25 December 2024 1:43 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 3 रुपयाच्या पेनी शेअरने 1 वर्षात गरिबांना करोडपती केलं, सतत पैशाचा पाऊस पाडणारा शेअर - Penny Stocks 2024 SBI Mutual Fund | नोकरदार करत आहेत मोठी कमाई, SBI फंडाच्या दोन योजना पैसा अनेक पटीने वाढवत आहेत NTPC Share Price | मल्टिबॅगर NTPC सहित हे 4 शेअर्स मालामाल करणार, मजबूत कमाईची संधी सोडू नका - NSE: NTPC Tata Technologies Share Price | टाटा ग्रुपचा शेअर 30 टक्क्यांनी स्वस्त मिळतोय, स्टॉक BUY करावा का - NSE: TATATECH Mutual Fund SIP | 400 रुपयांच्या बचतीतून अशाप्रकारे 8 कोटी रुपयांचा परतावा मिळवू शकता, मार्ग श्रीमंतीचा समजून घ्या SBI Mutual Fund | पगारदारांनो, महिना 2,500 रुपयांची SIP वर मिळेल 1.18 कोटी रुपये परतावा, धमाकेदार योजना Bonus Share News | या दोन कंपन्यांकडून फ्री बोनस शेअर्सची घोषणा, स्टॉक खरेदीला गर्दी, रेकॉर्ड तारीख तपासून घ्या
x

Money Making IPO | आयपीओ असावा तर असा, 3 महिन्यात पैसे दुप्पट केले, छप्परफाड नफ्याचा स्टॉक खरेदी करणार?, वाचा डिटेल

Money Making IPO

Money Making IPO | मागील 1 वर्षात स्टॉक मार्केटमध्ये अनेक IPO आले, त्यापैकी काही कंपन्यांनी आपल्या गुंतवणूकदारांना मजबूत परतावा कमावून दिला, तर काही कंपन्यांनी लोकांना निराश केले. पण बऱ्याच कंपन्यांनी गुंतवणूकदारांचे पैसे थोडे प्रमाणात का असेना, वाढवले आहेत. अशीच एक कंपनी आहे, “डेटा पॅटर्न इंडिया लिमिटेड”. या कंपनीने आपल्या शेअर धारकांना जबरदस्त परतावा कमावून दिला आहे. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सुरुवातीच्या काही तासात या कंपनीच्या शेअर्सनी 1,480 रुपयांची नवीन उच्चांक किंमत स्पर्श केली होती. या कंपनीची लिस्टिंग स्टॉक मार्केटमध्ये 24 डिसेंबर 2021 रोजी झाली होती.

या डिफेन्स कंपनीच्या स्टॉकने मागील तीन महिन्यांत आपल्या गुंतवणूकदारांना 85 टक्क्यांपर्यंत परतावा कमावून दिला आहे. म्हणजेच या काळात गुंतवणूकदारांचे पैसे जवळपास दुप्पट वाढले आहेत. 2022 या वर्षात सेन्सेक्समध्ये 0.1 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली होती. त्याच वेळी, डेटा पॅटर्न कंपनीच्या शेअरची किमती 76 टक्क्यांनी वाढली आहे. या डिफेन्स सेक्टरमधील कंपनीने IPO मधील इश्यू किमतीच्या तुलनेत आपल्या शेअर धारकांना 139 टक्के परतावा मिळवून दिला आहे.

आयपीओ ओपनिंग :
कंपनीचा IPO इश्यू गुंतवणुकीसाठी 13 डिसेंबर 2021 रोजी खुला करण्यात आला होता. 16 डिसेंबर 2021 रोजी IPO गुंतवणुकीसाठी बंद झाला. 16 डिसेंबर रोजी IPO च्या शेवटच्या दिवशी हा IPO 119.62 पट अधिक सबस्क्राइब झाला होता. डेटा पॅटर्न कंपनीच्या IPO ला गुंतवणूकदारांकडून भरघोस प्रतिसाद मिळाला होता. या कंपनीचा IPO इश्यू एकूण 119.62 पट अधिक सबस्क्राइब झाला होता. डेटा पॅटर्न कंपनीच्या IPO चा आकार 240 कोटी रुपये होता आणि ऑफर फॉर सेलमध्ये कंपनीने एकूण 59.52 लाख इक्विटी शेअर्सची विक्री केली होती. या कंपनीच्या IPO इश्यू मधील प्राइस बँड प्रति शेअर 555-585 रुपये निश्चित करण्यात आले होते. IPO इश्यू गुंतवणुकीसाठी खुला झाला त्या दिवशी डेटा पॅटर्न कंपनीने किरकोळ गुंतवणूकदारांकडून 176 कोटी रुपये जमा केले होते.

कंपनीच्या व्यवसायाबद्दल थोडक्यात :
डेटा पॅटर्न कंपनी ही एकात्मिक संरक्षण आणि एरोस्पेस इलेक्ट्रॉनिक्स सोल्युशन्स सेवा देणारी कंपनी आहे. ही डिफेन्स सेक्टरमधील कंपनी इलेक्ट्रॉनिक हार्डवेअर, सॉफ्टवेअर, फर्मवेअर, मेकॅनिकल, उत्पादन प्रोटोटाइपचे डिझाइन, विकास, चाचणी, प्रमाणीकरण आणि सत्यापण करण्याच्या व्यवसायात गुंतलेली आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Money Making IPO of Defence company Deta pattern India Limited share price return on investment on 20 October 2022.

हॅशटॅग्स

#Money Making IPO(3)#Multibagger IPO(35)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x