5 November 2024 12:29 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON NBCC Share Price | NBCC कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम, कमाईची संधी - NSE: NBCC Horoscope Today | दिवसभरात मिळेल सुखद बातमी; धनलाभाचा देखील जुळेल योग, यामधील तुमची रास कोणती पहा - Marathi News IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, संधी सोडू नका - GMP IPO SBI Mutual Fund | बिनधास्त गुंतवणूक करा SBI फंडाच्या खास योजनेत, मिळेल 1,05,60,053 रुपये परतावा - Marathi News Gratuity Money | पगारदारांनो, तुमच्या हक्काच्या ग्रॅच्युइटीच्या पैशांबद्दल महत्वाची अपडेट, अन्यथा हक्काचा पैसा जाईल - Marathi News Smart Investment | म्युच्युअल फंडाच्या गुंतवणुकीतून 1 करोड रक्कम तयार करायची आहे, तर वापरा 8-4-3 हा फॉर्मुला - Marathi News
x

Marinetrans India IPO | आला रे आला स्वस्त IPO आला! शेअर प्राईस बँड फक्त 26 रुपये, संधी सोडू नका

Marinetrans India IPO

Marinetrans India IPO | सध्या जर तुम्ही IPO मध्ये गुंतवणूक करून भरघोस कमाई करू इच्छित असाल तर तुमच्यासाठी एक खुशखबर आहे. मरिनट्रांस इंडिया कंपनीचा IPO गुंतवणुकीसाठी खुला होणार आहे. या कंपनीचा IPO गुरूवार दिनांक 30 नोव्हेंबर 2023 रोजी ते 5 डिसेंबर 2023 दरम्यान गुंतवणुकीसाठी खुला होणार आहे. मरिनट्रांस इंडिया कंपनीने आपल्या IPO मध्ये शेअरची प्राईस बँड 26 रुपये निश्चित केली आहे. एका लॉटमध्ये कंपनीने 4000 शेअर्स ठेवले आहेत.

मरिनट्रांस इंडिया कंपनीच्या प्रवर्तक गटात अरुणकुमार नारायण हेगडे आणि तिराह कुमार बाबू कोटियन सामील आहेत. या कंपनीच्या IPO चे एकूण मूल्य 10.92 कोटी रुपये आहे. या IPO मधे कंपनी आपले 4,200,000 फ्रेश इक्विटी शेअर्स खुल्या बाजारात विकणार आहे.

यामध्ये कोणतेही शेअर्स ऑफर फॉर सेल अंतर्गत विकण्यात येणार नाही. कंपनी IPO अंतर्गत जमा होणारा निधी खेळत्या भांडवलाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आणि सामान्य कॉर्पोरेट खर्च कव्हर करण्यासाठी, तसेच इश्यू खर्च भरण्यासाठी खर्च करणार आहे.

मरिनट्रांस इंडिया ही कंपनी मुख्यतः समुद्री मालवाहतूक सेवा प्रदान करणारी कंपनी आहे. फ्रेट फॉरवर्डर म्हणून व्यवसायाला सुरुवात करणाऱ्या या कंपनीने आता अनौपचारिक करारांद्वारे घरोघरी डिलिव्हरी आणि थर्ड पार्टी लॉजिस्टिक सेवा क्षेत्रात आपला व्यवसाय विस्तार केला आहे.

या कंपनीची भारतीय शाखा अहमदाबाद येथे स्थित आहे. तर कंपनीचे मुख्यालय नवी मुंबई येथे स्थित आहे. मरिनट्रांस इंडिया कंपनी आपले मालवाहतुक कामकाज जेएनपीटी, न्हावा शेवा, मुंद्रा, कांडला, चेन्नई, विझाग आणि भारतातील इतर ठिकाणांहून ऑपरेट करते.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Marinetrans India IPO GMP Today 29 November 2023.

हॅशटॅग्स

Marinetrans India IPO(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x