19 November 2024 12:47 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IRFC Share Price | मल्टिबॅगर IRFC शेअर फोकसमध्ये, आली मोठी अपडेट, शेअर पुन्हा मजबूत परतावा देणार - NSE: IRFC SBI Mutual Fund | सरकारी SBI फंडाची श्रीमंत बनवणारी योजना, केवळ 2500 रुपयांची बचत देईल 1.18 करोड रुपये - Marathi News RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर मालामाल करणार, कंपनीबाबत अपडेट, पुन्हा तेजीचे संकेत - NSE: RVNL HDFC Mutual Fund | 10 हजारांचे होतील 8.30 कोटीरुपये, बंपर रिटर्न देणारी योजना आहे तरी कोणती, वाचा सविस्तर - Marathi News IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी करणार मालामाल, कमाईची मोठी संधी - GMP IPO Suzlon Share Price | सुझलॉन कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर होणार रॉकेट, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON EPF Pension Money | नोकरदारांनो, तुमच्या 60 ते 70 हजाराच्या पगारावर किती EPF पेन्शन मिळणार, संपूर्ण माहितीचा आढावा घ्या
x

Money From Shares | पैसा वाढवावा तरी कसा? तर तो अशा शेकडो टक्के परतावा देणाऱ्या शेअर्समधून, पैसा वेगाने का वाढतोय हा स्टॉक?

Money From shares

Money From Shares | चित्रपट निर्मिती आणि वितरण कंपनी Tips Film’s चे शेअर्स मंगळवारच्या इंट्रा-डे ट्रेडिंग सेशनमध्ये अप्पर सर्किटवर ट्रेड करत होते. टिप्स फिल्म्सच्या शेअर्समध्ये 10 टक्क्यांचा अप्पर सर्किट लागला होता, आणि शेअरची किंमत 630 रुपयांवर गेली होती. त्या तुलनेत S&P BSE सेन्सेक्स मध्ये 0.37 टक्क्यांची पडझड होऊन सेन्सेक्स 59,607 अंकांवर ट्रेड करत होता. मागील आठ ट्रेडिंग सत्रांपासून म्हणजेच 13 ऑक्टोबर 2022 पासून या चित्रपट निर्मिती आणि वितरक कंपनीचे शेअर्सने 303.20 रुपयांवरून 108 टक्क्यांची उसळी घेतली आहे.

स्टॉक एक्सचेंजने मागवले स्पष्टीकरण :
BSE ने मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये टिप्स फिल्म्स लिमिटेड कंपनीकडून शेअरच्या किमतीत झालेली लक्षणीय वाढ पाहून स्पष्टीकरण मागवले आहे. याचे कारण म्हणजे गुंतवणूकदारांना कंपनीबद्दल नवीन माहिती जाणून घेण्याची संधी मिळेल, आणि SEBI ला गुंतवणूकदारांच्या हितांचे संरक्षणही करता येईल. टिप्स इंडस्ट्रीजचे डिमर्जर होऊन टिप्स फिल्म्स निर्माण झाली होती, आणि डिमर्जरच्या योजनेनुसार, टिप्स फिल्म्स कंपनीचे शेअर्स 6 ऑक्टोबर 2022 रोजी शेअर बाजारात सूचीबद्ध झाले होते.

कंपनीचे स्पष्टीकरण :
या कंपनीने SEBI ला दिलेल्या माहिती म्हंटले आहे की, जागतिक स्तरावर सेवांच्या डिजिटल वापरामध्ये चीन नंतर भारत दुसरा सर्वात मोठा देश आहे. 2021 मध्ये व्हिडिओ निर्मितीत 29 टक्क्यांची वाढ झाली आहे. सशुल्क सदस्यतामध्ये 80 दशलक्षचा आकडा पार करून कंपनीने 5,600 कोटी रुपये महसूल कमावला आहे. दुसरीकडे, OTT कंपन्यांनी 2021 ते 2025 मध्ये कंटेंट निर्मितीवर 300 अब्ज रुपये खर्च करण्याचे लक्ष निश्चित केले आहे. दरम्यान, Netflix, Disney आणि Amazon Prime सारख्या मोठ्या कंपन्या कंटेंट निर्मितीत 66.6 अब्ज डॉलर्स खर्च करणे अपेक्षित आहे, जे मागील वर्षीच्या तुलनेत 18.2 टक्क्यांनी जास्त आहे. Tips कंपनीच्या व्यवस्थापनाने अहवालात म्हंटले आहे की “कंपनीने चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या 12 महिन्यांच्या आत 100 टक्के खर्च राइट ऑफ करेल. याआधी 60 टक्के पहिल्या वर्षी आणि उर्वरित खर्च नऊ वर्षांत राइट-ऑफ करण्यात आले होते.”

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Money From shares of Tips Films limited share price return on investment on 27 October 2022.

हॅशटॅग्स

Money from Shares(6)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x