
Mazagon Dock Share Price | माझगांव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत घसरण पाहायला मिळत आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या सरकारी कंपनीचे शेअर्स 5 टक्क्यांच्या वाढीसह ट्रेड करत होते. मात्र आज या कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार नफा वसुली पाहायला मिळाली आहे.
कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आणि नॅशनल स्टॉक एक्स्चेंजवर माझगांव डॉक शिपबिल्डर्स स्टॉकमध्ये 33 लाख शेअर्सची खरेदी विक्री झाली होती. आज गुरूवार दिनांक 29 फेब्रुवारी 2024 रोजी माझगांव डॉक शिपबिल्डर्स स्टॉक 1.13 टक्के घसरणीसह 2,090 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.
मागील एका वर्षात माझगांव डॉक शिपबिल्डर्स कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 200 टक्केपेक्षा जास्त मल्टीबॅगर परतावा कमावून दिला आहे. या तुलनेत, बेंचमार्क निफ्टीमध्ये फक्त 27 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली आहे. मागील 5 वर्षात या सरकारी कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 1,177.60 टक्के परतावा कमावून दिला आहे.
मागील 5 दिवसात माझगांव डॉक शिपबिल्डर्स स्टॉक 3.34 टक्के वाढला आहे. तर मागील 1 महिन्यात या कंपनीचे शेअर्स 7.34 टक्के घसरले होते. मागील 6 महिन्यात माझगांव डॉक शिपबिल्डर्स कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 17.06 टक्के नफा कमावून दिला आहे. मागील 1 वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 198.15 टक्के नफा कमावून दिला आहे.
नुकताच माझगांव डॉक शिपबिल्डर्स कंपनीने आपल्या उच्च व्यवस्थापन मंडळात बदल केला आहे. 23 फेब्रुवारी रोजी सेबी फाइलिंगमध्ये कंपनीने माहिती दिली की, चंदू सांबशिवा राव यांना कंपनीच्या संचालक मंडळावर अर्धवेळ अशासकीय संचालक म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. माझगांव डॉक शिपबिल्डर्स ही कंपनी मुख्यतः ड्रेज, पाण्याचे टँकर, मालवाहू जहाजे आणि बहुउद्देशीय उपयोगी जहाजे बनवण्याचा व्यवसाय करते.
डिसेंबर तिमाहीत माझगांव डॉक शिपबिल्डर्स कंपनीच्या महसुल संकलनात 30 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली आहे. डिसेंबर तिमाहीत माझगांव डॉक शिपबिल्डर्स कंपनीच्या एकत्रित निव्वळ नफ्यात 77 टक्के वाढ नोंदवली गेली आहे. या तिमाहीत कंपनीने एकूण 626.8 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. कंपनीने डिसेंबर तिमाहीत 30 टक्के वाढीसह 2,362.5 कोटी रुपये महसूल संकलित केला आहे. या तिमाहीत कंपनीचा EBITDA 82 टक्क्यांच्या वाढीसह 539 कोटी रुपये नोंदवला गेला आहे. तर EBITDA मार्जिन 22.8 टक्क्यांवर आला आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.





























