यांचा आढावा आपण या लेखात घेणार आहोत, ज्यानी जबरदस्त वाढ नोंदवली आहे.
महिंद्रा CIE ऑटोमोटिव्ह :
‘महिंद्रा CIE ऑटोमोटिव्ह’ कंपनी व्यावसायिक आणि प्रवासी वाहनांसाठी लागणारे इंजिन आणि चेसिस बनवण्याचे काम करते. कोटक इन्स्टिट्यूशनल इक्विटीज फर्मने या कंपनीच्या स्टॉकवर 270 रुपये लक्ष्य किंमत जाहीर करून स्टॉक विकण्याचा सल्ला दिला आहे. तर मोतीलाल ओसवाल फर्मने या कंपनीच्या स्टॉकवर ‘बाय’ टॅग देऊन 435 रुपये लक्ष किमतीसाठी खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. सोमवार दिनांक 20 फेब्रुवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.84 टक्के वाढीसह 394.50 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.
महिंद्रा अँड महिंद्रा फायनान्शियल सर्व्हिसेस :
‘महिंद्रा अँड महिंद्रा फायनान्शियल सर्व्हिसेस’ कंपनीचे शेअर्स मागील एका वर्षात 75 टक्क्यांच्या वाढीसह 262.10 रुपयांवर पोहोचले आहेत. ही कंपनी प्रामुख्याने भारतातील ग्रामीण आणि निम-शहरी बाजारपेठांमध्ये वाहन कर्ज पुरवठा करण्याचे काम करते. सोमवार दिनांक 20 फेब्रुवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.84 टक्के घसरणीसह 260.05 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.
महिंद्रा अँड महिंद्रा :
महिंद्रा उद्योग समूहाची प्रमुख कंपनी ‘महिंद्रा अँड महिंद्रा’ कंपनीच्या शेअरने अप्रतिम कामगिरी केली आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअरची किंमत 66 टक्क्यांनी वाढली असून 1,367.85 रुपयांवर पोहोचली आहे. कंपनीने XUV700, Thar आणि XUV300, SUV वाहने लाँच केल्यापासून कंपनीच्या कामगिरीत सुधारणा पाहायला मिळाली आहे. सोमवार दिनांक 20 फेब्रुवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.11 टक्के वाढीसह 1,343.00 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.
महिंद्रा हॉलिडे अँड रिसॉर्ट्स इंडिया :
‘महिंद्रा हॉलिडे अँड रिसॉर्ट्स इंडिया’ कंपनीचे शेअर्स मागील एका वर्षात 39 टक्क्यांनी मजबूत झाले आहेत. महिंद्रा हॉलिडेजवर व्हेंचुरा सिक्युरिटीज फर्मने 576 रुपये लक्ष किंमत जाहीर केली आहे. या कंपनीचे मजबूत मूलभूत तत्त्वे आणि नियमित रोख प्रवाह वाढीचे प्रमुख कारण आहे, असे तज्ञ म्हणतात. सोमवार दिनांक 20 फेब्रुवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.59 टक्के घसरणीसह 275.60 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.
महिंद्रा लाइफस्पेस डेव्हलपर्स :
महिंद्रा उद्योग समूहाची रिअल इस्टेट शाखा म्हणून ओळखली जाणारी ‘महिंद्रा लाइफस्पेस डेव्हलपर्स’ कंपनीचे शेअर्स मागील एका वर्षात 26 टक्के मजबूत झाले आहेत. ब्रोकरेज फर्म चॉईस ब्रोकिंगने ‘महिंद्रा लाइफस्पेस डेव्हलपर्स’ कंपनीला ‘आउटपरफॉर्म’ असे रेटिंग देऊन 573 रुपये लक्ष किंमत निश्चित केली आहे. एचडीएफसी सिक्युरिटीज फर्मने पुढील दोन-तीन तिमाहींमध्ये या कंपनीचे स्टॉक 438-459 रुपयांवर जाऊ शकतात असा अंदाज व्यक्त केला आहे. सोमवार दिनांक 20 फेब्रुवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 2.81 टक्के घसरणीसह 372.95 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Mahindra Group Shares stock market live on 20 February 2023.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
IRFC Share Price | गुंतवणूकदारांसाठी अपडेट, आयआरएफसी शेअरची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: IRFC
-
Vedanta Share Price | 3 दिवसात शेअरमध्ये 18 टक्क्यांची घसरण, आता आली अपडेटेड टार्गेट प्राईस - NSE: VEDL
-
IRFC Share Price | आयआरएफसी शेअरची गाडी रुळावरून घसरली, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IRFC
-
IRFC Share Price | पीएसयू शेअरने 1 महिन्यात 9.37 टक्के परतावा दिला, ही आहे पुढीची टार्गेट प्राईस - NSE: IRFC
-
RVNL Share Price | आज शेअर कोसळला, पण लॉन्ग टर्ममध्ये आहे प्रचंड फायद्याचा, ही असेल टार्गेट प्राईस - NSE: RVNL
-
BHEL Share Price | सरकारी कंपनीचा शेअर लवकरच 240 रुपयांची लेव्हल गाठणार, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: BHEL
-
Vodafone Idea Share Price | थेट शेअर प्राईसवर होणार परिणाम, स्टॉक रेटिंग डाऊनग्रेड, अपडेट जाणून घ्या - NSE: IDEA
-
RVNL Share Price | मार्केटमध्ये घसरण, पण पीएसयू शेअरबाबत तज्ज्ञांना विश्वास, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: RVNL
-
Reliance Share Price | 1640 रुपये टार्गेट प्राईस, सध्या 1187 रुपयांवर ट्रेड करतोय, फायद्याची अपडेट आली - NSE: RELIANCE
-
IRB Infra Share Price | शेअर प्राईस 43 रुपये, आयआरबी इन्फ्रा कंपनी शेअरला SELL रेटिंग, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRB