22 February 2025 7:36 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Personal Loan EMI | 'या' कामांसाठी पर्सनल लोन घेत असाल तर वेळीच थांबा, होतील गंभीर परिणाम, इथे जाणून घ्या माहिती SBI FD Interest Rate | 'या' बँका FD गुंतवणुकीवर उत्तम व्याज देत आहेत, 4 ते 6 लाखांच्या FD वर किती परतावा मिळेल पहा Home Loan Interest Rate | पगारदारांनो, 'या' बँका देत आहेत सर्वाधिक स्वस्त गृहकर्ज, घराची स्वप्नपूर्ती साकार होणार Horoscope Today | रविवार 23 फेब्रुवारी, कसा असेल 12 राशींच्या लोकांचा रविवार, तुमचे राशी भविष्य जाणून घ्या Railway Confirm Ticket | रेल्वेची तिकिट कन्फर्म आणि ट्रेन सुटली, तुम्ही दुसऱ्या ट्रेनने प्रवास करू शकता का? नियम लक्षात ठेवा Credit Card EMI | क्रेडिट कार्डच्या मोठ्या बिलाचे EMI मध्ये रूपांतर कसे करावे? थकीत रक्कम भरणे सोपे होईल Numerology Horoscope | नशीब आणि आकड्यांचा खेळ, अंकज्योतिषशास्त्रानुसार 16 फेब्रुवारी तुमचा रविवारचा दिवस कसा असेल
x

Mazagon Dock Share Price | माझगांव डॉक शिपबिल्डर्स शेअर्स जोरदार तेजीत, मल्टिबॅगर परतावा कमाई करणार? मोठी बातमी जाणून घ्या

Mazagon Dock Share Price

Mazagon Dock Share Price | मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये डिफेन्स सेक्टरमधील शेअर्समध्ये जोरदार तेजी पाहायला मिळाली. पंतप्रधानांच्या फ्रान्स दौऱ्यापूर्वी संरक्षण मंत्रालयाने 26 Dassault Rafale लढाऊ विमानांच्या खरेदीला मंजुरी दिल्याची बातमी आली आणि डिफेन्स सेक्टरमधील स्टॉक तेजीत आले. 13-14 जुलै 2023 रोजी पंतप्रधान फ्रान्स दौऱ्यावर जाणार आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी या फ्रान्स दौऱ्यादरम्यान लढाऊ विमान कराराची घोषणा करतील. 26 राफेल मरीन फायटर्स विमान भारतीय नौदलाच्या मेडइन इंडिया विमानवाहू युद्धनौका म्हणून ओळखली जाणारी INS विक्रांतवर तैनात करण्यात येणार आहेत.

भारत डायनॅमिक्स लिमिटेड कंपनीचे शेअर मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 13.79 टक्क्यांच्या वाढीसह 1229.35 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 1080.40 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. माझगांव डॉक शिपबिल्डर्स कंपनीचे शेअर्स मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 10 टक्के वाढीसह 1588.75 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज बुधवार दिनांक 12 जुलै 2023 रोजी माझगांव डॉक शिपबिल्डर्स कंपनीचे शेअर्स 4.63 टक्के वाढीसह 1,665.55 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

भारतीय संरक्षण मंत्रालयाने पंतप्रधानांच्या फ्रान्स दौऱ्यापूर्वी 3 अतिरिक्त स्कॉर्पियन म्हणजेच कलवरी वर्गाच्या पाणबुड्या खरेदी करण्याचा प्रस्ताव मंजुर केला होता. माझगांव डॉक शिपबिल्डर्स कंपनी फ्रान्सस्थित नेव्हल ग्रुपच्या सहकार्याने आपल्या प्लांटमध्ये पाणबुडी बनवण्याचे काम करणार आहे. या 3 अतिरिक्त पाणबुड्या बनवण्याचे कंत्राट मूल्य 20000-22000 कोटी रुपये असण्याचा अंदाज आहे.

नवीन संरक्षण कराराची बातमी येताच कोचीन शिपयार्ड कंपनी शेअर्समध्ये देखील 10 टक्केपेक्षा अधिक वाढ पाह्याला मिळाली होती. कोचीन शिपयार्ड कंपनीचे शेअर्स मंगळवाच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 10.85 टक्के वाढीसह 646.45 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स देखील 4 टक्के वाढीसह 3916.30 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. याशिवाय पारस डिफेन्स अँड स्पेस टेक्नॉलॉजी कंपनीचे शेअर्स मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमधे 9.46 टक्के वाढीसह 690 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Mazagon Dock Share Price today on 12 July 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

Mazagon Dock Share Price(17)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x