15 January 2025 2:28 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IREDA Share Price | मल्टिबॅगर इरेडा शेअर मालामाल करणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट आली - NSE: IREDA Apollo Micro Systems Share Price | अपोलो मायक्रो सिस्टीम शेअर फोकसमध्ये, ब्रोकरेज बुलिश, टार्गेट नोट करा - NSE: APOLLO Quant Mutual Fund | पगारदारांनो, टॅक्स वाचेल आणि पैसा 3 ते 4 पटीने वाढेल, ही म्युच्युअल फंड योजना मालामाल करेल IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, प्राईस बँड सह डिटेल्स नोट करा, कमाईची संधी सोडू नका 8th Pay Commission | 8'व्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट, सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी IRFC Share Price | IRFC शेअर विक्रमी उच्चांकावरून 69 टक्क्यांनी घसरला, आता फायद्याची अपडेट आली - NSE: IRFC Flipkart Sale | फ्लिपकार्टची धमाकेदार ऑफर; 9999 रुपयांपासून सुरू स्मार्टफोनच्या किंमती, घाई करा, पैशाची बचत करा
x

Monthly Income Scheme | तुम्हाला सुरक्षितपणे दर महिन्याला मासिक उत्पन्न हवं असल्यास या सरकारी योजनेत गुंतवणुक करा

Monthly Income Scheme

Monthly Income Scheme | भारतातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक म्हणजेच ‘स्टेट बँक ऑफ इंडिया’ सध्या मुदत ठेव गुंतवणुकीवर कमाल 5.4 टक्के व्याज देईल असे जाहीर केले आहे. वाढती महागाई ,आणि तुमचे आर्थिक उद्दिष्टे लक्षात घेऊन, जर तुम्हाला तुमचा पैसा योग्य ठिकाणी गुंतवायचा असेल ज्यात कोणती जोखीम नसेल आणि भरघोस चांगला परतावा मिळेल, तर तुमच्यासाठी पोस्ट ऑफिसकडे एक जबरदस्त योजना आहे. पोस्ट ऑफिसचे राष्ट्रीय बचत मासिक उत्पन्न खाते दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी बेस्ट असेल. पोस्ट ऑफिस या योजनेतील गुंतवणुकीवर 6.6 टक्के वार्षिक व्याज परतावा देत आहे. आज या लेखात आम्ही तुम्हाला पोस्ट ऑफिसच्या या मुदत ठेव योजनेबद्दल माहिती देणार आहोत.

कमाल गुंतवणूक मर्यादा 9 लाखांपर्यंत :
तुम्ही या योजनेत कमाल नऊ लाख रुपये गुंतवणूक करू शकता. पोस्ट ऑफिसच्या या विशेष योजनेत, खाते उघडण्यासाठी तुम्हाला किमान 1000 रुपयांची गुंतवणुक करावी लागेल. जर तुम्हाला एकरकमी गुंतवणूक खाते उघडायचे असल्यास, तुम्ही त्यात कमाल 4.5 लाख रुपयेपर्यंत गुंतवणूक करू शकता. जर संयुक्त गुंतवणूक खाते उघडले असेल, तर या योजनेत कमाल 9 लाख रुपये गुंतवता करता येतील.

