21 April 2025 5:38 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HAL Share Price | पीएसयू डिफेन्स कंपनीचा स्टॉक फोकसमध्ये; नुवामाने जाहीर केली टार्गेट प्राईस - NSE: HAL Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअर्स खरेदीला गर्दी, फायदा घ्या, जबरदस्त टार्गेट प्राईस - NSE: TATATECH Vodafone Idea Share Price | या पेनी स्टॉकवर गुंतवणूकदार तुटून पडले, आज 6.57% वाढला, ही आहे टार्गेट - NSE: IDEA Adani Power Share Price | ग्लोबल फर्म बुलिश; अदानी पॉवर शेअर्स देईल मोठा परतावा, टार्गेट नोट करा - NSE: ADANIPOWER Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअरबद्दल महत्वाची अपडेट, ग्लोबल फर्मने जाहीर केली टार्गेट प्राईस - NSE: TATASTEEL Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपचा शेअर जबरदस्त परतावा देणार; ही आहे पुढची टार्गेट प्राईस - NSE: JIOFIN IRFC Share Price | सरकारी कंपनीच्या मल्टिबॅगर शेअरबाबत फायद्याची अपडेट, मोठी अपसाईड टार्गेट प्राईस - NSE: IRFC
x

Monthly Pension Money | 1000 रुपयांची गुंतवणूक प्रत्येक महिन्याला बनवेल लखपती, सरकारी पेन्शनचा फायदा घ्या - Marathi News

Highlights:

  • Monthly Pension Money
  • कमी प्रमाणात पैशांची बचत करून रिटायरमेंटनंतरचं आयुष्य आनंदात जाईल :
  • NPS एनपीएस स्कीम चांगला परतावा देते :
  • पेंशनसाठी ॲन्यूइटी खरेदी करा :
  • हे नियम माहित असणे गरजेचे आहे :
Monthly Pension Money

Monthly Pension Money | पीएफआरडीच्या 2013 अधिनियम अंतर्गत किंवा पेंशन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटीनुसार NPS म्हणजेच नॅशनल पेंशन स्कीम ही रिटायरमेंट झालेल्या किंवा होणाऱ्या व्यक्तींसाठी फायद्याची योजना आहे. निवृत्तीनंतर घरबसल्या चांगली इन्कम मिळावी यासाठी ही योजना सुरू केली आहे. ज्यामुळे ही योजना रिटायरमेंट झालेल्या व्यक्तींसाठी फायद्याची योजना ठरणार आहे. यामध्ये गुंतवणूक करणाऱ्या व्यक्तींचे पैसे, बिल्स, वेगवेगळ्या प्रकारचे शेअर्स, त्याचबरोबर बाँडच्या अनेक पोर्टफोलिओमध्ये गुंतवले जातात.

कमी प्रमाणात पैशांची बचत करून रिटायरमेंटनंतरचं आयुष्य आनंदात जाईल :
NPS नॅशनल पेंशन स्कीममध्ये तुम्ही लवकरच गुंतवणूक सुरू करून निवृत्तीपर्यंत भरपूर पैसे जमा करून ठेवू शकता. लवकरच बचत सुरू केल्याने तुमच्याजवळ जास्त रक्कम जमा होण्यास मदत होते. तुम्हाला या स्कीममध्ये गुंतवणूक करायची असेल तर, तुम्ही भारतीय नागरिक असणे गरजेचे आहे. सोबतच तुमचं वय 18 ते 70 पर्यंत असणे देखील गरजेचे आहे.

योजनेची खास गोष्ट म्हणजे फक्त सरकारी कर्मचारीच नाही तर, इतर प्रायव्हेट कंपन्यांमध्ये काम करणारे व्यक्ती देखील या योजनेचा पुरेपूर लाभ घेऊ शकतात. या योजनेच्या खात्यामध्ये तुम्हाला एकूण 20 वर्षांपर्यंत गुंतवणूक करावी लागते. म्हणजेच काय तर, स्कीम मॅच्युअर होईपर्यंत आणि 60 वर्षांच्या निवृत्तीपर्यंत तुम्हाला योगदान करावे लागते.

NPS एनपीएस स्कीम चांगला परतावा देते :
एनपीएस योजनेमध्ये गुंतवणूक करणाऱ्या कर्मचाऱ्यांना चांगला परतावा मिळतो. परंतु यामध्ये तुम्हाला गॅरेंटेड परतावा मिळण्याची शक्यता थोड्याफार प्रमाणात कमी असते. याचं कारण म्हणजे गुंतवणूकदाराने एनपीएसमध्ये गुंतवलेल्या रक्कमेचा एक हिस्सा इक्विटीमध्ये जमा करण्यात येतो. ही गोष्ट असून सुद्धा या योजनेमध्ये पीएफप्रमाणे इतर अधिक काळापर्यंत गुंतवणूक करणाऱ्या योजनांपेक्षा चांगले रिटर्न प्रदान करते. या योजनेच्या परताव्याबद्दल सांगायचे झाले तर, ही योजना वर्षाला तब्बल 12% रिटर्न मिळवून देते आणि आत्तापर्यंत दिले सुद्धा आहे. यामध्ये तुम्ही तुमच्या फंडला घेऊन असंतुष्ट असाल तर, मॅनेजर बदलण्याचा पर्याय देखील निवडू शकता.

पेंशनसाठी ॲन्यूइटी खरेदी करा :
ॲन्यूइटी खरेदी करण्यासाठी तुमची 50% गुंतवणूक असणे गरजेचे आहे. ज्याची टोटल व्हॅल्यू 1.75 कोटी रुपये असून, 8% टक्क्यांनी ॲन्यूइटी रेटनुसार तुम्हाला दरमहा 1,16,800 रुपये म्हणजेच दीड लाखांपर्यंत प्रत्येक महिन्याला पेन्शन सुरू राहील.

हे नियम माहित असणे गरजेचे आहे :
नॅशनल पेंशन स्कीममध्ये तुम्ही वयाच्या 21 व्या वर्षापासून गुंतवणूक सुरू करू शकता. यामध्ये इन्वेस्ट करण्यासाठी चाळीस वर्ष म्हणजेच 60 वर्षांपर्यंतचा कार्यकाळ दिला गेला आहे. तुम्ही प्रत्येक महिन्याला कमीतकमी 1000 रुपयांची गुंतवणूक करणे गरजेचे आहे. परंतु यामध्ये तुम्हाला प्रत्येक वर्षी किमान 10%ने योगदान वाढवावे लागेल. असं केल्याने 40 वर्षांत तुमच्या खात्यात 53,11,111 एवढे रुपये जमा होतील. ज्यावर 12%ने व्याजदर देखील लागू होईल. याचाच अर्थ तुमच्याजवळ रिटायरमेंट झाल्यानंतर एकूण कॉर्पस 3.51 करोड होतील. म्हणजे तुम्हाला एकूण झालेला फायदा 2.9 करोड इतका असेल.

Latest Marathi News | Monthly Pension Money 20 September 2024 Marathi News.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Monthly Pension Money(4)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या