21 April 2025 7:47 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
EPFO Pension News | खाजगी कंपनी पगारदारांसाठी मोठी बातमी, EPFO ची महिना 7500 रुपये मिनिमम पेन्शन मिळणार SBI Mutual Fund | पगारदारांनो, बिनधास्त गुंतवणूक करा या फंडात, 1 लाखांच्या गुंतवणुकीवर 1.27 कोटी परतावा मिळेल Horoscope Today | 22 एप्रिल 2025, तुमच्यासाठी मंगळवारचा दिवस कसा असेल? तुमचे मंगळवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या HFCL Share Price | रिलायन्स ग्रुपची हिस्सेदारी असलेल्या स्वस्त शेअर्सची जोरदार खरेदी, 5 दिवसात 12.59% तेजी - NSE: HFCL Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर्स खरेदीला गर्दी, यापूर्वी दिला 9,709% परतावा, टार्गेट अपडेट - NSE: ASHOKLEY Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार मंगळवार 22 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या HAL Share Price | पीएसयू डिफेन्स कंपनीचा स्टॉक फोकसमध्ये; नुवामाने जाहीर केली टार्गेट प्राईस - NSE: HAL
x

Maruti Suzuki Share Price | अबब! मारुती कार प्रमाणे शेअरही सुसाट धावला, गुंतवणूकदारांचा पैसा तब्बल 2160 पटीने वाढवला

Maruti Suzuki Share Price

Maruti Suzuki Share Price | मारुती सुझुकी इंडिया लिमिटेड या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना जबरदस्त कमाई करून दिली आहे. 42 वर्षांपूर्वी मारुती सुझुकी कंपनीचे शेअर्स 5 रुपये प्रति शेअर किमतीवर ट्रेड करत होते. ते आता या कंपनीचे शेअर्स 10000 रुपये किमतीच्या पार गेले आहेत.

मारुती सुझुकी कंपनीने 1981 साली जपानच्या सुझुकी मोटरसोबत एक संयुक्त उपक्रम स्थापन करून त्यात सुझुकी कंपनीने 26 टक्के भाग भांडवल धारण केले होते. यासाठी त्यांनी 20 कोटी रुपये गुंतवणूक केली होती. त्यावेळी मारुती कंपनीचे बाजार मूल्य 77 कोटी रुपये होते. आज शुक्रवार दिनांक 20 ऑक्टोबर 2023 रोजी मारुती सुझुकी इंडिया स्टॉक 0.52 टक्के घसरणीसह 10,716.00 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे.

सुझुकी कंपनीने मारुती सुझुकी इंडिया कंपनीच्या आयपीओच्या आधी अनेक टप्प्यांत संयुक्त उपक्रमात गुंतवणूक वाढवून आपला हिस्सा जास्तीत जास्त वाढवला आहे. 1992 पर्यंत त्यांनी आपला एकूण वाटा 50 टक्के वर नेला होता. तर IPO च्या अगदी आधी, सुझुकी कंपनीने मारुती सुझुकी इंडिया कंपनीचे एकूण 54.2 टक्के भाग भांडवल धारण केले होते.

मारुती उद्योग कंपनीचे 2003 मध्ये शेअर बाजारात सूचीबद्ध करण्यात आले होते. त्यावेळी भारत सरकारने 125 रुपये प्रति शेअर किमतीवर आपले 25 टक्के भाग भांडवल खुल्या बाजारात विकले होते. IPO इश्यू किंमतीवर मारुती सुझुकी इंडिया कंपनीचे एकूण मूल्य 3,600 कोटी रुपये होते. मे 2007 मध्ये भारत सरकारने मारुती कंपनीचे 10.3 टक्के भाग भांडवल 2,360 कोटी रुपये किमतीवर विकले.

मारुती सुझुकी कंपनीच्या शेअरची सध्याची किंमत 10,800 रुपये आहे. मागील 42 वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 2,160 पट नफा कमावून दिला आहे. 2003 मध्ये मारुती कंपनीने आपली IPO मध्ये शेअर इश्यूची किंमत 125 रुपये निश्चित केली होती. IPO नंतर मारुती कंपनीच्या शेअर्सची किंमत 86 पट अधिक वाढली आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Maruti Suzuki Share Price NSE October 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

Maruti Suzuki Share Price(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या