दरमहा 5 हजार रुपये कमाई :
पोस्ट ऑफिसच्या नॅशनल सेव्हिंग्स मंथली इनकम अकाउंटमधील गुंतवणुकीवर तुम्हाला वार्षिक 6.6 टक्के दराने व्याज परतावा मिळेल. या बचत योजनेत, दरवर्षी मिळणारे व्याज 12 महिन्यांत विभागले जाते आणि गुंतवणूकदाराला दरमहा एक ठराविक रक्कम दिली जाते. जर तुम्ही दर महिन्याला पैसे काढत नसाल तर ते पैसे तुमच्या पोस्ट ऑफिसच्या बचत खात्यात आपोआप जमा होत राहतील. तुम्ही दर महिन्याला व्याज काढले नाही, तर तुम्हाला व्याजाची रक्कम तुमच्या मूळ रकमेसोबत जोडून त्यावरही आणखी व्याज मिळेल. जर एखाद्या गुंतवणूकदाराने या पोस्ट ऑफिस योजनेत 4.5 लाख रुपये गुंतवले तर त्या हिशोबाने 6.6 टक्के वार्षिक व्याजदराने एका वर्षासाठी 29700 रुपये व्याज परतावा मिळेल. दुसरीकडे, जर तुम्ही खाते संयुक्त उघडले असल्यास, 9 लाखांच्या गुंतवणुकीवर 6.6 टक्के व्याजदराने वार्षिक 59,400 रुपये व्याज परतावा दिला जाईल. अशा प्रकारे दरमहा तुम्हाला 4950 रुपये व्याज मिळेल.

5 वर्षे गुंतवणुकीचा पर्याय :
या योजनेचा मुदत पूर्ती कालावधी 5 वर्षांचा आहे. 5 वर्षांनंतर, तुम्ही या योजनेत व्याजासह मिळालेले सर्व पैसे पुन्हा गुंतवू शकता. तुम्हाला तुमचे पैसे 5 वर्षांच्या मॅच्युरिटी कालावधीनंतरच मिळतील. या योजनेत गुंतवणूक केल्यानंतर तुमच्यासाठी आणखी एक मासिक उत्पन्नाचा स्रोत तयार होऊ शकतो.

मुदतपूर्तीपूर्वीही पैसे काढता येतात :
जर कोणत्याही कारणासाठी तुम्हाला मॅच्युरिटीपूर्वी पैसे काढण्याची गरज लागली तर, तुम्हाला गुंतवणूक खात्याचे एक वर्ष पूर्ण झाल्यानंतर पैसे काढण्याची सुविधा मिळेल. 1 वर्ष ते तीन वर्षांच्या दरम्यान जर तुम्ही योजना बंद केली तर, ठेव रकमेच्या 2 टक्के रक्कम वजा केल्यावर पैसे परत केले जातील. 3 वर्षांनंतर पैसे काढण्याची गरज लागली तर, तुमच्या गुंतवणुकीच्या 1 टक्के रक्कम वजा करून तुम्हाला पैसे परत केले जाईल.

खाते कोण उघडू शकते :
या योजनेचे मासिक बचत खाते अल्पवयीन व्यक्तीच्या नावानेही तुम्ही सुरू करू शकता . या पोस्ट ऑफिस बचत योजनेत 3 प्रौढ व्यक्तींच्या नावाने तुम्ही एक संयुक्त खाते उघडता उघडुन त्यात गुंतवणूक करू शकता. किमान 10 वर्षांपेक्षा जास्त वयाची मुले त्यांच्या पालकाच्या देखरेखीखाली स्वतःच्या नावे खाते उघडून पैसे जमा करू शकतात.

प्रक्रिया काय आहे ?
या योजनेत गुंतवणूक करण्याची प्रक्रिया अगदी सोपी आहे. त्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन मासिक बचत योजना खाते उघडावे लागेल. त्यानंतर पोस्ट ऑफिसमधूनच राष्ट्रीय बचत मासिक उत्पन्न योजना खात्याचा अर्ज घेऊन तो भरावा लागेल. अर्जासह खाते उघडण्यासाठी, जी ठरलेली रक्कम आहे ती रोख किंवा चेकद्वारे खात्यात जमा करावी लागेल. या प्रक्रियेनंतर तुमचे खाते उघडले जाईल.

5 वर्षाच्या मुदत ठेव योजनेत मिळणारे बँकेतील व्याजदर पुढील प्रमाणे

* PNB – 5.75
* HDFC – 5.70
* ICICI – 5.70
* SBI – 5.50

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Monthly Income Scheme for long term investment and it’s benefits on 10 August 2022.

हॅशटॅग्स

Monthly Income Scheme(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x