5 November 2024 8:09 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | चिल्लर प्राईस पेनी शेअर श्रीमंत करणार, 30 दिवसात 103% परतावा दिला, स्टॉक खरेदीला गर्दी - Penny Stocks 2024 HUDCO Share Price | रॉकेट स्पीडने कमाई होणार, HUDCO शेअर फोकसमध्ये, मिळेल 65% परतावा - NSE: HUDCO RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, पुन्हा तेजीचे संकेत - NSE: RVNL SJVN Share Price | SJVN शेअर रॉकेट होणार, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SJVN Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीबाबत महत्वाची अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम- NSE: RELIANCE Tata Steel Share Price | टाटा स्टील सहित हे 3 मेटल शेअर्स 40% पर्यंत परतावा देणार, टार्गेट प्राईस नोट करा - TATASTEEL Gold Rate Today | खुशखबर, आज सोन्याचा भाव धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या - Gold Price Today
x

Money Investment | मुलीच्या नावावर फक्त 416 रुपये जमा करा आणि 21 व्या वर्षी 65 लाख मिळतील, योजनेची पूर्ण डिटेल

Money Investment

Money Investment | जर तुमच्या घरात कन्यारत्न असेल आणि तुम्हाला जर तुमच्या कन्येचे भविष्य आर्थिकदृष्ट्या समृद्ध बनवायचे असेल तर आम्ही तुम्हाला एका गुंतवणूक योजनेबद्दल माहिती देणार आहोत, योजना नीट समजून घ्या. ही गुंतवणूक योजना भारत सरकारद्वारे खास मुलींसाठी सुरू करण्यात आली आहे. या विशेष गुंतवणूक योजनेत तुम्ही नियमित गुंतवणुक तुमची मुलगी अवघ्या 21 वर्षी करोडपती होऊ शकते. या योजनेमध्ये गुंतवणूक करण्यासाठी तुम्हाला दररोज फक्त 416 रुपये जमा करावे लागतील. ही एक साधी बचत गुंतवणूक योजना आहे, ज्यात गुंतवणूक करून तुम्ही तुमच्या मुलीसाठी 65 लाख रुपयाचा मोठा फंड तयार करू शकता.

सुकन्या समृद्धी योजना :
सुकन्या समृद्धी योजना ही एक दीर्घकालीन गुंतवणूक योजना असून यात गुंतवणूक करून तुम्ही तुमच्या मुलीच्या शिक्षणासाठी आणि आर्थिक समृद्ध भविष्यासाठी पैसे जमा करू शकता. या योजनेत गुंतवणूक करण्यासाठी तुम्हाला खूप पैसे जमा करण्याची गरज नाही. तुमची मुलगी 21 वर्षांची झाल्यावर तिच्या शिक्षणासाठी किंवा लग्नासाठी तुम्हाला किती पैशांची गरज लागेल ते आधी ठरवा.आणि त्या प्रमाणे गुंतवणूक करा.

मुलींसाठी शासनाची उत्तम गुंतवणूक योजना :
मुलींचे आर्थिक भविष्य सुधारण्यासाठी भारत सरकारची ही एक लोकप्रिय बचत योजना आहे. सुकन्या समृद्धी योजनेत तुम्ही तुमच्या 10 वर्षांच्या मुलीच्या नावाने खाते उघडून गुंतवणूक करू शकता. यामध्ये तुम्ही वार्षिक किमान 250 रुपये आणि कमाल 1.5 लाख रुपये गुंतवून शकता. तुमची मुलगी २१ वर्षांची झाल्यावर ही योजना परिपक्व होईल, आणि तुम्हाला तुमच्या गुंतवणुकीवर परतावा मिळेल. या बचत योजनेतील तुमची गुंतवणूक मुलगी १८ वर्षांची होईपर्यंत लॉक केली जाईल. 18 वर्षांनंतर ती या योजनेतून एकूण रकमेच्या 50 टक्के रक्कम काढू शकते. ज्याचा तिला पदवी शिक्षण किंवा पुढील जीवनासाठी, किंवा अभ्यासासाठी ती करू शकते. यानंतर, ती 21 वर्षांची होईल तेव्हा तिला योजनेतील सर्व पैसे काढता येतील.

