22 November 2024 2:38 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

Mankind Pharma IPO | 'मॅनकाइंड फार्मा' IPO स्टॉक सूचीबद्ध होण्यास तयार, शेअरची ग्रे मार्केट किंमत प्रीमियमवर, किती परतावा?

Mankind Pharma IPO

Mankind Pharma IPO | नुकताच ‘मॅनकाइंड फार्मा’ कंपनीचा IPO गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला होता. आता या IPO ची मुदत पूर्ण झाली आहे. ज्यांना IPO शेअर्सचे वाटप झाले आहे, तर गुंतवणुकदार आता स्टॉक लिस्ट होण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. IPO स्टॉक लिस्ट होण्यापूर्वी ‘मॅनकाइंड फार्मा’ कंपनीचे शेअर्स ग्रे मार्केटमध्ये प्रीमियम किमतीवर करत आहे. ‘मॅनफोर्स कंडोम’ आणि ‘प्रीगा न्यूज’ सारखे ब्रँड उत्पादन बनवणाऱ्या कंपनीचे शेअर्स ग्रे मार्केटमध्ये 100-105 रुपये किमती दरम्यान ट्रेड करत आहेत.

Mankind Pharma Limited Stock Price Today on NSE & BSE

शेअर बाजारातील तज्ज्ञांच्या मते ‘मॅनकाइंड फार्मा’ कंपनीचे शेअर्स ग्रे मार्केट जबरदस्त तेजीत व्यवहार करत आहेत. ‘मॅनकाइंड फार्मा’ कंपनीच्या शेअर्सची प्रीमियम किंमत ग्रे मार्केटमध्ये 105 रुपयांवर पोहचली होती. गुरुवारी या फार्मा कंपनीच्या शेअर्सची ग्रे मार्केट प्रीमियम किंमत 82 रुपयेवर ट्रेड करत होती. ग्रे मार्केटमध्ये प्रवेश केल्यापासून ‘मॅनकाइंड फार्मा’ कंपनीच्या शेअर्सची प्रीमियम किंमत मजबूत तेजीत वाढत आहे. ‘

मॅनकाइंड फार्मा’ कंपनीचे शेअर्स 8 मे 2023 रोजी शेअर बाजारात सूचीबद्ध केले जाऊ शकतात. या कंपनीने आपल्या IPO मध्ये शेअरची किंमत बँड 1026-1080 रुपये दरम्यान निश्चित केली होती. जर ग्रे मार्केटमध्ये हा स्टॉक 105 रुपये प्रीमियम किमतीवर टिकला तर स्टॉक 1185 रुपयांवर सूचीबद्ध होऊ शकतो.

‘मॅनकाइंड फार्मा’ कंपनीचा IPO एकूण 15.32 पट सबस्क्राइब झाला होता. या कंपनीच्या IPO मध्ये क्वालिफाईड इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्ससाठी राखीव ठेवण्यात आलेला कोटा 49.16 पट सबस्क्राइब झाला होता. तर किरकोळ गुंतवणूकदारांसाठी राखीव ठेवण्यात आलेला कोटा फक्त 0.92 पट सबस्क्राइब झाला होता.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Mankind Pharma Share Price Today on 06 May 2023.

हॅशटॅग्स

#Mankind Pharma IPO(7)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x