19 April 2025 12:58 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Scheme | पती-पत्नीसाठी खास सरकारी योजना, वर्षाला 1,11,000 रुपये तर महिन्याला 9250 रुपये व्याज मिळेल SBI Gold ETF | तुम्ही सोन्यात गुंतवणूक करताय? पण पैसा 'गोल्ड फंडात' झपाट्याने वाढतोय, प्रचंड फायद्याची अपडेट PPF Investment | पगारदारांनो, या सरकारी योजनेत वर्षाला 1.5 लाख रुपयांच्या बचत करा, तब्बल 1.5 कोटी रुपये परतावा मिळेल Horoscope Today | 19 एप्रिल 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Infosys Share Price | मजबूत फंडामेंटल्स असलेल्या IT स्टॉकसाठी BUY रेटिंग, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: INFY IRFC Share Price | 129 रुपयाच्या शेअरसाठी 165 रुपये टार्गेट प्राईस, महत्वाची अपडेट जाणून घ्या - NSE: IRFC Reliance Share Price | कोटक सिक्युरिटीज बुलिश, जाहीर केली टार्गेट प्राईस, गुंतवणूकदारांसाठी अपडेट - NSE: RELIANCE
x

Mazagon Dock Share Price | डिफेन्स कंपनी माझगाव डॉक शेअरमध्ये तुफान तेजीचे संकेत, पुढील टार्गेट नोट करा - NSE: MAZDOCK

Mazagon Dock Share Price

Mazagon Dock Share Price | पीएसयू माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड कंपनीबाबत महत्वाची अपडेट समोर आली आहे. कंपनीने स्टॉक एक्सचेंजला दिलेल्या माहितीनुसार, माझगाव डॉक ‘कंपनीला प्रोजेक्ट-75I अंतर्गत एकूण ६ नवीन पाणबुड्या बांधण्याचा कॉन्ट्रॅक्ट मिळू शकतो. कारण एल अँड टी डिफेन्स कंपनी अटींची पूर्तता ना केल्याने या टेंडरच्या शर्यतीतून बाहेर झाली आहे. परिणामी, हा कॉन्ट्रॅक्ट माझगाव डॉक शिपबिल्डर्स कंपनीला मिळू शकतो. हा कॉन्ट्रॅक्ट जवळपास ४३००० कोटी रुपयांचा असू शकतो अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे.

मंगळवार, 28 जानेवारी 2025 रोजी माझगाव डॉक शिपबिल्डर्स शेअर 3.91 टक्क्यांनी वाढून 2,315.65 रुपयांवर पोहोचला होता. माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड कंपनी शेअरची 52 आठवड्यांची उच्चांकी पातळी 2,930 रुपये होती, तर शेअरची 52 आठवड्यांची नीचांकी पातळी 897.70 रुपये होती. आजच्या तेजीनंतर माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड कंपनीचे एकूण मार्केट कॅप 94,484 कोटी रुपयांवर पोहोचले आहे.

डीएसीमध्ये माझगाव डॉक कंपनीला कॉन्ट्रॅक्ट मिळू शकतो

पुढील महिन्याभरात म्हणजे केंद्रीय अर्थसंकल्पानंतर डिफेन्स एक्विझिशन कौन्सिलची महत्त्वाची बैठक पार पडू शकते. त्या बैठकीत मोठ्या संरक्षण खरेदीला मंजुरी मिळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे माझगाव डॉक शिपबिल्डर्स कंपनीला हजारो कोटी रुपयांचे कॉन्ट्रॅक्ट प्राप्त होऊ शकतात असं म्हटलं जातंय.

दरम्यान, या पाणबुडीच्या उभारणीसाठी परदेशी कंपन्यांशी भारतीय कंपन्यांची तंत्रज्ञान संबंधित भागीदारी असणं ही आवश्यक अट होती. त्यासाठी माझगाव डॉक शिपबिल्डर्स कंपनीने जर्मन कंपनी थिसेनक्रुप मरीन सिस्टिम्ससोबत सामंजस्य करार केला आहे. दुसरीकडे, एल अँड टी डिफेन्सने कंपनीने देखील स्पॅनिश कंपनी नवांटियासोबत सामंजस्य करार केला होता. मात्र एलटी डिफेन्स कंपनी आता या शर्यतीतून बाहेर झाली आहे.

माझगाव डॉक शिपबिल्डर्स शेअर टार्गेट प्राईस

माझगाव डॉक शिपबिल्डर्स कंपनीसोबत भारतीय नौदलाचा अंतिम करार पुढील महिन्याभरात होऊ शकतो. त्यानंतर तो DAC मध्ये मंजूर केला जाऊ शकतो. त्यामुळे हा शेअर फोकसमध्ये आला आहे. माझगाव डॉक शेअर त्याच्या उच्चांकी पातळीवरून २५ टक्क्यांनी खाली घसरला आहे. गुंतवणूकदार या पातळीवर शेअर खरेदी करू शकतात आणि २१५० रुपयांच्या पातळीपर्यंत एव्हरेज करू शकता. पुढील २-३ तिमाहींसाठी २४५० रुपये ही पहिली टार्गेट प्राईस देण्यात अली आहे. तसेच २८०० रुपये ही लॉन्ग टर्म टार्गेट प्राईस देण्यात आली आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Mazagon Dock Share Price Tuesday 28 January 2025 Marathi News.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

Mazagon Dock Share Price(17)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या