15 वर्षांसाठी गुंतवणूक :
या गुंतवणूक योजनेची खास गोष्ट म्हणजे तुम्हाला या योजनेचा फायदा घेण्यासाठी मुलीचे 21 वर्षे पूर्ण होईपर्यंत वाट बघण्याची गरज नाही. आणि तेवढा काळ पैसे जमाही करावे लागणार नाही. योजना खाते उघडल्यापासून 15 वर्ष पूर्ण होईपर्यंत तुम्हाला पैसे जमा करावे लागतील. मुलीचे 21 वर्ष पूर्णपर्यंत त्या.पैशांवर व्याज जमा होत राहील. सध्या भारत सरकार या योजनेतील गुंतवणुकीवर 7.6 टक्के वार्षिक दराने व्याज परतावा देत आहे. तुम्ही तुम्ही घरातील दोन मुलींसाठीही या योजनेचा लाभ घेऊ शकता. जर मुली जुळ्या असतील तर 3 मुलीसाठी देखील या योजनेचा फायदा घेता येईल.

गुंतवणुकीची तयारी :
तुमची मुलगी 21 वर्षांची झाल्यावर तुम्हाला तिच्या आर्थिक भविष्यासाठी किती रक्कम लागेल याची गणना तुम्हाला करावी लागेल. जितक्या लवकर तुम्ही योजना सुरू कराल तितका जास्त परतावा तुम्हाला मुलगी 21 वर्षांची झाल्यावर मिळेल. गुंतवणुकीसाठी योग्य वेळ निवडणे हा गुंतवणुकीचा खास मंत्र आहे.

गुंतवणूक कधी सुरू करावी?
समजा आज तुमची मुलगी 10 वर्षांची आहे, आणि तुम्ही तिच्या नावाने गुंतवणूक करायला सुरुवात केली तर तुम्हाला फक्त 11 वर्षांसाठी गुंतवणूक करावी लागेल. त्याचप्रमाणे तुमची 5 वर्षांची मुलगी असेल आणि तुम्ही तिच्या नावाने गुंतवणूक करायला सुरुवात केली तर तुम्हाला फक्त 16 वर्षांसाठी गुंतवणूक करावी लागेल. असे केल्याने तुमच्या गुंतवणुकीवर परिपक्वता रक्कम वाढेल. जर तुमची मुलगी 2022 मध्ये 1 वर्षाची झाली असेल आणि तुम्ही आता तिच्या नावाने गुंतवणूक करायला सुरुवात केली तर तुमची गुंतवणूक 2043 साली परिपक्व होईल.

416 रुपयांवर 65 लाख रुपये परतावा :
1) जर तुम्ही 2022 मध्ये गुंतवणूक सुरु केली, तर तुमच्या मुलीचे वय 1 वर्ष आहे असे आपण समजू. आणि गणना करू
2) जेर तुम्ही आता रोज 416 रुपये बचत करत असाल तर एक महिन्यात तुमची गुंतवणूक 12,500 रुपये असेल.
3) जर तुम्ही प्रत्येक महिन्याला 12,500 रुपये गुंतवले, तर 1 वर्षात तुमची गुंतवणूक 15,00,00 रुपये होईल.
4) 15 वर्षे, नंतर एकूण गुंतवणूक 2,250,000 रुपये होईल.
5) या योजनेत 7.6 टक्के वार्षिक व्याज दराने तुम्हाला एकूण 4,250,000 रुपये व्याज परतावा दिला जाईल.
6) 2043 साली तुमची मुलगी 21 वर्षांची झाल्यावर ही योजना परिपक्व होईल, त्या वेळी तुम्हाला योजनेतील परिपक्वता रक्कम म्हणून 6,500,000 रुपये मिळतील.

ही गणना तुम्हाला लक्षात ठेवावी लागेल. प्रति दिन तुम्हाला फक्त 416 रुपये बचत करावी लागेल, आणि तुम्ही तुमच्या मुलीचे आर्थिक भविष्य समृद्ध करू शकता. प्रत्येक गुंतवणुकीचा मूळ मंत्र म्हणजे गुंतवणूक लवकर सुरू करणे असा असतो. तुम्ही ही योजना जितक्या लवकर सुरू कराल तितका जास्त परतावा तुम्ही मिळवाल.

आता ‘तिसऱ्या’ मुलीचे खातेही उघडता येणार आहे :
यापूर्वी या सुकन्या समृध्दी योजनेत आयकर कलम 80C अंतर्गत आयकर सवलतीचा लाभ फक्त दोन मुलींच्या खात्यावर देण्यात येत होता. पूर्वी तिसऱ्या मुलीला हा लाभ देण्यात येत नव्हता. आता नवीन नियमानुसार एका मुलीनंतर दोन जुळ्या मुली जन्माला आल्यास त्या दोघांच्या नावानेही खाते उघडण्याची सुविधा देण्यात आली आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Money Investment scheme in Sukanya Samrudhi yojana for Girl child on 23 October 2022.

हॅशटॅग्स

#Money Investment(4)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x