Manappuram Finance Share Price | सोनं नव्हे, सोन्याचा व्यापार करणाऱ्या कंपनीच्या शेअरने करोडपती बनवले, खरेदी करणार?
Manappuram Finance Share Price | मंगळवार दिनांक 7 फेब्रुवारी 2023 रोजी NBFC क्षेत्रातील दिग्गज ‘मणप्पुरम फायनान्स’ कंपनीचे शेअर्स 1.30 टक्के वाढीसह 117.10 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. मागील पाच दिवसांत शेअरची किंमत 3 टक्क्यांनी वाढली आहे. या कंपनीच्या शेअरने आपल्या दीर्घकालीन गुंतवणूकदारांना करोडो रुपये कमावून दिले आहेत. डिसेंबर तिमाहीचे निकाल निराशाजनक असूनही शेअर बाजारातील तज्ञांना स्टॉकमध्ये वाढीची अपेक्षा आहे. ब्रोकरेज फर्म ICICI सिक्युरिटीजने ‘मणप्पुरम फायनान्स’ कंपनीच्या शेअरसाठी 147 रुपये टार्गेट प्राइस जाहीर केली आहे. ही लक्ष्य किंमत सध्याच्या किंमतीपेक्षा सुमारे 28 टक्के अधिक आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Manappuram Finance Share Price | Manappuram Finance Stock Price | BSE 531213 | NSE MANAPPURAM)
मणप्पुरम फायनान्सवर तज्ञ उत्साही :
ऑक्टोबर- डिसेंबर 2022 तिमाहीमध्ये ‘मणप्पुरम फायनान्स’ कंपनीचा एकत्रित निव्वळ नफा 4 टक्क्यांनी घसरून 390 कोटी रुपयेवर आला आहे. निव्वळ व्याज मार्जिनमध्ये घट आणि स्टँडअलोन गोल्ड फायनान्समधील उच्च परिचालन खर्चामुळे कंपनीच्या निव्वळ नफ्यात घट नोंदवली गेली आहे. तथापि ब्रोकरेज फर्मच्या मते उच्च वाढ, NIM मधील सुधारणा, मायक्रोफायनान्समधील क्रेडिट कॉस्टने कंपनीचा नफा टिकवून ठेवला आहे. डिसेंबर 2022 च्या तिमाहीत कंपनीचा RoE 17.2 टक्के होता. ब्रोकरेज फर्मच्या मते मायक्रोफायनान्स इन्स्टिट्यूशन उद्योगात पुढील काळात तेजी येऊ शकते, कंपनीच्या चांगल्या व्यवसायामुळे ROE मध्ये वाढ होऊ शकते. या सर्व बाबी लक्षात घेऊन ब्रोकरेज फर्मने शेअरवर 147 रुपये लक्ष्य किंमत जाहीर केली आहे.
मल्टीबॅगर स्टॉक स्वस्तात मिळतोय :
‘मणप्पुरम फायनान्स’ कंपनीच्या शेअरने गुंतवणुकदारांना मल्टीबॅगर परतावा कमावून दिला आहे. मात्र शेअर सध्या खूप स्वस्तात मिळत आहेत. 10 फेब्रुवारी 2006 रोजी या कंपनीचे शेअर्स 64 पैशांवर ट्रेड करत होते. मात्र आज शेअरची किंमत 117.10 रुपयेवर क्लोज झाली आहे. ज्या लोकांनी या स्टॉकमध्ये 56,000 रुपये लावले होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य 180 पट वाढले आहे. मागील वर्षी 9 फेब्रुवारी 2022 रोजी या कंपनीचे शेअर्स 161 रुपयांवर ट्रेड करत होते. त्यानंतर अवघ्या चार महिन्यांत म्हणजेच 20 जून 2022 रोजी शेअरची किंमत 49 टक्क्यांनी घसरून 81.50 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या विक्रमी नीचांक पातळीवर आली होती. शेअरमध्ये 42 टक्के सुधारणा झाली आहे, मत स्टॉक वार्षिक उच्चांक किंमत पातळीच्या तुलनेत 28 टक्के स्वस्तात मिळत आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Manappuram Finance Share Price 531213 MANAPPURAM stock market live on 07 February 2023.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- LIC Scheme | LIC ने खास महिलांसाठी लॉन्च केली नवी योजना; आता प्रत्येक महिन्याला कमिशनसह पैसे कमवाल
- Vivo Y300 Plus 5G | आता 10 हजारांची सूट मिळवून खरेदी करता येईल Vivo Y300 Plus 5G स्मार्टफोन, ही डील चुकून सुद्धा चुकवू नका
- ITR Filling Benefits | तुम्ही ITR फायलिंग करत नसाल तर मोठी चूक करताय, मिळतात 'हे' अनेक फायदे
- Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, मिळेल 50 टक्क्यांपर्यंत परतावा - NSE: TATAMOTORS
- Edelweiss Mutual Fund | नोकरदारांनो ही योजना श्रीमंत करतेय, SIP बचतीवर मिळेल 1 कोटी 12 लाख रुपये परतावा
- Joint Home Loan Benefits | पत्नीच्या नावाने गृहकर्ज घ्या, फायदाच फायदा मिळवा, व्याजावर देखील बंपर सूट मिळेल
- Smart Investment | अशी करा स्मार्ट गुंतवणूक, केवळ 100 आणि 500 रुपये बचत करून व्हाल करोडपती
- Cochin Shipyard Share Price | PSU कोचीन शिपयार्ड शेअरमध्ये रॉकेट तेजीचे संकेत, फायद्याची अपडेट - NSE: COCHINSHIP
- Tata Technologies Share Price | टाटा ग्रुपचा शेअर 30 टक्क्यांनी स्वस्त मिळतोय, स्टॉक BUY करावा का - NSE: TATATECH
- Tata Steel Share Price | टाटा स्टील सहित या 4 शेअर्ससाठी ब्रोकरेजकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL