Mirza International Share Price Today | हा शेअर दररोज अप्पर सर्किट तोडतोय, गगन भरारी घेणारा शेअर खरेदी करावा का?

Mirza International Share Price Today | ‘मिर्झा इंटरनॅशनल’ या स्मॉलकॅप फुटवेअर कंपनीच्या शेअरमध्ये तुफानी तेजी पाहायला मिळत आहे. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये ‘मिर्झा इंटरनॅशनल’ कंपनीचे शेअर्स 20 टक्के वाढीसह 49.92 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज गुरूवार दिनांक 20 एप्रिल 2023 रोजी ‘मिर्झा इंटरनॅशनल’ कंपनीचे शेअर्स 9.92 टक्के वाढीसह 54.85 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. ही कंपनी तयार लेदर, शू अपर्स, शू आणि लेदर अॅक्सेसरीज बनव्याचा व्यापार करते. या कंपनीच्या उत्पादित शूजपैकी सुमारे 85 टक्के उत्पादन निर्यात केले जातात. (Mirza International Limited)
गुंतवणुकीवर परतावा :
मागील 5 दिवसात मिर्झा इंटरनॅशनल कंपनीचे शेअर्स 67.23 टक्के वाढले आहे 12 एप्रिल 2023 रोजी मिर्झा इंटरनॅशनल कंपनीचे शेअर्स 32.70 रुपये किंमत पातळीवर ट्रेड करत होते. तर 19 एप्रिल 2023 रोजी हा स्टॉक 49.92 रुपये किमतीवर पोहचला आहे. या फुटवेअर कंपनीचे शेअर मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 41.60 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. मिर्झा इंटरनॅशनल कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 30.02 रुपये होती.
मिर्झा इंटरनॅशनल कंपनीला राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरण म्हणजेच NCLT कडून प्रमोटर ग्रुपच्या मालकीची कंपनी ‘RTS फॅशन्स प्रायव्हेट लिमिटेड’ कंपनीमध्ये विलीन करण्याची आणि ‘रेडटेप लिमिटेड’ कंपनीमध्ये ब्रँड व्यवसायाचे विलिनीकरण करण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्याची एक्स डेट आणि रेकॉर्ड डेट 29 मार्च 2023 ही होती.
नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनल म्हणजेच NCLT च्या अलाहाबाद खंडपीठाने ‘आरटीएस फॅशन्स प्रायव्हेट लिमिटेड’ आणि ‘मिर्झा इंटरनॅशनल’ आणि ‘रेडटेप लिमिटेड’ यांच्या संमिश्र योजनेला मान्यता दिली आहे. या नवीन योजनेनुसार ‘मिर्झा इंटरनॅशनल’ कंपनीशी संबंधित सर्व कर्मचारी आणि व्यवस्थापकीय संचालकसह पूर्णवेळ संचालक हे सर्व ‘रेडटेप लिमिटेड’ मध्ये ट्रान्स्फर करण्यात येणार आहेत.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Mirza International Share Price Today on 20 April 2023.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपच्या शेअरसाठी BUY रेटिंग, जिओ फायनान्स शेअर्सबाबत तेजीचे संकेत - NSE: JIOFIN
-
Adani Power Share Price | 48% टक्के परतावा मिळवा, संधी सोडू नका, अदानी पॉवर शेअर टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ADANIPOWER
-
Reliance Power Share Price | रिलायन्स पॉवर शेअर्स तेजीत, 1 महिन्यात 21% परतावा दिला, टार्गेट जाणून घ्या - NSE: RPOWER
-
IREDA Share Price | इरेडा शेअर देईल 27 टक्के परतावा, मल्टिबॅगर PSU शेअरची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IREDA
-
Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर्समध्ये तेजी, तज्ज्ञांकडून खरेदीचा सल्ला, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: ASHOKLEY
-
Vodafone Idea Share Price | तब्बल 66 टक्के परतावा मिळेल, पेनी स्टॉक फोकसमध्ये, अपडेट जाणून घ्या - NSE: IDEA
-
NBCC Share Price | शेअर प्राईस 93 रुपये, आज 4.21 टक्क्यांची तेजी, यापूर्वी 2120% परतावा दिला, टार्गेट नोट करा - NSE: NBCC
-
HAL Share Price | तब्बल 1400% परतावा देणारा डिफेन्स कंपनीचा शेअर, पुढे अजून मोठा परतावा मिळेल - NSE: HAL
-
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, जोरदार उसळी, मोतीलाल ओसवाल बुलिश - NSE: TATAPOWER
-
Infosys Share Price | मजबूत फंडामेंटल्स असलेल्या IT स्टॉकसाठी BUY रेटिंग, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: INFY