24 November 2024 6:47 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Smart Investment | बचतीवर 5 कोटी रुपये परतावा हवा असल्यास 40x20x50 फॉर्म्युला शक्य करेल, टिप्स फॉलो करा - Marathi News Property Knowledge | वडिलांच्या मालमत्तेवर मुलींचा किती हक्क, 'या' परिस्थितीत मुली वडिलांकडे मालमत्ता मागू शकत नाहीत SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर रॉकेट स्पीडने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Multibagger Stocks | पैशाचा पाऊस पाडतोय हा मल्टिबॅगर शेअर, तब्बल 4300% परतावा दिला, फायद्याची अपडेट - BOM: 543620 IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका - GMP IPO Sarkari Schemes | गुंतवणुकीसाठी 3 फायद्याच्या सरकारी योजना, सरकार देईल 8.2% पर्यंत परतावा, माहिती जाणून घ्या - Marathi News SBI Online | सरकारी SBI बँकेची जबरदस्त योजना, 50,000 रुपयांची गुंतवणूक देईल 13 लाखांपर्यंत परतावा - Marathi News
x

Mishtann Foods Share Price | होय! फक्त 13 रुपयाच्या मिष्टान फूड्स शेअर्सबाबत मोठी बातमी, अल्पकाळात पैसा वाढवणाऱ्या शेअरची खरेदी वाढली

Mishtann Foods Share Price

Mishtann Foods Share Price | मिष्टान फूड्स लिमिटेड कंपनीमध्ये गुंतवणुकदार असलेल्या Nomura Singapore फर्मने अधिक गुंतवणूक करून आपले भाग भांडवल वाढवले आहे. सिंगापूरमधील या परकीय संस्थात्मक गुंतवणूकदार संस्थेने त्यांचे भाग भांडवल 1.28 टक्क्यांवरून वाढवून 2 टक्क्यांवर आणले आहे.

मिष्टान फूड्स लिमिटेड या स्मॉल कॅप कंपनीने स्टॉक एक्सचेंज फाइलिंगमध्ये दिलेल्या माहितीनुसार, परकीय संस्थात्मक गुंतवणूकदारांनी मिष्टान फूड्स लिमिटेड कंपनीचे 1,28,25,854 शेअर्स होल्ड केले आहेत. आता या शेअरची संख्या 2,18,82,762 झाली आहे. म्हणजेच Nomura Singapore ने मिष्टान फूड्स लिमिटेड कंपनीचे 90.56 लाख शेअर्स खरेदी करून मोठी गुंतवणुक केली आहे. आज बुधवार दिनांक 9 ऑगस्ट 2023 रोजी मिष्टान फूड्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स 0.44 टक्के वाढीसह 13.57 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

Nomura Singapore फर्मने मिष्टान फूड्स लिमिटेड कंपनीचे एकूण 2.19 टक्के भाग भांडवल धारण केले आहे. मिष्टान फूड्स लिमिटेड कंपनीने या गुंतवणुकीवर स्पष्टीकरण देताना कळवले आहे की, मिष्टान फूड्स लिमिटेड ही भारतातील एक नावाजलेली FMCG कंपनी आहे. या कंपनीचे प्राथमिक लक्ष विविध प्रकारची मार्केटिंग करणे आहे. नुकताच Nomura Singapore फर्मने मिष्टान फूड्स लिमिटेड कंपनीमध्ये गुंतवणूक करून आपले भाग भांडवल प्रमाण 1.28 टक्के वरून वाढवून 2.19 टक्के वर आणले आहे.

Nomura Singapore ही कंपनी मिष्टान फूड्स लिमिटेड या एफएमसीजी कंपनीच्या स्टॉकबाबत उत्साही आहे. या कंपनीने कोविड रॅलीनंतर जबरदस्त कामगिरी केली होती. या कंपनीचे शेअर्स 2.45 रुपयेवरून वाढून आता 14 रुपये किमतीवर पोहचले आहेत. मागील तीन वर्षांत मिष्टान फूड्स लिमिटेड कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 450 टक्क्यांहून अधिक नफा कमावून दिला आहे.

मागील पाच वर्षांत या कंपनीच्या शेअरने लोकांना 614.14 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील एका वर्षात मिष्टान फूड्स लिमिटेड कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 44.67 टक्के नफा दिला आहे. तर मागील सहा महिन्यात या कंपनीच्या शेअरने लोकांना 53.16 टक्के नफा दिला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Mishtann Foods Share Price today on 09 August 2023.

हॅशटॅग्स

Mishtann Foods Share Price(11)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x