19 November 2024 4:58 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
EPF Pension Money | नोकरदारांनो, तुमच्या 60 ते 70 हजाराच्या पगारावर किती EPF पेन्शन मिळणार, संपूर्ण माहितीचा आढावा घ्या Salary Account | पगारदारांनो, केवळ झिरो बॅलन्स नाही तर, सॅलरी अकाउंटवर मिळतात या 5 सुविधा, जाणून आश्चर्यचकित व्हाल SBI Mutual Fund | श्रीमंत करणाऱ्या 5 म्युच्युअल फंड योजना, 10 हजारांचे होतील करोडो रुपये, इथे पैशाने पैसा वाढवा - Marathi News Trident Share Price | 35 रुपयाच्या शेअरची कमाल, दिला 2300 टक्क्यांचा मल्टिबॅगर परतावा, फायदा घ्या - NSE: TECHLABS Yes Bank Share Price | येस बँकबाबत महत्वाची अपडेट, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK RVNL Share Price | RVNL कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर सकारात्मक परिणाम होणार - NSE: RVNL IRFC Share Price | IRFC शेअर फोकसमध्ये, मल्टिबॅगर शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा का - NSE: IRFC
x

Mazagon Dock Shipbuilders Share Price | या सरकारी कंपनीच्या शेअरने 10 महिन्यांत 250% परतावा दिला, स्टॉक खरेदी अचानक वाढली

Mazagon Dock Shipbuilders Share Price

Mazagon Dock Shipbuilders Share Price | माझगांव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड ही कंपनी भारतीय नौदलासाठी पाणबुड्या आणि युद्धनौका बनवण्याचे काम करते. या सरकारी मालकीच्या कंपनीने मागील काही महिन्यांत आपल्या गुंतवणुकदारांना अद्भूत परतावा कमावून दिला आहे. माझगांव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड या सरकारी मालकीच्या कंपनीच्या शेअर्सनी मागील 10 महिन्यांत आपल्या शेअर धारकांना 250 टक्के परतावा कमावून दिला आहे. या कॅपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी किंमत 936.85 रुपये होती. तर या सरकारी मालकीच्या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 224 रुपये होती. 30 डिसेंबर 2022 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.32 टक्के वाढीसह 792 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Mazagon Dock Shipbuilders Share Price | Mazagon Dock Shipbuilders Stock Price | BSE 543237 | NSE MAZDOCK)

गुंतवणुकीवर परतावा :
Mazagon डॉक शिपबिल्डर्स कंपनीचे शेअर्स 24 फेब्रुवारी 2022 रोजी बॉम्बे स्टॉक एक्सचेंज निर्देशांकावर 224 रुपये या किमतीत सूचीबद्ध झाले होते. 30 डिसेंबर 2022 रोजी या सरकारी कंपनीचे शेअर्स BSE इंडेक्सवर 793.70 रुपयांवर पोहचले होते. या कालावधीत कंपनीच्या शेअर्सनी लोकांना 252 टक्के परतावा कमावून दिला आहे. जर तुम्ही 24 फेब्रुवारी 2022 रोजी माझगांव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड या कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये लावले असते, आणि आपली गुंतवणूक होल्ड करून ठेवली असती तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य वाढून 3.54 लाख रुपये झाले असते.

सहा महिन्यांत 221 टक्के परतावा :
माझगांव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड कंपनीच्या शेअर्सनी मागील 6 महिन्यांत आपल्या गुंतवणूकदाराना 221 टक्के परतावा कमावून दिला आहे. 1 जुलै 2022 रोजी या कंपनीचे शेअर्स BSE इंडेक्सवर 246.80 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 30 डिसेंबर 2022 रोजी या सरकारी कंपनीचे शेअर्स बीएसई इंडेक्सवर 793.70 रुपये किमतीवर पोहचले आहे. माझगांव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड कंपनीच्या शेअर्सनी 2022 या वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना जवळपास 180 टक्के परतावा कमावून दिला आहे. त्याचवेळी मागील एका वर्षभरात या सरकारी कंपनीच्या शेअर्सची किंमत 185 टक्क्यांनी मजबूत झाली आहे. मागील 5 दिवसात माझगांव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड कंपनीच्या शेअर्सची किंमत 8 टक्क्यांनी वाढली, आणि यातून गुंतवणूकदारांनी बक्कळ कमाई केली आहे. या सरकारी कंपनीचे बाजार भांडवल 16008 कोटी रुपये आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Mazagon Dock Shipbuilders Share Price 543237 MAZDOCK in focus check details on 31 December 2022.

हॅशटॅग्स

#Stock in Focus(73)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x