16 April 2025 6:08 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
GTL Share Price | जीटीएल इन्फ्रा पेनी स्टॉकमध्ये तेजी, जोरदार खरेदी, पुढची टार्गेट प्राईस किती? - NSE: GTLINFRA Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार गुरुवार 17 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या IREDA Share Price | सुसाट तेजी, इरेडा शेअरमध्ये 5.65 टक्क्यांची तेजी, PSU स्टॉकची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: IREDA Suzlon Share Price | 54 रुपयांचा शेअर पुढे किती फायद्याचा? गुंतवणूकदारांसाठी अपडेट, फायदा की नुकसान? - NSE: SUZLON Tata Steel Share Price | 180 रुपये टार्गेट प्राईस, बिनधास्त खरेदी करा, ब्रोकरेजकडून टार्गेट जाहीर - NSE: TATASTEEL NTPC Green Energy Share Price | खरेदी करून ठेवा हा पीएसयू स्टॉक, कंपनीला मोठा भविष्यकाळ, टार्गेट जाणून घ्या - NSE: NTPCGREEN NBCC Share Price | शेअर प्राईस 93 रुपये, आज 4.21 टक्क्यांची तेजी, यापूर्वी 2120% परतावा दिला, टार्गेट नोट करा - NSE: NBCC
x

लोकांचे प्रश्न सोडून 24 तास मोदींचे गुणगान, लोकांचा कल बदलतोय, TRP घसरतोय, 2 प्रसिद्ध वृत्तवाहिन्या बंद, मोदी भक्त रुबिका वेळीच बाहेर

Mainstream Media

Mainstream Media in Danger | २०२४ मध्ये सुरुवातीला देशभरात लोकं मोदींच्या मार्केटिंगमुळे भाजपच्या मागे घरंगळत गेले. तसेच २०१९ मध्ये CRPF जवानांच्या मृत्यूला भाजपने मोदींच्या प्रचार सभेत कॅश करून पुन्हा सत्ता हस्तगत केली. मात्र त्याच CRPF जवानांच्या मृत्यूचं खरं वास्तव आणि भांड फुटलं ते माजी गव्हर्नर आणि भाजपचे ज्येष्ठ नेते सत्यपाल मलिक यांच्या गौप्यस्फोटाने. तसेच प्रसार माध्यमं ही जनतेच्या विषयांचा आरसा असल्याने त्यांच्या मार्फतच सरकारचं वास्तव जनतेपर्यंत पोहोचत असतं हे भाजपला कळलं आणि तोच दुआ म्हणजे प्रसार माध्यमं २०१४ नंतर अप्रत्यक्षरीत्या स्वतःच्या नियंत्रणात घेण्याच्या हालचाली सुरु झाल्या होत्या.

आज देशातील ९० टक्के मुख्य टीव्ही वृत्तवाहिन्या या केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मोदी सरकारचे गुणगान गात राहणं आणि सतत स्टुडिओतून हिंदू-मुस्लिम वाद पेटवणारे डिबेट्स घडवून आणत असतात. अनेक टीव्ही वृत्त वाहिन्यांचे स्टुडिओ हे हिंदू-मुस्लिम वादाचे आखाडे आणि देशातील असत्य दाखवणारे कारखाने झाल्याचे जनतेलाही उमगलं आहे.

लोकांना देखील आता हा खेळ समजू लागल्याने अनेक वृत्तवाहिन्या सोडून लोकं युट्युबवरील पत्रकारांच्या चॅनेल्सला फॉलो करू लागले आहेत. एकाबाजूने मुख्य वृत्तवाहिन्यांचे विव्ह्ज हजारोच्या घरात येऊन पोहोचले आहेत तर युट्युबवरील वास्तव मांडणाऱ्या पत्रकारांच्या चॅनेल्सला काही तासातच मिलियन्स मध्ये विव्ह्स मिळत आहेत. परिणामी अनेक मुख्य वृत्तवाहिन्यांचे TRP प्रचंड घसरले आहेत आणि त्याचे परिणाम जाहिराती मिळण्यावर देखील झाले आहेत. विशेष म्हणजे काही मोठ्या टीव्ही वृत्तवाहिन्यांच्या युट्युब चॅनेल्सला देखील बघणं लोकं पसंत करत नसल्याचे पाहायला मिळतंय.

मुख्य वृत्त वाहिन्यांच्या एकूण जाहिरातींच्या बाजारपेठेत ४० टक्के घट झाल्याने एबीपी समूहाने एबीपी गंगा आणि एबीपी माझा वाहिनी बंद करण्याची औपचारिक घोषणा केली आहे. आता हे चॅनेल्स फक्त डिजिटल नेटवर्कवर दिसतील. या घटनेमुळे नोएडातील एबीपी कार्यालयात नैराश्याचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच एका मोदी भक्त महिला पत्रकाराने आधीच आर्थिक स्थिती ओळखून एका नव्या वृत्तवाहिनीवर नोकरी सुरु केली आहे. या महिला पत्रकाराला प्रचंड ट्रॉल करण्यास सुरुवात झाली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एबीपी गंगा आणि एबीपी सांझाच्या कर्मचाऱ्यांना आता एबीपी न्यूज हिंदी चॅनेलमध्ये सामावून घेण्यात येणार आहे. एबीपी न्यूज चॅनेलचे मॅनेजिंग एडिटर रोहित सनवाल यांच्याकडे आउटपुट हेडची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यामुळे एबीपी न्यूज चॅनेलवर आता व्यवस्थापकीय संपादक स्तरावर संतकुमार आणि रोहित सावळ असे दोन अधिकारी असतील. आता दोघेही टीआरपीमध्ये एबीपीचा घसरलेला आलेख हाताळणार आहेत.

गंगा वाहिनीचे विश्वासू व्यवस्थापकीय संपादक रोहित सनवाल यांची नेमणूक करून मालकांनी संतकुमार यांच्यासह त्यांच्या विश्वासू रोहित सनवाल यांच्याकडे चॅनेलचा रिमोट कंट्रोल सोपवल्याची चर्चा आज एबीपी कार्यालयात झाली. अशा तऱ्हेने संतकुमार यांनीही येत्या काही दिवसांत एबीपी न्यूज वाहिनीला ‘बाय बाय’ म्हटलं तर नवल नाही. या चॅनेलची स्टार अँकर रुबिका लियाकत यांनी गेल्या आठवड्यात चॅनेलचा राजीनामा दिला आणि ‘भारत-24’ या नवख्या चॅनेलमध्ये सामील झाल्या.

Disclaimer | म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title : Mainstream Media in Danger ABP Ganga and ABP Sanjha shut down check details on 24 June 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Mainstream Media(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या