19 November 2024 9:45 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
EPF Pension Money | नोकरदारांनो, तुमच्या 60 ते 70 हजाराच्या पगारावर किती EPF पेन्शन मिळणार, संपूर्ण माहितीचा आढावा घ्या Salary Account | पगारदारांनो, केवळ झिरो बॅलन्स नाही तर, सॅलरी अकाउंटवर मिळतात या 5 सुविधा, जाणून आश्चर्यचकित व्हाल SBI Mutual Fund | श्रीमंत करणाऱ्या 5 म्युच्युअल फंड योजना, 10 हजारांचे होतील करोडो रुपये, इथे पैशाने पैसा वाढवा - Marathi News Trident Share Price | 35 रुपयाच्या शेअरची कमाल, दिला 2300 टक्क्यांचा मल्टिबॅगर परतावा, फायदा घ्या - NSE: TECHLABS Yes Bank Share Price | येस बँकबाबत महत्वाची अपडेट, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK RVNL Share Price | RVNL कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर सकारात्मक परिणाम होणार - NSE: RVNL IRFC Share Price | IRFC शेअर फोकसमध्ये, मल्टिबॅगर शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा का - NSE: IRFC
x

Money From IPO | काय चाललंय काय? या शेअरने 2 दिवसात 109% परतावा दिला, आजही 5% वाढला, स्टॉक खरेदी करणार?

Money From IPO

Money From IPO | मागील आठवड्यात Drone Acharya Aerial Innovations कंपनीच्या शेअर्सचे स्टॉक मार्केटमध्ये शानदार आगमन झाले. या कंपनीच्या शेअर्सने लिस्टिंगच्या पहिल्याच दिवशी आपल्या गुंतवणूकदारांना बक्कळ कमाई करून दिली आहे. खरं तर लिस्टिंगच्या दिवशी या ड्रोन स्टार्ट अप कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना 100 टक्के परतावा कमावून दिला आहे. मंगळवारी (27 December) या कंपनीचे शेअर्स 4.98 टक्के वाढीसह 118.05 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. म्हणजेच ज्या लोकांना या कंपनीच्या IPO मध्ये शेअर्स जारी करण्यात आले होते, त्यांना आता 110 टक्के पेक्षा अधिक नफा मिळाला आहे. या कंपनीच्या IPO मध्ये शेअरची किंमत 54 रुपये निश्चित करण्यात आली होती. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Droneacharya Aerial Innovations Share Price | Droneacharya Aerial Innovations Stock Price | BSE 543713)

दिग्गज लोकांची गुंतवणूक :
बॉलिवूड स्टार आमिर खान आणि रणबीर कपूर यांनीही Drone Acharya Aerial Innovations कंपनीमध्ये गुंतवणूक केली आहे. एवढंच नाही तर दिग्गज गुंतवणुकदार शंकर शर्मा यांनी या कंपनीचे 4.57 लाख शेअर्स खरेदी केले आहेत. या कंपनीच्या ब्लॉकबस्टर लिस्टिंगनंतर त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य वाढून आता 2.45 कोटी रुपये झाले आहे. 2022 या वर्षाच्या सुरुवातीला प्री- आयपीओ फंड उभारणीच्या टप्प्यात आमिर खानने ड्रोन आचार्य कंपनीचे 46,600 शेअर्स खरेदी करून त्यात 25 लाख रुपये गुंतवले होते. रणबीर कपूरनेही या कंपनीचे 37,200 शेअर्स खरेदी केले असून त्यासाठी त्याने 20 लाख रुपये खर्च केले होते. IPO लाँच होण्यापूर्वी पैसे लावणाऱ्या सर्व गुंतवणूकदारांसाठी शेअरची खरेदी किंमत 53.59 रुपये प्रति शेअर निश्चित करण्यात आली होती. या किमतीनुसार सध्या सर्व गुंतवणूकदारांकच्या गुंतवणुकीचे मूल्य दुप्पट झाले आहे.

गुंतवणूकदारांचा जबरदस्त प्रतिसाद :
Drone Acharya Aerial Innovations या पुणेस्थित ड्रोन स्टार्ट अप कंपनीच्या IPO ला गुंतवणूकदारांनी जबरदस्त प्रतिसाद दिला होता. हा आयपीओ ओव्हरसबस्क्राइब झाला होता. अवघ्या तीन दिवसांत हा IPO 262 पट अधिक सबस्क्राईब झाला होता. तर किरकोळ गुंतवणूकदारांसाठी राखीव ठेवण्यात आलेला वाटा 330 पट अधिक सबस्क्राईब झाला होता. DroneAcharya Al या कंपनीला 2022 मध्ये Directorate General of Civil Aviation कडून रिमोट पायलट ट्रेनिंग ऑर्गनायझेशन परवाना मिळाला होता. असा परवाना मिळवणारी ही पहिली खाजगी कंपनी ठरली आहे. मार्च 2022 पासून या कंपनीने 200 पेक्षा जास्त ड्रोन वैमानिकांना प्रशिक्षित केले आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Money From DroneAcharya Aerial Innovations Share Price in Focus check details on 27 December 2022.

हॅशटॅग्स

Money From IPO(22)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x