16 April 2025 9:16 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Mutual Fund | नोकरदारांनो, डोळे झाकुन पैसे गुंतवा या SBI फंडात, एसआयपी वर दिला 1,04,23,471 रुपये परतावा EPFO Pension Amount | तुमचा बेसिक पगार किती आहे? खाजगी कंपनी पगारदारांना महिना 6,429 रुपये पेन्शन मिळणार, अपडेट आली Gratuity on Salary | खाजगी कंपनी पगारदारांच्या खात्यात ग्रेच्युटीचे 4,03,846 रुपये जमा होणार, फायद्याची अपडेट जाणून घ्या Horoscope Today | 17 एप्रिल 2025, तुमच्यासाठी गुरुवारचा दिवस कसा असेल? तुमचे गुरुवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या GTL Share Price | जीटीएल इन्फ्रा पेनी स्टॉकमध्ये तेजी, जोरदार खरेदी, पुढची टार्गेट प्राईस किती? - NSE: GTLINFRA Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार गुरुवार 17 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या IREDA Share Price | सुसाट तेजी, इरेडा शेअरमध्ये 5.65 टक्क्यांची तेजी, PSU स्टॉकची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: IREDA
x

Money From IPO | पैसा मिळणार मजबूत! हा IPO स्टॉक 56 रुपये GMP वर ट्रेड करतोय, पहिल्याच दिवशी नफ्याचे संकेत

Money From IPO

Money From IPO | नोव्हेंबर 2022 हा महिना IPO च्या दृष्टीने ठीकठाक गेला. अनेक कंपन्यांनी आपले IPO बाजारात आणून त्यातून भांडवल उभारणी केली आहे. जेव्हा आपण गुंतवणूकदार म्हणून एखाद्या नवीन कंपनीच्या IPO मध्ये पैसे लावतो, तेव्हा आपण त्या गुंतवणुकीतून जास्तीत जास्त नफा कमावण्याचा प्रयत्न करत असतो. मागील महिन्याच्या शेवटी बाजारात आलेला धर्मराज क्रॉप गार्ड कंपनीच्या आयपीओवर पैसे लावणाच्या गुंतवणूकदारांसाठी ग्रे मार्केटमधून एक धमाकेदार खबर आली आहे. ग्रे मार्केट मध्ये धर्मराज क्रॉप कंपनीला लोकांनी प्रचंड प्रतिसाद दिला आहे.

धर्मराज IPO ची GMP :
ग्रे मार्केट फॉलो करणाऱ्या तज्ञांच्या मते धर्मराज क्रॉप्स कंपनीचा आयपीओ आज 56 रुपये या प्रीमियम किमतीवर ट्रेड करत आहे. आजच्या GMP नुसार तज्ञांनी असा अंदाज व्यक्त केला आहे की, हा IPO शेअर मार्केटमध्ये शानदार एंट्री करू शकतो. धर्मराज कंपनीचा IPO स्टॉक ग्रे मार्केटमध्ये जबरदस्त तेजीत वाढत आहे.

धर्मराज IPO ची लिस्टिंग :
धर्मराज क्रॉप कंपनीचा आयपीओ शेअर बाजारात शानदार एंट्री करेल, असा अंदाज आहे. IPO स्टॉक सध्या ग्रे मार्केटमध्ये 56 रुपये जीएमपीवर ट्रेड करत आहे. याचा अर्थ या कंपनीची लिस्टिंग 290 रुपये ते 300 रुपयांच्या आसपास होऊ शकते, ( 237 रुपये इश्यू किंमत + 56 GMP = 293 रुपये अंदाजित लिस्टिंग किंमत ). ज्या लोकांना या IPO स्टॉकचे शेअर्स वाटप होतील, त्यांना पहिल्याच दिवशी 25 टक्केचा नफा मिळेल. या कंपनीच्या IPO स्टॉकची प्राइस बैंड 216 रुपये ते 237 रुपये दरम्यान निश्चित करण्यात आली आहे.

कंपनीची लिस्टिंग :
धर्मराज क्रॉप कंपनीचा आयपीओ सबस्क्रिप्शन पूर्ण झाल्यानंतर आता सर्व गुंतवणूकदारांचे लक्ष शेअर्स वाटपावर लागले आहे. धर्मराज क्रॉप कंपनीच्या IPO शेअर्सचे वाटप 5 डिसेंबर 2022 रोजी केले जातील. ही कंपनी 8 डिसेंबर 2022 रोजी शेअर बाजारात सूचीबद्ध केली जाईल. धर्मराज क्रॉप कंपनीचा IPO 28 ते 30 नोव्हेंबर 2022 पर्यंत गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला होता.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Money From IPO of Dharmaraj Crops limited share price in gray Market has increased and stock ready to get listed on market on 2 December 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

Money From IPO(22)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या